एक्स्प्लोर
Nanded : नांदेडच्या शिवाजीनगरमध्ये पाच ते सात ठिकाणी आयकर खात्याचे छापे
नांदेडच्या शिवाजीनगरमध्ये पाच ते सात ठिकाणी आयकर खात्याने छापे टाकले आहेत. एका खाजगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर हे छापे टाकले गेले.

Nanded Income tax Raid (image Credit : nanded Reporter)
नांदेड : नांदेडच्या शिवाजीनगरमध्ये पाच ते सात ठिकाणी आयकर खात्याने छापे टाकले आहेत. एका खाजगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर हे छापे टाकले गेले. नांदेडमध्ये आज सकाळी भंडारी फायनान्स यांच्याकडे आयकर विभागाची चौकशी सुरू आहे. अली बाई टॉवर इथल्या दुकानात आणि आदिनाथ फायनान्स येथे 100 अधिकारी आणि सोबतच काही पथकं छापेमारी करत आहेत.
नांदेडमध्ये भंडारी हे फायनान्सचा व्यावहार करत होते. त्यांच्याकडे सकाळीच हे पथक दाखल झालं आहे. या पथकाकडून झाडाझडती सुरु आहे. औरंगाबाद, मुंबई आणि नाशिकचं आयकर विभागाचं पथक आहे. ही छापेमारी नेमकी कशासाठी केली जात आहे. यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही आहे.
आणखी वाचा
























