एक्स्प्लोर

वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरांच्या आईला मोठा धक्का, मनोरमा खेडकरची येरवडा जेलला रवानगी

मनोरमा खेडकरांचे (Manorama Khedkar) काही दिवसांपूर्वी स्थानिक शेतकऱ्यांना धमकावतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते.

पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar)  यांच्या आई मनोरमा  खेडकरांना (Manorama Khedkar)  14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर मनोरमा खेडकरांनी जामीन अर्ज केला. मात्र हा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे.   शेतकऱ्यांना धमकवल्याप्रकरणी मनोरमा खेडकर अटकेत आहेत. मनोरमा खेडकर यांच्या बंगल्यातून पुणे पोलिसांनी (Pune Police)  पिस्तूल जप्त केले आहे. त्याचबरोबर पिस्तुलातील काही गोळ्या देखील जप्त केल्या आहेत. पिस्तुलाचा धाक दाखवून शेतकऱ्यांना धमकावल्याचा मनोरमा खेडकर यांच्यावर आरोप आहे. त्यासाठी पौड पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर त्यांचे पिस्तूल जप्त करण्यात आलेय.

मनोरमा खेडकर यांना अटक केल्यानंतर दोनदा पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पहिल्यांदा दोन दिवस आणि दुसऱ्यांदा देखील दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीसांची चौकशी पूर्ण झाली असे मानून न्यायालयाने त्यांना 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे  त्यांची रवानगी येरवडा कारागृहात होणार आहे. 

सात जणांविरोधात गुन्ह्याची नोंद 

मनोरमा खेडकरांच्या वकिलांनी जामीन अर्ज केला असून त्यांना लवकरात लवकर जामीन मिळावा यादृष्टीने प्रयत्न सुरु करण्यात आले. मात्र कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.  या प्रकरणात सात जणांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र या सात जणांपैकी मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली आहे. तर दिलीप खेडकर यांनी 25 जुलैपर्यंत अटकपूर्व जामीन मिळवला आहे. मात्र इतर आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाही.

मनोरमा खेडकरचे धमकावण्याचे  व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

मनोरमा खेडकरांचे (Manorama Khedkar) काही दिवसांपूर्वी स्थानिक शेतकऱ्यांना धमकावतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. पुणे पोलिसांशी देखील तिने हुज्जत घातली होती. गेल्या काही दिवसांपासून मनोरमा खेडकरचा तपास पोलिस करत होते. आज अखेर पोलिसांनी मनोरमा खेडकरला (Manorama Khedkar) महाड मधील हॉटेलमधून अटक केली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करुन पोलिस त्यांना पुण्याला घेऊन आले.   मनोरमा खेडकरवर (Manorama Khedkar) जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे कलम 307 वाढवण्यात आले आहे. आधी फक्त शेतकऱ्यांना धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

हे ही वाचा :

Pooja Khedkar: पूजा खेडकरकडून पोलिसांसमोर हजर राहण्यास टाळाटाळ?, पुणे पोलिसांनी पाठवली दुसरी नोटीस, अद्याप वाशिममध्येच मुक्कामी

                                                                                 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget