NIA Raid Bhiwandi : भिवंडीच्या पडघ्यात NIA चा छापा; दहशतवाद्यांचा कॅशिअर अकीब नाचनला घेतलं ताब्यात
ATS आणि NIA कडून सध्या महाराष्ट्रात धापेमारी केली जात आहे. त्याच आज भिवंडीतील पडघा येथे छापेमारी करण्यात आली. आयएसआयशी संबध असल्या प्रकरणी अकीब नाचन यांच्या घरी छापेमारी करण्यात आली.
NIA Raid Bhiwandi : ATS आणि NIA कडून सध्या महाराष्ट्रात (NIA Raid Bhiwandi) छापेमारी केली (Maharashtra ATS, NIA module) जात आहे. त्याच आज भिवंडीतील पडघा येथे छापेमारी करण्यात आली. आयएसआयशी संबध असल्या प्रकरणी अकीब नाचन यांच्या घरी छापेमारी करण्यात आली. अकीब नाचन (Aqib Nachan) याला एनआयएने चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
काही दिवसांपासून NIA चं मॉड्यूल (Maharashtra ATS, NIA module)) महाराष्ट्रामध्ये सक्रिय आहे. या मोड्यूलचा भाग म्हणून भिवंडीतील पडघा येथे छापेमारी करण्यात आली आहे. यापूर्वी पाच जणांना NIA ने अटक केली आहे. त्यात मुंबईतून एक, पडघ्यातून दोन, पुण्यातून दोन अशा पाच दहशतवाद्यांना अटक केली आहे. भिवंडीतील पडघ्यातून अटक केलेले झुल्फिकार अली बरोडावाला आणि जुबेर खान हे दोघे पडघ्यात भाड्याने राहत होते. या दोघांना अकीब नाचन याने आर्थिक मदत केल्याचा दावा NIA ने केला आहे. त्यामुळे अकीब नाचन याच्या घरावर NIA ने छापेमारी करुन त्याला ताब्यात घेतलं आहे.
अकीब नाचन कोण आहे?
अकीब नाचन याला गुजरात ATS ने 2022 मध्ये ताब्यात घेतलं होतं. ISIS च्या काही संस्था आहेत त्यातील अल सुफा या संघटनेशी त्याचा संबंध होता. त्यानंतर 2023 मध्ये त्याची सुटका करण्यात आली होती. त्यानंतर त्याने झुल्फिकार अली बरोडावाला आणि जुबेर खान यांना राहण्यासाठी भाड्याने फ्लॅट दिला होता आणि दोघांना आर्थिक मदतही करत होता. गुजरात ATS ने 2022मध्ये ताब्यात घेण्यापूर्वी त्याने आलिशान बंगला बांधला होता, या बंगल्यासाठी त्याच्याकडे पैसे आले कुठून याचा आता NIA कडून तपास केला जात आहे.
NIA, ATS ने पडकलेले एकमेकांच्या संपर्कात असल्याचं समोर
एनआयए आणि एटीएस या दोन वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी उद्ध्वस्त केलेली पुण्याच्या कोंढवा भागातील दहशतवाद्यांची मोड्युल्स एकमेकांच्या संपर्कात होती आणि एकमेकांना मदतही करत होती, हे आता स्पष्ट झालं आहे. कारण एनआयएने अटक केलेला झुल्फीकार अली बरोडावाला हा एटीएसने अटक केलेल्या मोहम्मद युसुफ खान आणि मोहम्मद युनुस साकी या दोघांना पैसै पुरवत असल्याच स्पष्ट झालं आहे. त्यानंतर महाराष्ट्र एटीएसने एनआयएच्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या बरोडावालाचा ताबा घेऊन त्याची चौकशी सुरु केली.
हेही वाचा-
महाराष्ट्रातून एटीएसने घातपाती कारवायांचा कट उधळला, 15 ऑगस्टला देशात घातपाताचा होता कट