Pune-Indapur Crime News: इंदापूर पोलिसांची मोठी कारवाई; 93 लाखांचा मुद्देमाल केला जप्त
इंदापूर पोलिसांनी शनिवारी रात्री केलेल्या कारवाईत 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. इंदापूर पोलीसांनी आत्तापर्यंत सात कारवायांमध्ये 2 कोटी 86 लाख 3 हजार 920 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Pune-Indapur Crime News: इंदापूर पोलिसांनी शनिवारी रात्री केलेल्या कारवाईत 93 लाख 23 हजार 920 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. इंदापूर पोलीसांनी आत्तापर्यंत सात कारवायांमध्ये 2 कोटी 86 लाख 3 हजार 920 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. इंदापूर पोलिसांनी शनिवारी रात्री 11 वाजता सरडेवाडी टोल नाका परिसरात नाकाबंदी दरम्यान कर्नाटक पासिंगंचा ट्रक पुण्याच्या दिशेने अवैद्य गुटखा घेऊन निघालेला असताना मोठ्या शिताफिने पकडला.
याकारवाईत 167 गोण्यात मानवी आरोग्यास घातक असलेला व विक्रीस बंदी असलेला 68 लाख 23 हजार 920 रुपये किमतीचा विमल कंपनीचा गुटखा व 25 लाख रुपये किमतींचा ट्रक असा एकूण 93 लाख 23 हजार 920 रुपये किमतीचा मुद्देमाल इंदापूर पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी सदर ट्रक चालकास इंदापूर पोलीसांनी अटक केली आहे. सदर ट्रक चालक व मालकाविरुध्द अन्न व सुरक्षा अधिनियम तसेच भारतीय कलम 328 व इतर कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नाकाबंदी दरम्यान संशयास्पद असलेला कर्नाटक पासिंग असलेला ट्रक तपासनीसाठी थांबवला होता. यावेळी चालकानी चुकीची माहिती दिली. प्लॅस्टिकचे खेळणे आणि साबुदाणा तयार करण्यासाठी लागणारे पावडर असल्याचं सांगितलं. मात्र पोलिसांना संशय येताच ट्रकची तपासणी केली. त्यात 68 लाखांचा गुटखा आणि 25 लाखांचा ट्रक असं एकूण 93 लाखांचा माल जप्त केला आहे. या ट्रकचा चालक आणि मालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतपर्यंतची अवैध गुटख्याबाबतची ही सातवी कारवाई आहे, अशी माहिती इंदापूर पोलिस ठाण्याचे टी. वाय. मुजावर यांनी दिली आहे.
यापुर्वी इंदापूर पोलिसांनी या संदर्भातील सहा कारवाया केल्या आहेत. त्यात लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. अनेकवेळा चालक वेगळी माहिती देत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा प्रकारच्या कारवाया होत नाही. मात्र इंदापूरच्या पोलिसांनी दिशाभूल न होऊ देता. चोकशी आणि योग्य पाहणी करत आतापर्यंत सात कारवाया केल्या आहे. त्यामुळे अवैध अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांना चांगलाचा धाक निर्माण झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
