एक्स्प्लोर

खेडकर कुटुंबीयांचे पंकजा मुंडेंशी राजकीय संबंध? मुंडे प्रतिष्ठानला 12 लाखांची देणगी, तर मोहोटा देवीला चांदीचा मुकूट

Pooja Khedkar : खेडकर कुटुंबाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे. खेडकर कुटुंबाशी संपर्क होत नसल्याचं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे.

Pooja Khedkar : पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Probationers Pooja Khedkar) आणि त्यांच्या कुटुंबांला कोणाचा राजकीय वरदहस्त आहे, याची चर्चा सुरू आहे. अशातच आता या प्रकरणात आणखी एक खळबळजनक बाब समोर आली आहे. खेडकर कुटुंबीयांचे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासोबत संबंध असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 

पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान या ट्रस्टला मनोरमा खेडकर यांनी 12 लाख रुपयांची देणगी दिल्याचं समोर आलं आहे. तीन ऑक्टोबर 2023 ला चेकद्वारे ही देणगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी, यासाठी दिलीप खेडकर यांनी पाथर्डीमधील मोहटा देवीला चांदीचा मुकुट देखील अर्पण केला होता. तसेच, दिलीप खेडकर यांचे भाऊ माणिक खेडकर हे पाच वर्षे भाजपचे पाथर्डी तालुका अध्यक्ष राहिलेले आहेत.

खेडकर कुटुंबीयांशी संपर्क होईना 

खेडकर कुटुंबाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे. खेडकर कुटुंबाशी संपर्क होत नसल्याचं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे. खेडकर कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सात जणांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथकं तयार केली आहेत. पौड पोलिसांचं एक पथक खेडकर यांच्या घरी आज येऊन गेल्याची माहिती पौड पोलिसांनी दिली आहे. 

मनोरमा खेडकर यांच्यावर पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने पौड पोलिसांचं एक पथक बाणेर रस्त्यावर असलेल्या खेडकर यांच्या घराची पाहणी करून गेलं. खेडकर कुटुंबानं कुठलाही प्रतिसाद न दिल्यानं पोलीस निघून गेले. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मनोरमा खेडकर यांनी पिस्टल ने शेतकऱ्यांना धमकावण्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर पौड पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पौड पोलीस यासंदर्भात मनोरमा खेडकर यांची चौकशी करण्यासाठी आले होते. त्यामुळे आता पोलीस पुढील काय कारवाई करणार हे पाहवं लागेल. 

दरम्यान, वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रशिक्षण काळात बदल करण्यात आला आहे. तसेच, आठवडाभर वाशिम जिल्ह्यात वनविभाग आणि वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात  प्रशिक्षणाचा काळ घालवावा लागणार आहे.                       

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पुणेकरांना गुडन्यूज, गॅस बुकींगनंतर 96 तासांत सिलेंडर घरपोच; जिल्हाधिकारी डुडींचे एजन्सींना आदेश
पुणेकरांना गुडन्यूज, गॅस बुकींगनंतर 96 तासांत सिलेंडर घरपोच; जिल्हाधिकारी डुडींचे एजन्सींना आदेश
लक्ष्मण हाकेंकडून बारामती पोटनिवडणुकीची तयारी; पवार कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया, युगेंद्र स्पष्टच बोलले
लक्ष्मण हाकेंकडून बारामती पोटनिवडणुकीची तयारी; पवार कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया, युगेंद्र स्पष्टच बोलले
Bhimashankar Temple Nishikant Dubey: महाराष्ट्रातील भाविकांना महाशिवरात्रीलाही शंकराचं दर्शन घेऊ दिलं नाही पण भाजपच्या खासदारासाठी नियम डावलून भीमाशंकर मंदिराचे दरवाजे उघडले, भाविकांमध्ये संतप्त भावना
महाराष्ट्रातील भाविकांना महाशिवरात्रीलाही शंकराचं दर्शन घेऊ दिलं नाही, पण भाजपच्या खासदारासाठी नियम डावलून भीमाशंकर मंदिराचे दरवाजे उघडले; भाविकांमध्ये संतप्त भावना
Pimpri Chinchwad Crime : आधी मोबाईल फॉर्मेट केला, नंतर 19 वर्षीय तरुणानं राहत्या घरात सीट बेल्टनं आयुष्य संपवलं; पिंपरी-चिंचवडमधील घटनेनं खळबळ
आधी मोबाईल फॉर्मेट केला, नंतर 19 वर्षीय तरुणानं राहत्या घरात सीट बेल्टनं आयुष्य संपवलं; पिंपरी-चिंचवडमधील घटनेनं खळबळ

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mira Bhayander Hospital News: आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील हादरवणारी घटना
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Israel Iran Conflict : युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
Embed widget