Pune News: गटारीला भाईगिरीची झिंग चढली, पुण्यातील कॅम्प परिसरात कोयता गँगचा धुमाकूळ, वाईन शॉप फोडलं, व्हिडिओ व्हायरल
Pune News: पुणे शहरात पुन्हा एकदा कोयता गॅंगची दहशत दिसून येत आहे. शहरात पुन्हा एकदा कोयता गँगच्या गुंडांनी दहशत घालण्यास सुरूवात केली आहे.
Pune News: पुणे शहरात पुन्हा एकदा कोयता गॅंगची (Koyata Gang) दहशत दिसून येत आहे. शहरात पुन्हा एकदा कोयता गँगच्या (Koyata Gang)गुंडांनी दहशत घालण्यास सुरूवात केली आहे. ऐन गटारीच्या दिवशीच कोयता गँगच्या टोळक्याने एका वाईन शॉपची तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील कॅम्प परिसरात रविवारी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोयता गँगची (Koyata Gang) दहशत वाढताना दिसत आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये अशा घटनो मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे चित्र दिसून येत आहे, पोलिस आणि प्रशासन या घटनांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या कोयता गँगच्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी देखील नागरिकांनी केली आहे. गेल्या वर्षभरापासून पुण्यात कोयता गँगच्या (Koyata Gang) गुंडांनी धुमाकूळ घातला आहे. काही दिवसांपुर्वी पुणे पोलिसांनी या गुंडावर कारवाईचा बडगा उगारला होता. सर्वांना पोलिस स्थानकामध्ये बोलावून तंबी देण्यात आली होती.
वाघोली, हडपसर, पुण्यातील मध्यवर्ती भाग याठिकाणी मोठ्या प्रमाणावर कोयता गँगची (Koyata Gang) दहशत समोर आली आहे. कोयता गँगमधील गुंड पुन्हा एकदा नागरिकांच्या मनात दहशत पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. यातूनच ते शहरात तोडफोड करत असल्याचं समोर आलं आलं. रविवारी पुणेकर गटारीनिमित्त पार्टी करत असताना ठिकठिकाणी कोयता गँगच्या गुंडांनी अनेकांना धमकावलं. लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 4 अज्ञात हल्लेखोरांनी एका वाईन शॉपची तोडफोड देखील केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
वाईन शॉपची तोडफोड केलेल्या दुकानाचं नाव न्यूयॉर्क वाईन शॉप असं नाव आहे. कॅम्प परिसरातील घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. कोयता गँगच्या या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी आता केली जात आहे. विशेष बाब म्हणजे, काही वर्षांपूर्वी देखील कोयता गँगच्या गुंडांनी अशाच एका वाईन शॉपची तोडफोड केली होती.