Ganesh Kale Murder: आंदेकर-कोमकर टोळीयुद्धातून गणेश काळेचा बळी; गँगस्टर बंडू आंदेकर अन् कृष्णा आंदेकर यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल
Ganesh Kale Murder: कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकर यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोळी युद्धातूनच गणेश काळे याची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरातील गणेश काळे (Ganesh Kale Murder) या रिक्षा चालकाच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. आंदेकर-कोमकर टोळीयुद्धातून (Andekar Komkar Gang War) गणेश काळेची हत्या झाली असल्याची माहिती आहे. हत्या केल्यानंतर चारही आरोपी पळून गेले होते. या चारपैकी एक आरोपी हा कृष्णा आंदेकरचा निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आहे. कोंढवा गणेश काळे हत्या प्रकरणात आता गँगस्टर बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकर यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकर यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोळी युद्धातूनच गणेश काळे याची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. गुन्ह्यातील आरोपी बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, आमिर खान, मयूर वाघमारे, स्वराज वाडेकर, अमन शेख, अरबाज पटेल इतर दोन अल्पवयीन आरोपींची गुन्ह्यात नावे आहेत. आज या हत्या प्रकरणातील आरोपींना दुपारी कोंढवा पोलीस कोर्टात हजर करणार आहेत.
Ganesh Kale Murder: नेमकं काय प्रकरण?
काल (शनिवारी, ता १) दुपारच्या वेळी वर्दळ असलेल्या ठिकाणी एका ३२ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. या घटनेने पुणे शहर टोळीयुध्दाने पुन्हा हादरले. पुण्यातील खडी मशीन चौकातून सासवडकडे जाणाऱ्या बोपदेव घाटातील रस्त्यावर असलेल्या एका पेट्रोलपंपावरसमोरच हत्या करण्यात आली. गणेश काळे असे हत्या करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. तो रिक्षा चालक होता. गणेश काळे हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी समीर काळे याचा सख्खा भाऊ आहे. वनराज आंदेकरच्या हत्येसाठी शस्त्र पुरवल्याचा आरोप समीर काळे याच्यावर आहे. पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी याप्रकरणी सांगितले की, दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास गणेश काळे हा रिक्षा घेऊन खडी मशीन चौकाच्या दिशेने निघाला होता. त्याचवेळी दोन दुचाकीवरून काही जण त्याचा पाठलाग करत आले. चौघांनी जवळून गणेश काळेवर गोळ्या झाडल्या. चार राऊंड फायर करण्यात आले.
Ganesh Kale Murder: मानेत, छातीत व पोटात गणेश काळेला चार गोळ्या लागल्या
गणेश काळे जखमी झाल्यानंतर त्यानंतर त्याच्या डोक्यात कोयत्याने दोन वार करण्यात आले. यात कोयत्याच्या हल्ल्याने त्याच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या. गणेश हा येवलेवाडीत राहत होता. तो खडीमशीन चौकाकडे येत होता. पेट्रोलपंपाजवळ गणेशची रिक्षा अडवली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे त्याला काहीच करता आलं नाही. त्याला सावरण्याची संधी मिळण्यापूर्वीच दोघांनी त्याच्यावर गोळीबार सुरु केला. गणेश काळेला चार गोळ्या लागल्या. मानेत, छातीत व पोटात गोळ्या घुसल्या. त्यावंतर तो तो जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. तो खाली कोसळल्यानंतर दोन हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले. ही हत्या गँगवारमधून करण्यात आल्याचं बोललं जात आहे. ज्या पद्धतीने माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची हत्या करण्यात आली होती, तो पॅटर्न गणेश काळेच्या हत्येसाठी वापरण्यात आला आहे. वनराज आंदेकरवर आधी गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, त्यानंतर कोयत्याने वार केले गेले होते. सप्टेंबर महिन्यात पुण्यातील नाना पेठमध्ये वनराजच्या भाच्याची आयुष कोमकरची हत्या करण्यात आली होती. माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला म्हणून ही हत्या करण्यात आली होती, असे म्हटले जाते. आता गणेश काळेच्या हत्येने आंदेकर आणि कोमकर टोळी युद्धाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.


















