एक्स्प्लोर

Pune Crime News: पुण्यातील बनावट टेलिफोन एक्सचेंज प्रकरणी सूत्रधारासह तिघांना अटक; गेल्या आठ वर्षांपासून प्रकार सुरू? आंतरराष्ट्रीय कनेक्शन तपासलं जाणार

Pune Crime News: कोंढवा येथील बनावट टेलिफोन एक्स्चेंज प्रकरणात दहशतवादविरोधी पथकाने (ATS) तिघांना अटक केली आहे, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार ठाणे एटीएसच्या ताब्यात असल्याची माहिती आहे.

पुणे: गणेशोत्सवापुर्वी पुण्यात मोठी कारवाई करण्यात आली. कोंढवा येथील बनावट टेलिफोन एक्स्चेंज प्रकरणात दहशतवादविरोधी पथकाने (ATS) तिघांना अटक केली आहे, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार ठाणे एटीएसच्या ताब्यात असल्याची माहिती आहे. हे टेलिफोन एक्स्चेंज बेकायदेशीर असून, आरोपींनी शासनाची फसवणूक केली जात होती. हशतवादविरोधी पथकाने (ATS) पुण्यातील कोंढवा परिसरात बनावट टेलिफोन एक्स्चेंजवर टाकलेल्या छाप्यामध्ये जवळपास 3788 सिम कार्ड, 8 राउटर सापडले होते. सरकारी वकिलांनी या प्रकरणातील तिघांना पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. त्यानुसार न्यायाधीशांनी आरोपींना 6 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.(Pune Crime News)

पुण्यातील कोंढवा परिसरातील मिठानगर येथे असलेल्या एम. ए. कॉम्प्लेक्स परिसरात विदेशातून भारतात येणारे आंतरराष्ट्रीय कॉल भारतातील यंत्रणेला समजू न देण्यासाठी पुण्यातील कोंढवा येथे बनावट टेलिफोन एक्स्चेंज सेंटर सुरू करण्यात आले होते. आरोपींकडून गेल्या आठ वर्षांपासून हे बनावट दूरध्वनी केंद्र चालविण्यात येत असल्याची माहिती तपासात उघडकीस आली. दहशतवादविरोधी पथकाने नौशाद अहमद सिद्दिकी ऊर्फ कुमार (वय 32, रा. कोंढवा) आणि मोहम्मद उजैर शौकत अली अन्सारी ऊर्फ सोनू (29, भिवंडी) या दोघांना मंगळवारी (दि. 3), तर पीयूष गजभिये (29, रा. वर्धा) या आरोपीला बुधवारी (दि. 4) सकाळी अटक केली आहे.

पोलिस कोठडी सुनावल्यानंतर आता पोलिस आरोपींनी हे साहित्य कुठून आणलं, कसं आणले, त्यांचे इतर साथीदार कोण आहेत, त्यांना आंतरराष्ट्रीय कनेक्शन कसे -मिळाले, यात काही दहशतवादाचा अँगल आहे का, यामध्ये आणखी काही व्यक्तींचा समावेश आहे का? याचा तपास केला जाणार आहे.(Pune Crime News)

दरम्यान सरकारी वकिलांनी केलेल्या युक्तीवादानुसार, नौशाद अहमद सिद्दिकी ऊर्फ कुमार (वय 32, रा. कोंढवा) हा कोंढव्यात भाड्याच्या घरात राहत होता. हे तिघे एकमेकांचे मित्र आहेत. नौशाद आणि सोनू हे आठवी पास आहेत, तर पीयूषने संगणक डिप्लोमा केला आहे. तिघांनी ऑनलाइन ग्राहक मिळविले. गेल्या आठ महिन्यांपासून हे टेलिफोन एक्स्चेंज सुरू होते.

नेमकं काय आहे प्रकरण? 

विदेशातून भारतात येणारे इंटरनॅशनल कॉल भारतातील यंत्रणेला समजू न देण्यासाठी पुण्यातील कोंढव्यामध्ये बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटर सुरू होतं. या कारवाईत नौशाद अहमद सिद्दिकी या 32 वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कोंढव्यातील मिठा नगर येथे असलेल्या एम.ए.कॉम्प्लेक्स परिसरात अधिकृत एक्सचेंज सेंटर सुरू होतं. 

दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा दहशत विरोधी पथक सध्या तपास करत असून ताब्यात घेण्यात आलेल्या नौशादकडे पोलीस चौकशी (Pune Crime News) सुरू होती. 

संबधित बातम्या - Pune Crime News: पुण्यातील बनावट टेलिफोन एक्सचेंज प्रकरणात अपडेट; संशयित वर्षभरापासून कोंढव्यात वास्तव्यास असल्याची माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyche Bola : दादर-माहिममध्ये कुणाची हवा? ठाकरे, मनसे, शिवसेना; जनतेचा कौल कुणाला?#मुद्द्याचं बोलाAvadiche Khane Ani Rajkiya Tane Bane : Bharatshet Gogawale यांच्याशी निवडणुकीच्या धामधुमीत गप्पाMahesh Sawant : माहीमच्या मुस्लिम समाजाचा मला पाठिंबा, महेश सावंतांचं वक्तव्य ABP MAJHAPratibha Pawar Baramati|प्रतिभा पवार,रेवती सुळेंना बारामतीतील टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Sharad Pawar : काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
Embed widget