एक्स्प्लोर

दृष्टीदोषाचं सर्टिफिकेट, मग ऑडी चालवण्याचं लायसन्स कसं मिळालं? पूजा खेडकरचं पितळ उघडं पडलं, LBSNAA नंही मागवला अहवाल

IAS Probationer Dr. Pooja Khedkar: अंशतः अंध, मग ऑडी चालवण्याचा परवाना कसा मिळाला? डॉ. पूजा खेडकर अडचणींच्या भोवऱ्यात, LBSNAA नंही मागवला अहवाल

IAS Probationer Pooja Khedkar : पुणे : पुण्यातील (Pune News) ट्रेनी आयएएस अधिकारी डॉ. पूजा खेडकर (Trainee IAS Officer Dr. Pooja Khedkar) सध्या भलत्याच चर्चेत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांपेक्षा जास्त रुबाब करणाऱ्या या ट्रेनी आयएएस (Trainee IAS Officer) अधिकाऱ्याची चर्चा रंगली आहे ती, त्यांच्यावर झालेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे. खासगी गाडीवर लाल दिवा आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अँटी चेंबरवर कब्जा करणाऱ्या प्रोबेशनरी IAS अधिकारी डॉ. पूजा खेडकर (Dr. Pooja Khedkar) यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आता त्यांची वाशिमला प्रोबेशनरी आयएएस म्हणून बदली झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याचं अँटी चेंबर बळकावणं, खासगी ऑडी गाडीवर अंबर दिवा लावणं ते गाडीवर महाराष्ट्र शासन असे बोर्ड लावणं असे आरोप त्यांच्यावर आहेत. पुणे (Pune Latest Updates) जिल्ह्यात प्रोबेशन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्या रूजू झाल्या होत्या, पण या आरोपानंतर त्यांची उचलबांगडी झाली आहे. 

अधिकारी होण्यापूर्वीच थाटात रुबाब करणाऱ्या आयएएस प्रोबेशनर आयएएस डॉ. पूजा खेडकरांचे कारनामे बाहेर आल्यानंतर त्यांनी आजवर केलेल्या बनवाबनवीचे तपशीलही उघड होत आहेत. त्यांच्या सोशल हँडलवरील बायोमध्ये त्या EX IRS (IT) असा उल्लेख का करतात? त्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळाला आहे की, विविध अपंग श्रेणीचा की दोन्हीचा? अंशतः अंध असतील तर त्यांची बहुचर्चित ऑडी चालवण्याचा परवाना कसा मिळाला? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. 

LBSNAA नं मागवला डॉ. पूजा खेडकर यांच्याबद्दल सविस्तर अहवाल

लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (LBSNAA) ने महाराष्ट्र सरकारकडून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ट्रेनी आयएएस अधिकारी डॉ. पूजा खेडकर यांच्याबद्दल सविस्तर अहवाल मागवला असल्याची माहिती समोर येत आहे. ट्रेनी IAS अधिकारी डॉ. पूजा खेडकर यांनी IAS होण्यासाठी आपण अंशतः अंध असल्याचं प्रमाणपत्र दिलं होतं. तसेच, त्यांनी पोस्ट मिळवण्यासाठी बनावट OBC जात प्रमाणपत्र दिल्याचाही आरोप त्यांच्यावर केला जात आहे.

वादानंतर नागरी सेवा परीक्षेत निवडीसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबाबतही आता नवी माहिती समोर आली आहे. त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे (UPSC) सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दृष्टिहीन आणि मानसिक आजारी असल्याचा दावा केल्याची माहिती मिळत आहे. 

अंशतः अंध, पण तरिही स्वतःच्या मालकीची ऑडी, गाडी चावण्याचा परवानाही... 

पूजा खेडकर यांनी या अपंगत्व प्रमाणपत्राचा वापर करून यूपीएससीमध्ये निवडीसाठी विशेष सवलत मिळवली होती. एवढंच नाही तर परीक्षेत कमी गुण मिळूनही सवलतींमुळे पूजा खेडकर यांनी परीक्षा उत्तीर्ण रेली. त्यांनी UPSC मध्ये 841 ऑल इंडिया रँक (AIR) मिळवला होता. तसेच, अपंगत्वाचं प्रमाणपत्र दिल्यामुळे त्याची पुष्टी करण्यासाठी वैद्यकीय चाचणी द्यावी लागणार होती. मात्र, पूजा यांनी या-ना त्या कारणांनी तब्बल 6 वेळा वैद्यकीय चाचणीस सहभागी होण्यास नकार दिला. 

अंशतः अंध असूनही ऑडी चालवणाऱ्या पूजा यांनी वैद्यकीय चाचणी का टाळली? 

अपंगत्वाचं प्रमाणपत्र देऊन परीक्षा उत्तीर्ण केलेल्या पूजा खेडकर यांना एक, दोन नाहीतर तब्बल सहा वेळा वैद्यकीय तपासणीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र, पूजा खेडकर यांनी वैद्यकीय तपासणी प्रक्रियेत वेगवेगळ्या 6 वेळा सहभागी होण्यास नकार दिला. 22 एप्रिल 2022 रोजी दिल्लीच्या एम्समध्ये त्यांना पहिल्या वैद्यकीय तपासणीसाठी बोलावण्यात आलं होतं. पण त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं सांगून तपासणीसाठी जाणं टाळलं. त्यानंतर पुन्हा 26 आणि 27 मे रोजी दिल्लीच्या एम्स आणि सफदरजंग रुग्णालयात घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय चाचण्याही त्यांनी या ना त्या कारणानं टाळल्या. त्यानंतर 1 जुलैच्या चाचणीसाठीही कारण देत दांडी मारली. 

त्यांनी 26 ऑगस्ट 2022 रोजी वैद्यकीय तपासणीसाठी सहमती दर्शवली, तरीदेखील 2 सप्टेंबर रोजी अनिवार्य असलेल्या MRI साठीही गैरहजर राहिल्या. महत्त्वाची बाब म्हणजे, जे अपंगत्त्वाचं प्रमाणपत्र पूजा खेडकर यांनी दिलं होतं. त्याचीच शहानिशा करण्यासाठी MRI केला जाणार होता. या वैद्यकीय तपासण्यांना उपस्थित राहण्याऐवजी पूजा खेडकर यांनी बाहेरील केंद्रातून MRI रिपोर्ट सादर केला होता. मात्र, युपीएससीनं हा रिपोर्ट नाकारला होता. 

डॉ. पूजा खेडकर यांच्या निवडीला UPSC नं दिलेलं आव्हान 

जिल्हाधिकाऱ्यांपेक्षाही जास्त रुबाब दाखवणाऱ्या ट्रेनी आयएएस अधिकारी डॉ. पूजा खेडकर यांच्या निवडीला यूपीएससीनंही आव्हान दिलेलं. UPSC नं खेडकरांच्या निवडीला केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (CAT) मध्ये आव्हान दिलं होतं. त्यानंतर केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणानं पूजा खेडकरांविरोधात निर्णय दिला होता. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांच्या विरोधात निर्णय देऊनही त्यांचं एमआरआय प्रमाणपत्र स्वीकारण्यात आलं, ज्यामुळे त्यांची आयएएस नियुक्ती निश्चित झाली. अपंगत्वाच्या दाव्याव्यतिरिक्त, पूजा खेडकरच्या ओबीसी नॉन-क्रिमी लेयर दर्जाच्या दाव्यांमध्येही विसंगती आढळून आली.

IAS ची पात्रता कशी मिळवली?

पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती 40 कोटी असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. त्यांच्या वडिलांची संपत्ती लक्षात घेता पूजा खेडकर यांची ओबीसी नॉन क्रिमी लेअर दर्जासाठी पात्र कशा ठरल्या? हा मोठा प्रश्न आहे, असं आरआयटीचे कार्यकर्ते विजय कुंभार यांनी म्हटलं आहे. दिलीप खेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर 2024 ची लोकसभा निवडणूक लढवली होती, मग पूजा खेडकर नॉन क्रिमी लेअरमध्ये कशा मोडतील? असा सवालही आरआयटीचे कार्यकर्ते विजय कुंभार यांनी उपस्थित केला आहे. तसेच, पूजा खेडकर यांनी मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचं सांगितलं होतं. तसेच, अंशतः अंध असून विविध प्रकारच्या व्याधींनी ग्रस्त असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तरीदेखील पूजा खेडकर यांनी वैद्यकीय चाचणीत सहभागी होण्यास वारंवार नकार दिला आणि तरीसुद्धा त्या आयएएससाठी पात्र कशा ठरल्या, असा प्रश्नही विजय कुंभार यांनी उपस्थित केला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report on Aditya Thackeray vs Eknath Shindeठाकरे-शिंदे आमनेसामने, त्या बैठकीत नेमकं काय घडलंKunal Kamra Controversy Shiv Sena Todfod :  कुणाल कामराचं वादग्रस्त विडंबन, राजकारणात टीकेचा सूरSpecial Report Bulldozer Action Nagpur Violence : नागपुरात हल्लेखोरांविरोधात पालिका अॅक्शन मोडवरDharavi Fire Cylinder Blast : धारावीत सिलेंडरच्या वाहनाला आग, सिलेंडरच्या स्फोटांनी धारावी हादरली!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
OTT Web Series: OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Embed widget