एक्स्प्लोर

Kunbi Certificate for Maratha Community: पुणे, पश्चिम महाराष्ट्रात कुणबी प्रमाणपत्र कसं काढाल? कोणती कागदपत्र लागतील? जाणून घ्या A टू Z माहिती

Kunbi Certificate for Maratha Community: सदर जीआरच्या अंमलबजावणीमुळे पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजातील नागरिकांना ‘कुणबी’ जात प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Kunbi Certificate for Maratha Community: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उभारलेल्या आंदोलनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. हैदराबाद गॅझेटिअरच्या आधारे शासनाने एक महत्त्वाचा शासन निर्णय (जीआर) जाहीर केला असून, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. सदर जीआरच्या अंमलबजावणीमुळे पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजातील नागरिकांना ‘कुणबी’ जात प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

या नियमावलीनुसार कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कोणती प्रक्रिया आहे, कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत आणि कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील, याबाबत सरकारने स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. अनेकांना याविषयी अजूनही संभ्रम असल्याने, नागरिकांना एकाच ठिकाणी आवश्यक ती सर्व माहिती मिळावी, यासाठी सरकारने ही SOP जाहीर केली आहे. 

गावपातळीवर विशेष समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांमध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत सचिव आणि कृषी विभागाचे अधिकारी यांचा समावेश असणार आहे. संबंधित समितीने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे सक्षम प्राधिकरणाकडून जात प्रमाणपत्र जारी करण्यात येईल. 

मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र कसे काढावे? आणि अर्जाची प्रक्रिया कशी असेल? (How to get Maratha-Kunbi caste certificate?)

अर्जदाराने जात प्रमाणपत्रासाठी थेट उपविभागीय अधिकारी (SDO) यांच्याकडे अर्ज सादर करावा. हा अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याची पडताळणी स्थानिक पातळीवरील समितीकडे सुपूर्द केली जाईल. या समितीमार्फत अर्जदाराची वंशावळी तपासली जाईल. तसेच अर्जासोबत जोडलेले जुन्या जमीन नोंदी, ग्रामपंचायतीचे दाखले, रहिवासी प्रमाणपत्र, वाडवडिलांची नोंदवही यांसारख्या कागदपत्रांची बारकाईने तपासणी केली जाईल. चौकशी पूर्ण झाल्यानंतर तयार करण्यात आलेला अहवाल उपविभागीय अधिकाऱ्याकडे पाठवला जाईल. या अहवालाच्या आधारे प्रमाणपत्र देण्याचा अंतिम निर्णय उपविभागीय अधिकारी घेतील. यासाठी शासनाने समिती सदस्यांना विशेष प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रशिक्षणामध्ये जात प्रमाणपत्र काढण्याची नियमावली, चौकशी प्रक्रिया, अहवाल लेखनाचे निकष यासारख्या महत्त्वाच्या बाबींचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया (Process for obtaining Maratha-Kunbi caste certificate)1) मराठा कुणबी प्रमाणपत्रासाठी उपविभागीय अधिकारी (SDO) यांच्याकडे अर्ज करावा. 

२) उपविभागीय अधिकारी या अर्जाची पडताळणी स्थानिक समितीकडे पाठवेल 

3) ही  समिती अर्जदाराची वंशावळ तपासणी करेल 

4) यानुसार जुन्या नोंदी, ग्रामपंचायत दाखले, रहिवासी दाखला, वाडवडिलांच्या नोंदी यांसारखे कागदपत्र तपासले जातील

5) चौकशीचा अहवाल मिळाल्यानंतर उपविभागीय अधिकारी हे अर्जदाराला प्रमाणपत्र देण्याचा किंवा नाकारण्याचा निर्णय घेतील

मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (Documents required for Maratha Kunbi caste certificate)

1) जर अर्जदार भूधारक, भूमिहीन, शेतमजूर किंवा बटईने शेती करणारा असेल, तर त्या संबंधित जमीनधारकतेचा पुरावा सादर करणे आवश्यक.

2) वरील पुरावा उपलब्ध नसल्यास, अर्जदाराने 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी त्यांचे पूर्वज स्थानिक क्षेत्रात राहत होते, याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक.

3) अर्जदाराच्या गावातील किंवा कुलातील नातेसंबंधीत व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास, त्यांचे नातेसंबंध सिद्ध करणारे प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक.

4) याशिवाय अर्जासोबत इतर कोणतेही पुरावे (जसे की जुनी कागदपत्रे, उत्पन्न दाखले, शालेय दाखले इ.) जोडता येतील. 

आणखी वाचा 

How To Get Kunbi Certificate: 21 ते 45 दिवसांत मिळणार कुणबी प्रमाणपत्र; कसा अर्ज अन् कुठे अर्ज करायचा?, A टू Z माहिती

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tara Sutaria Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार
मुंबईत डिटर्जंट पावडर वापरुन बनावट दूध, व्हिडिओ व्हायरल; सांगलीत चीनमधून आलेल्या बेदाण्याचा साठा
मुंबईत डिटर्जंट पावडर वापरुन बनावट दूध, व्हिडिओ व्हायरल; सांगलीत चीनमधून आलेल्या बेदाण्याचा साठा
ऐन तिशीत हाडं कटकट वाजतात? गुडघे ठणकतात? खा 5 पदार्थ, हाडांसाठी बेस्ट
ऐन तिशीत हाडं कटकट वाजतात? गुडघे ठणकतात? खा 5 पदार्थ, हाडांसाठी बेस्ट

व्हिडीओ

Sharad Pawar - Ajit Pawar शरद पवारांशी बोलण्यासाठी अजितदादा अदानींच्या खुर्चीवर बसले, पुढे काय झालं?
Solapur Congress : सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
Uddhav Thackeray on BJP :  काहीही झाले तरी भाजपला हरवणारच, 16 तारखेला जल्लोष करायचय, उद्धव ठाकरेंचा घणाघात
Sharad Pawar - Ajit Pawar : अदानींना फ्रेम देताना सहज सावरलं, पवार काका-पुतण्यामधलं प्रेम दिसलं
Ajit Pawar Welcome Adani : गौतमभाईsss वेलकम टू बारामती... अजितदादांकडून उत्साहाने अदानींचं स्वागत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tara Sutaria Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार
मुंबईत डिटर्जंट पावडर वापरुन बनावट दूध, व्हिडिओ व्हायरल; सांगलीत चीनमधून आलेल्या बेदाण्याचा साठा
मुंबईत डिटर्जंट पावडर वापरुन बनावट दूध, व्हिडिओ व्हायरल; सांगलीत चीनमधून आलेल्या बेदाण्याचा साठा
ऐन तिशीत हाडं कटकट वाजतात? गुडघे ठणकतात? खा 5 पदार्थ, हाडांसाठी बेस्ट
ऐन तिशीत हाडं कटकट वाजतात? गुडघे ठणकतात? खा 5 पदार्थ, हाडांसाठी बेस्ट
नऊवारीत आई अन् घोंगडं घेतलेला बाप जेव्हा IPS लेकासोबत पहिल्यांदा विमानातून प्रवास करतात, पाहा फोटो
नऊवारीत आई अन् घोंगडं घेतलेला बाप जेव्हा IPS लेकासोबत पहिल्यांदा विमानातून प्रवास करतात, पाहा फोटो
Solapur Municipal Election: सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
Sangli News: तासगाव, सांगलीत अफगाणिस्तानातून तस्करी केलेला, घातक केमिकलचा वापर करून बनवलेला बेदाणा विक्रीस
तासगाव, सांगलीत अफगाणिस्तानातून तस्करी केलेला, घातक केमिकलचा वापर करून बनवलेला बेदाणा विक्रीस
सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
Embed widget