(Source: ECI/ABP News/ABP Majha)
घराला कुलुप लावून पसार झालेल्या मनोरमा खेडकरांचा आणखी एक व्हिडीओ समोर, पुणे पोलिसांशी कचाकचा भांडल्या
मनोरमा खेडकर यांचा हा व्हिडीओ 2022 मधील ही असून पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने पुरावा म्हणून ती रेकॉर्ड केलीय. खेडकर कुटुंबाचा पुण्यातील बाणेर रस्त्यावर ओम दीप नावाचा बंगला आहे.
पुणे : वादग्रस्त ट्रेनी आयएएस (Trainee IAS Officer) पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांची सध्या सर्वत्र चर्चा रंगलेली असतानाच त्यांच्या आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांचा अरेरावी करतानाचा व्हिडिओ समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मनोरमा खेडकर यांनी मुळशी (Mulshi) तालुक्यातील शेतकऱ्यांवरील दादागिरीनंतर आता पुण्यात पोलिसांशी हुज्जत घालतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. आता या प्रकरणावरून मनोरमा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुणे पोलिसांवर पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकर यांनी अरेरावी केली होती. त्यानंतर मुळशी (Mulshi) तालुक्यातील शेतकऱ्यांवर दादागिरी त्यातच आता मनोरमा खेडकर यांचा एक जुना व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मनोरमा खेडकर पुणे पोलिसांशी हुज्जत घालत आहे. मेट्रोचं साहित्य बंगल्यासमोर ठेवल्यामुळे मनोरमा खेडकर मेट्रो अधिकारी आणि पोलीसांसोबत हुज्जत घालताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
2022 मधील व्हिडीओ व्हायरल
मनोरमा खेडकर यांचा हा व्हिडीओ 2022 मधील ही असून पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने पुरावा म्हणून ती रेकॉर्ड केलीय. खेडकर कुटुंबाचा पुण्यातील बाणेर रस्त्यावर ओम दीप नावाचा बंगला आहे. या बंगल्याच्या समोर गेल्या काही काळापासून मेट्रोच काम सुरू आहे. या कामासाठी असलेले साहित्य मेट्रो कर्मचाऱ्यांनी खेडकर यांच्या बंगल्यासमोरील फुटपाथवर ठेवले होते. त्यावरून मनोरमा खेडकर यांनी मेट्रो कर्मचाऱ्यां सोबत वाद सुरू केला. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती चतुःश्रृंगी पोलिसांना दिल्यानंतर चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यातील कर्मचारी तिथे पोहचले. मात्र मनोरमा खेडकर यांनी त्यांच्याशी देखील वाद घातला.
मुळशीतील व्हायरल व्हिडीओनंतर पूजा खेडकरांच्या आईवर गुन्हा दाखल
पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्यावर पौड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने पौड पोलिसांचं एक पथक बाणेर रस्त्यावर असलेल्या खेडकर यांच्या घराची पाहणी करून गेलं. खेडकर कुटुंबानं कुठलाही प्रतिसाद न दिल्यानं पोलिस निघून गेले. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मनोरमा खेडकर यांनी बंदुकीने शेतकऱ्यांना धमकावण्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर पौड पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पौड पोलिस यासंदर्भात मनोरमा खेडकर यांची चौकशी करण्यासाठी आले होते. पण त्यांच्या घरी कुणीही नसल्याने पोलिस परत आले.
हे ही वाचा :