Pune ATS News : 4 दहशतवाद्यांचं शिक्षण कमी पण टेक्निकल नॉलेज जास्त, घरातच करायचे टेस्टिंगचे प्रयोग
घातपात प्रकरणी एटीएसने चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांची पोलीस कोठडीची मुदत वाढवण्यात आली आहे, अशी माहिती एटीएस अधिकाऱ्यांची कोर्टात दिली आहे.
Pune ATS News : घातपातप्रकरणी एटीएसने ( ATS, NIA )चार दहशतवाद्यांना(Pune ATS News ) अटक केली होती, या चारही आरोपींना आज न्यायालयात हजर केले होते. त्या चारही आरोपींची पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे, अशी माहिती एटीएस अधिकाऱ्यांनी दिली आहे. न्यायालयात दहशतवाद विरोधी पथकाकडून (arrest) चार दहशतवाद्यांना (terrorist) हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांच्या एटीएस कोठडीत 11 ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. या दहशतवाद्यांच्या शिक्षणापेक्षा त्यांना (technical knowledge) टेक्निकल नॉलेज जास्त असल्याचं तपासात समोर आलं आहे. त्यांनी अनेक वेबसाईट सर्च केल्या आणि त्या वापरल्या आहेत. अनेक टेक्निकल माहिती त्यांनी या माध्यमातून मिळवली असल्याचं देखील समोर आलं आहे.
बंदी असलेलं साहित्य जप्त
कोथरूड (kothrud) येथे दुचाकी चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या महंमद युनूस महंमद याकूब साकी (वय 24) आणि महंमद इम्रान महंमद युसूफ खान त्यानंतर अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (वय 32 रा, कोंढवा) याला तसेच आर्थिक मदत करणारा रत्नागिरी येथील मेकॅनिकल इंजिनीअर सिमाब नसरुद्दीन काझी याला एटीएसने अटक केली होती. त्यांचा ISIS संघटनेशी संबंध असल्याचं समोर आलं होतं. बाहेरच्या बाजारपेठांमध्ये ज्या साहित्यांना विकण्यास बंदी आहे, तेच संवेदनशील साहित्य या दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलं आहे आणि या दहशतवाद्यांनी या साहित्याचा वापर केल्याचंदेखील समोर आलं आहे.
कोर्टात ATS ने काय सांगितलं?
-या सर्व आरोपींचा एकमेकांशी यांचा संबंध आहे
-यातील एक आरोपी अनेक नावाने वेगवेगळ्या लोकांशी संपर्क करत होता
-या सगळ्यांसोबतच अनेकजण सहभागी असल्याची शक्यता आहे.
-आरोपींकडे मिळालेला डेटा तपासण्याच काम सुरू आहे
-या गुन्ह्याची व्याप्ती देशभर आहे. यासाठी तपास करावं लागणार आहे
-11 ऑगस्ट पर्यत एटीएस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
-सगळे अटक केले आरोपी ISIS शी संबधित तपासात उघड झालं आहे.
-चारही दहशवाद्यांनी अनेक वेबसाईट चेक केल्या. ज्या देशविरोधी कारवाई करत असतात
-या दहशवाद्यांशी एक व्यक्ती सतत संपर्क साधत असल्याचं समोर आलं आहे.
-मेल आणि फोनद्वारे तो व्यक्ती या दहशतवाद्यांना सूचना देत होता.
-राहत्या घरात अनेक टेस्टिंग केल्या होत्या.
-हे सगळे दहशतवादी कमी शिकलेले आहे. मात्र त्यांचं टेक्निकल नॉलेज त्या मानाने खूप जास्त आहे.
-सीमाब काझीला रत्नागिरीहून अटक केली आहे. त्याच्यावर दहशतवाद्यांना आर्थिक मदत करत असल्याचा आरोप आहे.
हेही वाचा-
NIA Raid Bhiwandi : भिवंडीच्या पडघ्यात NIA चा छापा; दहशतवाद्यांचा कॅशिअर अकीब नाचनला घेतलं ताब्यात