एक्स्प्लोर

Ganesh Visarjan pune: दुपारचे 12 वाजले, तरी पुण्यात विसर्जन मिरवणुका सुरुच; लक्ष्मी रोड, केळकर रोड, टिळक रोडवर मंडळांची गर्दी

Ganesh Visarjan pune: पुण्यातील लक्ष्मी रोड,केळकर रोड,टिळक रोडवर मंडळांची मिरवणूका सुरूच आहेत. कुमठेकर रोड वरील मिरवणुका संपल्या आहेत. लवकरात लवकर मंडळ पुढे काढण्यासाठी पुणे पोलीस प्रयत्न करत आहेत.

पुणे: पुण्यातील गणेश विसर्जनाच्या (Ganpati Visarjan) मिरवणुका आज(बुधवारी) दुसऱ्या दिवशी ही जल्लोषात आणि उत्साहात सुरू आहेत. पुण्याची विसर्जन मिरवणुक सुरु होऊन 25 तास झाले आहे, मात्र अद्याप मिरवणुका सुरूच आहेत. 25 तास उलटूनही पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक अद्याप सुरू असल्याने या वर्षी देखील मिरवणुका गेल्या वेळी इतक्याच चालणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अजूनही पुण्यातील लक्ष्मी रोड,केळकर रोड,टिळक रोडवर मंडळांची मिरवणूका सुरूच आहेत. कुमठेकर रोड वरील मिरवणुका संपल्या आहेत. लवकरात लवकर मंडळ पुढे काढण्यासाठी पुणे पोलीस प्रयत्न करत आहेत. 

पुण्यात 25  तासाहून अधिक वेळ मिरवणूक सुरू आहे. गेल्या वर्षी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मिरवणूक संपली होती. मागील वर्षी जवळपास 28 तास मिरवणूक चालली होती. यावर्षी मिरवणूक कधी संपते या कडे लक्ष लागलं आहे. यावेळी देखील मिरवणुका उशिरापर्यंत चालतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिस मिरवणुका लवकर संपवाव्या यासाठी प्रयत्न करत आहेत. पुण्यातील अलका चौकातून आतापर्यंत 117 मिरवणुका गेल्या आहेत. 

पुण्यातील मिरवणूक संपण्यासाठी अजून एक ते दीड तास लागण्याची शक्यता

शहरातील 25 तास उलटूनही पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुका अद्याप सुरूच आहे. अजूनही पुण्यातील लक्ष्मी रोड, केळकर रोड, टिळक रोडवर मंडळांची मिरवणूका सुरूच आहेत. कुमठेकर रोडवरील गणपती मिरवणुका संपल्या आहेत. मिरवणूक संपण्यासाठी आणखी 1 ते दीड तास लागण्याची शक्यता आहे. 

मिरवणूक लवकरात लवकर संपवण्याचे आयुक्तांचे आवाहन


पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, मिरवणुकीचं योग्य नियोजन करण्यात आलं आहे. मात्र पुण्यातील मिरवणुकीत अनेक मंडळांनी लेसर लाइटचा वापर केला आणि सोबतच डीजेचा वापर केला आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस तैनात आहेत. मिरवणूक लवकरात लवकर संपवण्याचे आवाहन गणेश मंडळांना केलं जात आहेत. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे विसर्जन मिरवणुका उशिरापर्यंत चालणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

मानाचा पहिला - कसबा गणपती
10:30 - मिरवणुकीची सुरुवात
11:10 - बेलबाग चौकात 
3:35 - अलका चौक
4:32 - नटेश्वर घाटावर विसर्जन
मानाचा दुसरा - तांबडी   जोगेश्वरी
10:40 - मिरवणुकीला सुरुवात
12:00 -बेलबाग चौक
4:12 - अलका चौक
5:10 - नटेश्वर घाटावर विसर्जन
मानाचा तिसरा - गुरुजी तालीम
11:10 - मिरवणुकीला सुरुवात
1:12 - बेलबाग चौक
5:16 - अलका चौक 
6:43 - नटेश्वर घाटावर विसर्जन 
मानाचा चौथा - तुळशीबाग
11:50 - मिरवणुकीला सुरुवात
2:20 - बेलबाग चौक
6:17 - अलका चौक
7:12 - पाताळेश्वर घाटावर विसर्जन 
मानाचा पाचवा - केसरीवाडा
12:25 - मिरवणुकीला सुरुवात
3:23 - बेलबाग चौक
6:27 - अलका चौक
7:38 - पाताळेश्वर घाटावर विसर्जन

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sandeep Deshpande :  मनसेच्या कार्यक्रमाचं आदित्य ठाकरेंना निमंत्रण, काका-पुतण्या एकत्र येणार?100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 19 Sept 2024Ware Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 19 Sept 2024Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 08 PM 19 Sep 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
अनवट चवींच्या या पावसाळी भाज्या तुम्हाला माहितीयेत का? सूपपासून लोणच्यांपर्यंत अनेक चविष्ट पदार्थ बनतील
अनवट चवींच्या या पावसाळी भाज्या तुम्हाला माहितीयेत का? सूपपासून लोणच्यांपर्यंत अनेक चविष्ट पदार्थ बनतील
Pune Politics: महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
मोठी बातमी : नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांवर गंभीर आरोप
मोठी बातमी : नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांवर गंभीर आरोप
IPS Shivdeep Lande Resigns : बिहारच्या सिंघमचा तडकाफडकी राजीनामा, पण फक्त सहा शब्दांनी बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत भूवया उंचावल्या!
बिहारच्या सिंघमचा तडकाफडकी राजीनामा, पण फक्त सहा शब्दांनी बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत भूवया उंचावल्या!
Embed widget