एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर मंकीहिलजवळ दरड कोसळली, वाहतुकीवर परिणाम
मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर मंकीहिलजवळ दरड कोसळली आहे.
पिंपरी : मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर पुन्हा एकदा दरड कोसळली आहे. ठाकूरवाडी ते मंकीहिलदरम्यान आज रात्री साडे दहा वाजता दरड कोसळल्याची घटना घडली आहे. दरड कोसळल्यामुळे डाऊन लाईन आणि मिडल लाईनवरील वाहतूक ठप्प झाली आहे.
मागच्या वेळी मंकीहिलजवळ दरड कोसळल्याच्या गेल्या वेळच्या घटनेपासून एक किलोमीटर आधी ही दरड कोसळली. मुंबईहून निघालेली चेन्नई एक्स्प्रेस ठाकूरवाडी स्टेशनवर थांबवण्यात आली आहे. तसंच अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या दरड कोसळल्याने रखडल्या आहेत.
याआधी 21 ऑगस्ट 2017 रोजी हुबळी एक्स्प्रेसवर पहाटे साडे पाच ते सहाच्या सुमारास दरड कोसळली होती. या घटनेत तीन प्रवासी जखमी झाले होते. लोणावळा आणि खंडाळा स्टेशनदरम्यान मंकी हिलजवळ दरड कोसळल्याने हुबली-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसवर भलामोठा दगड आदळला. छप्पर फुटून हा दगड थेट स्लीपर डब्ब्यात पडल्याने इथे झोपलेले तीन प्रवासी जखमी झाले. दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली तरी वारंवार होणाऱ्या घटनांमुळे या मार्गावरील रेल्वेच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
कोल्हापूर
बातम्या
Advertisement