(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IAS Pooja Khedkar : IAS पूजा खेडकरांच्या डाव्या गुडघ्यात इजा नाही? डॉक्टरांच्या चौकशीनंतर पालिका आयुक्त म्हणाले...
IAS Pooja Khedkar :वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरला देण्यात आलेलं अपंगत्वाचे प्रमाणपत्र खोटं नाही, असा दावा पिंपरी पालिकेच्या वायसीएमचे अधिष्ठाता राजेश वाबळेंनी केला होता.
IAS Pooja Khedkar : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरला (IAS Pooja Khedkar) देण्यात आलेलं अपंगत्वाचे प्रमाणपत्र खोटं नाही, असा दावा पिंपरी पालिकेच्या वायसीएमचे अधिष्ठाता राजेश वाबळेंनी केला होता. मात्र आज वाबळे, ऑर्थोपेडिक, फिजिओथेरपी विभागासह पूजाला मदत करणाऱ्या प्रत्येकाची चौकशी सुरू झाली आहे. एबीपी माझाने पूजा खेडकरसह वायसीएम रुग्णालयाची पोलखोल करणारी कागदपत्रे समोर आणली त्यानंतर पालिकेचे आयुक्त शेखर सिंहांना याबाबत पावले उचलण्यास सुरूवात केली. त्यांनी वैद्यकीय विभागाच्या सर्व प्रमुखांची चौकशी केली.
खरंच पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) डाव्या गुडघ्यात आधु आहे का? नसेल तर मग कोणत्या आधारावर आपण प्रमाणपत्र दिलं? याबाबत सविस्तर अहवाल बनवा, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने याबाबत आधीच चौकशीचे आदेश दिलेत. मात्र आम्ही दिलेलं अपंगत्वाचे प्रमाणपत्र बनावट नाही, असा दावा डॉक्टर वाबळेंनी केला होता. मात्र आता त्याच वाबळेंसह डॉक्टरांची आणि मदत करणाऱ्या प्रत्येकाची चौकशी आयुक्तांनी सुरू केली आहे. आयुक्तांनी चौकशीअंती भाष्य करेन, असं म्हणत तूर्तास तरी अधिकच बोलणं टाळलं आहे.
IAS पूजा खेडकरचे (IAS Pooja Khedkar) अपंगत्वाचे प्रमाणपत्र खोटं आहे का? यावर शिक्कामोर्तब करणारी कागदपत्रे एबीपी माझाने समोर आणली. त्यानंतर पिंपरी पालिकेचे आयुक्त शेखर सिंह खडबडून जागे झालेत. आयुक्तांनी वैद्यकीय विभागाच्या सगळ्या प्रमुखांना चौकशीसाठी बोलावून घेतलं आहे. यात वायसीएमचे अधिष्ठाता राजेश वाबळे, ऑर्थोपेडिक प्रमुख, फिजिओथेरपीच्या प्रमुखांसह ज्यांचा ज्यांचा पूजा खेडकरांशी संबंध आला त्या सर्वांची ते चौकशी होत आहे.
याबाबतीत एबीपी माझाशी बोलताना डॉ. राजेश वाबळे म्हणाले, पूजा खेडकरने दिलेल्या प्रमाणपत्रामध्ये 40 टक्के दिव्यांग असल्याचं लिहण्यात आलेलं आहे. त्यांंना आम्ही प्रमाणपत्रामध्ये जी टक्केवारी लिहण्यात आलेली ती 7 टक्के इतकी होती. कोणत्याही गोष्टीसाठी लागणारे दिव्यांग प्रमाणपत्रासाठी 40 टक्के दिव्यांगपणा लागतो. पूजा खेडकरला (IAS Pooja Khedkar) अहमदनगरच्या रूग्णालयातून ते प्रमाणपत्र 2021 साली मिळालेलं होतं. मात्र, तरीदेखील पूजा खेडकरने पुण्यातील रूग्णालयात अर्ज केला. त्यानंतर पुण्यातील रूग्णालयातून 7 टक्के दिव्यांगपणा असल्याचं प्रमाणपत्र दिल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
आयएएस अधिकारी पूजा खेडकरला (IAS Pooja Khedkar) पिंपरीतील वाय.सी.एम रुग्णालयाने सात टक्के दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र दिलं होतं. यानंतर वायसीएम रुग्णालयावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. त्यानंतर आता आयुक्तांनी वैद्यकीय विभागाच्या सगळ्या प्रमुखांना चौकशीसाठी बोलावून घेतलं आहे.
दोन दिव्यांग प्रमाणपत्र एकत्र करून नवीन प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर
पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांनी अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून सुरूवातीला दोन दिव्यांग प्रमाणपत्र काढली होती. नंतर त्या दोन्ही अपंग प्रमाणपत्रांचे एकत्रिकरण करून एकच प्रमाणपत्र देण्यात आलं असून त्यामध्ये पूजा खेडकर या 51 टक्के अपंग असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून पूजा खेडकर यांना दोन प्रमाणपत्र देण्यात आले होते. नंतर ते दोन्ही प्रमाणपत्रं एकत्र करून एकच दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आले होते. 2018 साली जिल्हा रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय मंडळाने दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रात खेडकर यांना 40 टक्के दिव्यांग तर 2021 साली मानसिक आजाराच्या प्रमाणपत्रात 20 टक्के दिव्यांग असल्याच प्रमाणपत्रात नमूद असल्याचे डॉ. संजय घोगरे यांनी सांगितले आहे.