Bhagat Singh Koshyari : ‘मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही; राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्यानं चर्चा
‘मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही, असं वक्तव्य भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. पुण्यातील डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरच्या कार्यक्रमात कोश्यारी यांनी हे वक्तव्य केलं आहे.
Bhagat Singh Koshyari : ‘मी स्वत:ला राज्यपाल (Governer) मानत नाही, असं वक्तव्य भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांनी केलं आहे. पुण्यातील (pune) डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरच्या वतीने वार्षिक पुरस्कार सोहळ्यात कोश्यारी यांनी हे वक्तव्य केलं आहे. कोश्यारींच्या या वक्तव्यामुळं ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
नेमकं काय घाडलं होतं?
राज्यपाल यांचे भाषण सुरू झाले. त्यावेळी त्यांच्या समोरील बाजूला व्हिडीओ रेकॉर्डिंग करणाऱ्याच्या मागे एक महिला बसली होती. त्या महिलेला व्यासपीठावरील राज्यपाल दिसत नव्हते. त्यामुळे तिने राज्यपालांना दुसर्या बाजूच्या डायसवर येऊन बोलण्याची विनंती केली. त्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तुम्हाला भाषण ऐकायचं आहे की बघायचं आहे, असा मिश्किलपणे प्रश्न विचारताच सभागृहात एकच हशा पिकला. कोश्यारी म्हणाले. ‘मैं मानता ही नहीं हूं की, मैं राज्यपाल हूँ’ तुम्ही जसे बोलणार, तसे मी करणार. तुम्ही बोला’ असं राज्यपाल म्हणाले.
वादग्रस्त विधानामुळे कायम चर्चेत
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची बरीच वक्तव्यं वादग्रस्त ठरली आहे. त्यांनी यापूर्वी देखील अनेकदा वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत. त्यामुळे सर्वस्तरावरुन त्यांच्यावर टीकाही झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्यानंतर त्यांचा राज्यभर निषेध नोंदवला गेला आहे. मात्र तरीही राज्यपालांनी कोणत्याही वक्तव्याबाबत माफी मागितली नाही. यावेळी देखील त्यांनी मी स्वत:ला राज्यपाल समजत नाही असं म्हणत नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. आता यावर काय प्रतिक्रिया काय येते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
राज्यपालांना पदावरुन हटवा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी औरंगाबादमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्या विरोधात महाराष्ट्राभर आंदोलनं झाली. पुण्यातच नाही तर राज्यभरात त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला होता. भाजप वगळता सर्वच पक्षीयांनी त्यांच्या विरोधात आंदोलनं केली होती. त्यानंतर राज्यपालांना हटवा अशी मागणी सर्वस्तरावरुन होत आहे.
राज्यपालांच्या निषेधार्थ पुण्यात 13 डिसेंबरला बंदची हाक
खासदार उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती यांनीदेखील आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यपालांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी उदयनराजे भोसलेंनी केली आहे. त्याच्या निषेधार्थ पुण्यात 13 डिसेंबरला बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये सर्वपक्षीय नेते, व्यापारी संघटना आणि इतर सामाजिक संंघटना सहभागी होणार आहे. त्यामुळे राज्यपालांना पदावरुन हटवणार का?, हे पाहणं महत्वाचं असेल