एक्स्प्लोर

Pune Loksabha Election : पुणे, पश्चिम महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकींचं बिगुल वाजलं; मतदान कधी, निकाल कधी?

निवडणूक आयोगाकडून (Election Commission) लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election Dates) तारखा जाहीर करण्यात आल्या. त्यात पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील एकूण नऊ मतदार संघाच्या तारखा जाहीर झाल्या आहे. 

पुणे : निवडणूक आयोगाकडून (Election Commission) लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election Dates) तारखा जाहीर करण्यात आल्या. त्यात पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील एकूण 10 मतदार संघाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.  सांगली लोकसभा मतदारसंघ (sangali Lok Sabha Constituency) , कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ (Kolhapur Lok Sabha Constituency), म्हाडा लोकसभा मतदारसंघ (Mhada Lok Sabha Constituency), मावळ लोकसभा मतदारसंघ  (Maval Lok Sabha Constituency), शिरुर लोकसभा मतदारसंघ (Shirur Lok Sabha Constituency), हातकणंगले लोकसभा मतदारसंघ (Hatkanagle Lok Sabha Constituency) , पुणे लोकसभा मतदारसंघ (Pune Lok Sabha Constituency) , बारामती लोकसभा मतदारसंघ ( Pune Lok Sabha Constituency), सोलापूर लोकसभा मतदारसंघ, सातारा लोकसभा मतदारसंघांचा (Satara Constituency), समावेश आहे. 

कोणत्या मतदारसंघात मतदान कधी होणार?

7 मे 2024 :  बारामती, सोलापूर, सांगली, म्हाडा, कोल्हापूर, हातकणंगले, सातारा 

13 मे 2024  : पुणे, मावळ, शिरुर

मतमोजणी कधी होणार?

चार जूनला मतमोजणी होणार आहे.

दहापैकी पुणे, सांगली आणि माढा लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र उरलेल्या ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी देखील अद्याप त्यांच्या उमेदवारांची निवड जाहीर करू शकले नाहीत. पश्चिम महाराष्ट्रात सांगली , कोल्हापूर, म्हाडा, मावळ , शिरुर , हातकणंगले , पुणे, बारामती, सोलापूर , सातारा उमेदवार घोषित व्हायचे आहेत.  

बारामतीत पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात महत्वाची लढत

पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात महत्वाची लढत बारामतीत होणार आहे. त्यात पवार विरुद्ध पवार लढत बघायला मिळण्याची शक्यता आहे. त्यातच बारामतीत सुप्रिया सुळेंची तर उमेदवारी शरद पवार यांनी घोषित केली आहे मात्र अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उभ्या राहणार असल्याचं जरी सर्वांना ठाऊक असलं तरी अधिकृत घोषणा होणं बाकी आहे. यातच महत्वाचं म्हणजे विजय शिवतारे यांनी अपक्ष लढणार असल्याचं सांगितल्यामुळे लढत अजून कठिण होण्याची शक्यता आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून त्यांनी समजून काढण्याचे प्रयत्न सुरु आहे. 

इंडिया वोटर्स या बेवसाईटच्या आकडेवारीनुसार मतादारांची संख्या खालीलप्रमाणे...

बारामती : 20,25,795 
मावळ : 21,75,681 
पुणे :19,97,594 
सांगली : 14,24,936 
सातारा : 17,53,567 
कोल्हापूर : 18,05,949 
शिरुर : 20,45,438 
सोलापूर : 17,47,242 
म्हाडा : 18,25,200 
हातकणंगले : 16,93,449 

महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?

पहिला टप्पा  : मतदान- 19 एप्रिल : रामटेक, नागपूर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर  (विदर्भातील 5)

दुसरा टप्पा : मतदान- 26 एप्रिल : बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी (एकूण मतदारसंघ - 8) 

तिसरा टप्पा : मतदान- 7 मे : रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले (एकूण मतदारसंघ - 11 )

चौथा टप्पा : 13 मे : नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड  (एकूण मतदारसंघ - 11 )

पाचवा टप्पा : 20 मे : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, आणि दक्षिण मुंबई (एकूण मतदारसंघ - 13 )

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
Nana Patole on Devendra Fadnavis : आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat On Chandiwal : 'चांदीवाल ते सचिन वाझे' गौप्यस्फोटांवर शिरसाट यांची प्रतिक्रियाVidhan Sabha Manchar Reaction : सख्ख्या भावांनी आम्हाला रडवलं मंचरकरांचा मूड कुणाच्या बाजूने?Chitra Wagh Akola On Supriya Sule : बारामतीच्या ताईंनी आपल्या अडाणीपणाचे प्रदर्शन नाही केलं पाहिजेDeepak Nikalje : छोटा राजनचे बंधू विधानसभेच्या मैदानात भिडणार शिंदे-ठाकरेंच्या उमेदवाराला !

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
Nana Patole on Devendra Fadnavis : आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
Donald Trump : दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
विधानसभेची खडाजंगी: बहिणीच्या साथीने वाढली भावाची ताकद; परळी मतदारसंघात तुतारी वाजणार की घड्याळ चालणार?
विधानसभेची खडाजंगी: बहिणीच्या साथीने वाढली भावाची ताकद; परळी मतदारसंघात तुतारी वाजणार की घड्याळ चालणार?
शरद पवारांचा व्हिडीओ पोस्ट करणं भोवलं, अजित पवारांची सुनावणीत अडचण, अमोल मिटकरींनी थेट सुप्रीम कोर्टाची माफी मागितली, पोस्टही डिलीट
काल शरद पवारांचा व्हिडीओ पोस्ट झाला आज अमोल मिटकरींनी सुप्रीम कोर्टाची माफी मागितली, काय घडलं?
Photos: बटेंगे तो कटेंगे... योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतील सभेत टी-शर्टने वेधले लक्ष
Photos: बटेंगे तो कटेंगे... योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतील सभेत टी-शर्टने वेधले लक्ष
Embed widget