Pune News : Jee आणि IIT परिक्षेची पुर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवनातून विषबाधा; तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर
Jee आणि IIT पुर्वतयारी परिक्षाच्या (Food Poisoning) विद्यार्थ्यांना जेवनातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे
खेड,पुणे : पुणे जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. Jee आणि IIT पुर्वतयारी परिक्षाच्या (Food Poisoning) विद्यार्थ्यांना जेवनातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. रात्री बटाटा भाजी चपाती,डाल भात असा जेवनाचा मेन्यू होता. या मेन्यूमधून विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 100 विद्यार्थ्यांना त्रास सुरु झाला. त्यातील 60 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यातील 25 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचं समोर आलं. त्यातील तीन जणांची प्रकृती गंभीर आहे.
खेड तालुक्यातील कडुस येथील दक्षणा फाऊंडेशनमध्ये प्रकार घडला आहे. दक्षणा फाऊंडेशन येथील 550 विद्यार्थांनी रात्रीचे जेवन केलं होतं. त्यातील साधारण 60 विद्यार्थींना जुलाब,उलटीचा त्रास सुरु झाला. हा सगळा प्रकार पाहून विद्यार्थीनींना उपचारासाठी चांडोली ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर इतर मुलांनादेखील त्रास होऊ लागला आणि इतर मुलांच्या तपासणीसाठी कॉलेज कँम्पसमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची टीम दाखल झाली आहे.
दक्षणा फाऊंडेशन येथे देशातील विविध राज्यातुन JEE आणि IIT अशा विविध पूर्वपरीक्षेच्या तयारी अभ्यासक्रमासाठी निवासी आहेत. विद्यार्थींच्या जेवनातून विषबाधा झाल्याने विद्यार्थींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालं आहे. राजगुरुनगर पोलिसांसह डॉक्टरांची टिम चांडोली ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली आहे. तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असून बाकी सर्व विद्यार्थीची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
खेड तालुक्यातील कडुस येथील दक्षणा फाऊंडेशन ही संस्था सेवाभावी संस्था आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना ही संस्था JEE किंवा IIT च्या परिक्षेचं शिक्षण देते. या दोन्ही परिक्षेची विद्यार्थ्यांकडून तयारी करुन घेते. साधारण 400 ते 500 विद्यार्थ्यी शिकतात. देशातील अनेक भागातील आर्थिक परिस्थीती नीट नसलेले विद्यार्थी अभ्यासासाठी या संस्थेत येतात. सर्व विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन दिलं जातं. यात संस्थेतून हा प्रकार समोर आला आहे.
तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर
हा सर्व प्रकार घडल्यानंतर 25 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचं समोर आलं त्यातील तीन विद्यार्थ्यी गंभीर अवस्थेत आहे. त्यांना ऑक्सिजन लावल्याची माहिती आहे. मात्र बाकी सर्व विद्यार्थी धोक्याच्या बाहेर आहेत.
हेही वाचा :
माजी मुख्यमंत्र्यांचा जावई अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाणार? ऐन निवडणुकीत काँग्रेसला जबर धक्का!
माढ्याचा तिढा सुटल्यानंतर उत्तम जानकरांना शरद पवारांचं पहिलं गिफ्ट; विधानसभेची उमेदवारी जाहीर
दागिने विकून गाय घेतली, आता मेहनतीच्या जोरावर झाली करोडपती; महिलेच्या जिद्दीला देशाचा सलाम!