Pune Ganpati Visarjan 2025 Live Update : पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीने मागच्या वर्षीचा रेकॉर्ड मोडला; 28 तास उलटून गेले मिरवणूक सुरूच
Pune Ganpati Visarjan 2025 Live Update : आज अनंत चतुर्दशी असल्याने राज्यभरात दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला निरोप दिला जात आहे.
LIVE

Background
Pune Ganpati Visarjan 2025 Live : आज अनंत चतुर्दशी असल्याने राज्यभरात दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला निरोप दिला जात आहे. पुण्यासह मुंबई, ठाणे, नाशिक, कोल्हापूरसह इतर शहरांमध्ये सकाळपासूनच गणपती बाप्पांची उत्तरपूजा पार पडली. पूजा, आरती आणि ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. पुण्यात पारंपरिक ढोल-ताशांच्या तालावर, लेझीमच्या झंकारात आणि गुलालाच्या उधळणीत श्रद्धाळू मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. वातावरणात "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" अशा जयघोषांचा उत्साह दाटून आला आहे.
दरम्यान, पुण्यात विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.
गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला झालेल्या हत्यानंतर पुणे पोलिसांनी स्वतः दिली कबुली
वनराज आंदेकर च्या भाच्याचा स्कूल होईल याचा पुणे पोलिसांना अंदाजच नव्हता
गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला झालेल्या हत्यानंतर पुणे पोलिसांनी स्वतः दिली कबुली
सात पिढ्या लक्षात ठेवतील अशा पद्धतीने पुणे पोलीस गँगस्टर वर करणार कारवाई
आंदेकर टोळी प्रमुख बंडू आंदेकर वर गुन्हा दाखल..
कोणत्याच गॅंगछ्या आणि गँगस्टरच्या चुकीला माफी नाही
ओमकार हत्या प्रकरण हे टोळी युद्धातूनच झाल्याचं आतापर्यंतच्या तपासात समोर
19 वर्षीय आयुष गोमकर याची हत्या ही टोळी युद्धातून झाली आहे आणि याप्रकरणी पुणे पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलंय आणि त्यांची पुणे पोलीस कसून चौकशी करत आहे
या चौकशीतून काय समोर येत हे पहावं लागणार आहे.
वनराज आंदेकर यांच्या भाच्याचीच म्हणजेच बहिणीच्या मुलाची हत्या करतील याचा पुणे पोलिसांना अंदाज नव्हता..
स्वतःच्या नातवाची हत्या करतील असं आम्हाला वाटलं नव्हतं:पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा गँगवॉरवर टिकटॅक
आंदेकर टोळीच्या बंडू आंदेकरविरोधात गन्हा दाखल झाला, मात्र स्वतःच्या नातवाची हत्या करतील असं आम्हाला वाटलं नव्हतं
अशी काही हत्या होईल असे आम्हाला वाटले नव्हते
अशाप्रकारे पुण्यात कायदासुव्यस्थेचा प्रश्न निर्माण कऱणाऱ्यांना पुणे पोलिस सो़डणार नाही
मकोकाअंतर्गत कारवाई सुरू होईल
आरोपींची माहिती, प्रॉपर्टी डिटेल्स घेणं सुरू आहे
क्राईम ब्रांचने काही दिवसांपुर्वी एका आरोपीला अटक केली होती, मात्र स्वतःच्या नातेवाईची हत्या करतील असं आम्हाला वाटलंच नव्हतं
























