एक्स्प्लोर

आईच्या हातची खीर विकून पुण्यातले बहिण-भाऊ बनले कोट्यधीश!

पुण्यातील भाऊ-बहिण आईच्या हातची खीर विकून चक्क कोट्यधीश बनले आहेत. कसा होता त्यांचा प्रवास, जाणून घेऊया.

पुणे : भारतीय खाद्यसंस्कृतीत खिरीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. देशभरात विविध पदार्थांची खीर बनवली जाते आणि आवडीने खाल्लीही जाते. मग जर ती खीर आईच्या हातची असेल तर स्वर्गसुख. पुण्यातील भाऊ-बहिण आईच्या हातची खीर विकून चक्क कोट्यधीश बनले आहेत. 'La Kheer Deli' (LKD) नावाच्या आऊटलेटमधील खीर देशभरात लोकप्रिय होत आहे. या आऊटलेटमध्ये न्यूटेला, ब्राऊनी, चॉकलेट, ओरिओ आणि गुलकंद अशा फ्लेवर्समध्ये खीर मिळते.

भाऊ-बहिणीने सुरु केला व्यवसाय शिवांग आणि शिविका सूद असं या भाऊ-बहिणीचं नाव आहे. त्यांनी दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 2019 मध्ये या आऊटलेटची सुरुवात केली आहे. त्यांच्या आऊटलेटमधील खीर ही फक्त पुण्यातच नाही तर भारताच्या अनेक शहरांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे.

'द बेटर इंडिया'शी केलेल्या बातचीतमध्ये 27 वर्षीय शिवांग सूद म्हणाला की, आम्ही दोघे लहान असताना आई खीर बनवायची. आईच्या हातची खीर संपूर्ण कुटुंब मोठ्या प्रेमाने आणि आवडीने खात असेल. काही वर्षांपूर्वी म्हणजेच 2017 मध्ये माझी बहिण या खिरीला कंटाळली. मग तिने आपल्या खिरीमध्ये चमचाभर न्यूटेला आणि ओरिओ टाकलं. यामुळे खिरीची चव बदलली.

आईने यावर काम करण्यास सुरुवात केली मग काय तिने आपल्या आईला या चवीबद्दल सांगितलं. यानंतर आईने गुलकंद आणि ब्राऊनी घालून खीर बनवली. कुटुंबीयांना ती चवही आवडली. इतकंच नाही तर त्यांनी ही खीर नातेवाईकांनाही चाखायला दिली. शेजारीपाजारीही खीर खाल्ल्यावर तृप्त झाले.

आईच्या हातची खीर विकून पुण्यातले बहिण-भाऊ बनले कोट्यधीश!

शिवांग सांगतो की, सुरुवातीला मी स्पोर्ट्स स्टार्टअप चालवायचो. मग ही खीर इतरांपर्यंत पोहोचवण्याची कल्पना माझ्या आणि शिविकाच्या डोक्यात आली. परंतु अडचण गुंतवणुकीची होती. पैसा कुठून येणार. यानंतर 19 मे, 2017 रोजी अखेरीस आम्ही गुंतवणूक केलीच. पुण्याच्या औंधमध्ये 'स्टारबक्स'च्या बाहेर गाड्यावर आईने बनवलेली खीर बनवण्यास सुरुवात केली. यामध्ये विविध फ्लेवर्स होते.

#Repost @the.local.nation • • • • • • Pune, Maharashtra “Our first and biggest challenge was to convince Mom to quit... Posted by LKD - La Kheer Deli on Thursday, 29 October 2020

हळूहळू व्यवसाय वाढला पहिल्या दिवशी मित्रांच्या मदतीने खिरीचे 44 डब्बे विकले. पुढच्या दिवशी आईने 82 डब्बे बनवले. तिसऱ्या दिवशी 100 डब्बे बनवले आणि सगळ्यांची विक्री झाली. मार्केटिंग आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ब्रॅण्डिंगची सुरुवात केली. लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यांनी प्री-ऑर्डर देण्यास सुरुवात केली, असं शिवांगने सांगितलं. यानंतर सूद कुटुंबाने 2018 मध्ये पुण्याच्या जेएम रोडवर दुकान सुरु केलं. पहिल्या वर्षातील कमाई 33 लाख रुपये होती. 2018 मध्ये वाढून ती 84 लाख रुपयांपर्यंत पोहोचली. तर 2019 आणि 2020 मध्ये एक कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे.

आईने आपली नोकरी सोडली बहिण-भावाच्या जोडीने हा व्यवसाय सुरु केला असला तरी सर्वाधिक मेहनत त्यांच्या आईने केली आहे. 52 वर्षीय सोनिया सूद या शाळेत शिक्षिका होत्या. परंतु मुलांना मदत करण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. पुण्यातील 'La Kheer Deli' आऊटलेट आज फारच लोकप्रिय आहे. शिवाय व्यवसायही चांगला सुरु आहे. त्यामुळे त्यांना नोकरी सोडल्याची खंत नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : वाह रे, दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा; छगन भुजबळांचा अजित पवारांवर संताप, समर्थकांसमोर सगळंच काढलं!
वाह रे, दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा; छगन भुजबळांचा अजित पवारांवर संताप, समर्थकांसमोर सगळंच काढलं!
IPO Listing: दोन आयपीओच्या लिस्टिंगनं स्टॉक मार्केटमध्ये तुफान, सेन्सेक्स कोसळत असताना गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट
दोन आयपीओच्या लिस्टिंगनं स्टॉक मार्केटमध्ये तुफान, सेन्सेक्स कोसळत असताना गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट
Uddhav Thackeray Video: बुके देऊन उद्धव ठाकरे निघाले, फडणवीस म्हणाले या बसा; नागपुरातील भेटीत नेमकं काय घडलं?
Uddhav Thackeray Video: बुके देऊन उद्धव ठाकरे निघाले, फडणवीस म्हणाले या बसा; नागपुरातील भेटीत नेमकं काय घडलं?
Raj Kapoor : जेव्हा नर्गिस यांनी राज कपूरसाठी थेट तत्कालिन गृहमंत्री मोरारजी देसाईंना फोन फिरवला होता! दोघांच्या प्रेमकहाणीचा दुर्दैवी अंत का झाला?
जेव्हा नर्गिस यांनी विवाहित राज कपूरसाठी तत्कालिन गृहमंत्री मोरारजी देसाईंना फोन फिरवला होता! दोघांच्या प्रेमकहाणीचा दुर्दैवी अंत का झाला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray and Devendra Fadnavis Meeting : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीलाShambhuraj Desai : उद्धव ठाकरे नार्वेकरांच्या केबिनमध्ये असताना शंभूराज देसाईंची एन्ट्रीUddhav Thackeray Meets Devendra Fadnavis :उद्धव ठाकरे - देवेंद्र फडणवीस भेटीचा, EXCLUSIVE VIDEOUddhav Thackeray Meets Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, कारण नेमकं काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : वाह रे, दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा; छगन भुजबळांचा अजित पवारांवर संताप, समर्थकांसमोर सगळंच काढलं!
वाह रे, दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा; छगन भुजबळांचा अजित पवारांवर संताप, समर्थकांसमोर सगळंच काढलं!
IPO Listing: दोन आयपीओच्या लिस्टिंगनं स्टॉक मार्केटमध्ये तुफान, सेन्सेक्स कोसळत असताना गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट
दोन आयपीओच्या लिस्टिंगनं स्टॉक मार्केटमध्ये तुफान, सेन्सेक्स कोसळत असताना गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट
Uddhav Thackeray Video: बुके देऊन उद्धव ठाकरे निघाले, फडणवीस म्हणाले या बसा; नागपुरातील भेटीत नेमकं काय घडलं?
Uddhav Thackeray Video: बुके देऊन उद्धव ठाकरे निघाले, फडणवीस म्हणाले या बसा; नागपुरातील भेटीत नेमकं काय घडलं?
Raj Kapoor : जेव्हा नर्गिस यांनी राज कपूरसाठी थेट तत्कालिन गृहमंत्री मोरारजी देसाईंना फोन फिरवला होता! दोघांच्या प्रेमकहाणीचा दुर्दैवी अंत का झाला?
जेव्हा नर्गिस यांनी विवाहित राज कपूरसाठी तत्कालिन गृहमंत्री मोरारजी देसाईंना फोन फिरवला होता! दोघांच्या प्रेमकहाणीचा दुर्दैवी अंत का झाला?
Uddhav Thackeray Meets Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, कारण नेमकं काय?
Uddhav Thackeray Meets Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, कारण नेमकं काय?
Priyanka Gandhi : काल पॅलेस्टीननंतर आज बांगलादेशचा मुद्दा, प्रियांका गांधींच्या बॅगेनं लक्ष वेधलं! पाकिस्तानी खासदार म्हणाला, आमच्यात तेवढी हिंमत नाही!
काल पॅलेस्टीननंतर आज बांगलादेशचा मुद्दा, प्रियांका गांधींच्या बॅगेनं लक्ष वेधलं! पाकिस्तानी खासदार म्हणाला, आमच्यात तेवढी हिंमत नाही!
India vs Australia 3rd Test : जैस्वाल, गिल, कोहली, पंत, रोहितला मिळून जमलं नाही ते एकट्या 11व्या क्रमांकावर आलेल्या आकाश दीपनं करून दाखवलं!
जैस्वाल, गिल, कोहली, पंत, रोहितला मिळून जमलं नाही ते एकट्या 11व्या क्रमांकावर आलेल्या आकाश दीपनं करून दाखवलं!
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, दोघांमध्ये 6-7 मिनिटे चर्चा, आदित्य ठाकरेही उपस्थित!
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, दोघांमध्ये 6-7 मिनिटे चर्चा, आदित्य ठाकरेही उपस्थित!
Embed widget