एक्स्प्लोर
पुण्यात 18 डबे मागे सोडून मालगाडी रवाना, कारण...

पुणे : काही जणांच्या खोडसाळपणामुळे कोल्हापूरहून पुण्याकडे येणाऱ्या एका मालगाडीला बसला. मालगाडीचे 18 डबे पुढे निघून गेले, तर 18 डबे मागेच राहिले. कोल्हापूरहुन पुण्याकडे येणारी मालगाडी काळेपडळ या पुण्याजवळील एका जंक्शनवर सिग्नल मिळण्याच्या प्रतिक्षेत थांबली होती. त्याचवेळी कोणीतरी खोडसाळपणा केला आणि दोन डब्यांना जोडणारा पट्टा काढला. त्यामुळे सिग्नल मिळताच गाडी सुरु झाली आणि 18 डबे इंजिनसोबत गेले, तर 18 डबे मागे राहिले. बघ्यांची गर्दी झाल्यावर हा प्रकार ध्यानात आला.
पाहा आणखी फोटो
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















