एक्स्प्लोर
Advertisement
पिंपरी चिंचवडमध्ये 800 रुपये आणि मेमरी कार्डसाठी मित्राची हत्या
15 जुलैच्या रात्री ही घटना थेरगावमध्ये घडली होती. पवन सुतार असं मयताचं, तर अनिल मोरे असं आरोपी मित्राचं नाव आहे.
पिंपरी चिंचवड : आठशे रुपये आणि मेमरी कार्ड परत न दिल्याने मित्राने मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये समोर आली. 15 जुलैच्या रात्री ही घटना थेरगावमध्ये घडली होती. पवन सुतार असं मयताचं, तर अनिल मोरे असं आरोपी मित्राचं नाव आहे.
दोघे मित्र सुतार काम करायचे, तर एका खाजगी बसवर पवन चालक म्हणूनही कार्यरत होता. दोघांनी काही महिन्यांपूर्वी केलेल्या सुतार कामाची मजुरी पवनने घेतली. त्यापैकी आठशे रुपये पवनने अनिलला न देता, स्वतः खरचले. तशी तर दोघांची मैत्री घट्ट होती, दारूच्या पार्ट्या ही एकत्रच रंगायच्या, इतकंच काय तर ते दोघात एकच मोबाईल वापरत असे.
हा मोबाईल अनिलचा होता, मात्र मैत्रीखातर तो पवनला वापरायला देत असे. तेव्हा स्वतःचा मोबाईल स्विच ऑफ ठेवण्याची तयारी तो नेहमीच दाखवत असे. एके दिवशी मात्र पवनकडचे पैसे संपले आणि त्याने मोबाईलमधील मेमरी कार्ड गहाण ठेवून दारू घेतली. मग मात्र अनिल आणि पवनमध्ये खटके उडायला सुरुवात झाली.
हत्येच्या दिवशी सकाळी दारू पिताना पुन्हा आठशे रुपये आणि मेमरी कार्डवरून वादंग पेटला. यात पवननेच अनिलच्या कानशिलात लगावल्या. अनिलला मात्र हे सहन झाले नाही, तो रात्री पुन्हा दारू प्यायला. त्याच नशेत बसमध्ये झोपलेल्या पवनवर चाकूने हल्ला करत, त्याची हत्या केली.
अनिलनेच पवनची हत्या केली होती, मात्र वाकड पोलिसांना त्यांच्यापर्यंत पोहचायला महिना लागला. दोघे एकच मोबाईल वापरत असल्याने, सीडीआरमध्ये एकमेकांना फोन केल्याचं निष्पन्न झालं नाही. त्यामुळेच पोलिसांना हत्येचा उलघडा करायला वेळ लागला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement