(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Viral Video : दहावीतील विद्यार्थिनींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी; व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल 'अगं थांबा पोरींनो'
पिंपरी चिंचवडमध्ये दहावीतील विद्यार्थिनींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली . त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. एका महिलेने मध्यस्थी केल्यानं हा वाद काही काळात शमला.
PCMC School Girl Viral Video : पिंपरी चिंचवडमध्ये (PCMC) दहावीतील विद्यार्थिनींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video) व्हायरल झालाय. एका महिलेने मध्यस्थी केल्यानं हा वाद काही काळात शमला. शाळेतील किरकोळ वादावरून ही भांडणं झाल्याचं बोललं जात आहे. पुणे हे शिक्षणाचे माहेर घर समजलं जातं मात्र याच पिंपरी चिंचवडमध्ये एका महाविद्यालयाच्या परिसरातून व्हिडीओ समोर आला आहे. विद्यार्थिनींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली. या हाणामारीचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही .
शिक्षणाचं माहेरघर अशी पुण्याची ओळख आहे. याच शिक्षणाच्या माहेरघरात दहावीतील विद्यार्थिनींमध्ये हाणामारी झाली आहे. दोघीही टायरच्या दुकानासमोर हाणामारी करताना दिसत आहे. एकमेकांचे केस धरून दोघीही एकमेकांवर तुटून पडलेल्या दिसत आहे. त्यांची हाणामारी सोडवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला मात्र काही वेळ त्या ऐकायला तयार नव्हत्या. काही वेळानी दोघींचा वाद सोडवण्यासाठी एक महिला आली आणि तिनं मध्यस्थी केल्यानंतर वाद शमला. यावेळी रस्त्यावरील अनेकांनी गर्दी केल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
शेरोशायरी केल्याने झालेल्या गैरसमजातून मारहाण; आळेफाटा गावातील व्हिडीओ
अशाच एका हाणामारीचा व्हायरल व्हिडीओ जुन्नर तालुक्यातील आळेफाटा गावातूनदेखील समोर आला आहे. यात मात्र शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केली आहे. शिक्षकाने चक्क लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांटा चांगलाच संताप झाला आहे. ज्ञानमंदिर ज्यूनिअर कॉलेज आळे येथे हा प्रकार घडला. शेरोशायरी केल्याने झालेल्या गैरसमजातून मारहाण केल्याचं समोर आलं आहे. यावेळी सगळ्या विद्यार्थ्यांनी बघ्याची भूमिका घेतली आहे.
भांडणं थांबण्यापूर्वीच व्हिडीओ व्हायरल
सध्या शाळकरी मुलांमध्ये आणि महाविद्यालयीन मुलांमध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद झाल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. या घटनांचे व्हिडीओदेखील प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. अनेकदा शाळेकडून या घटनेची दखल घेतली जाते. मात्र घटनांच्या संख्येत घट झाल्याचं दिसत आहे. त्यासोबतच महाविद्यालयीन मुलांमध्येदेखील असे प्रकार समोर येतात. हेच नाही तर पोलिसांना मारहाण केल्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी पिंपरी शहरातून समोर आला होता. तो व्हिडीओदेखील झटक्यात व्हायरल झाला होता. रिक्षा चालक आणि ट्रॅफिक पोलिसांमध्ये वादावादी होऊन रिक्षाचालकाने पोलिसांना मारहाण केली होती. यावेळी अनेकांनी ही हाणामारी सोडवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत होतंं. मात्र रिक्षाचालक आक्रमक झाला होता. त्यावेळी रिक्षाचालकालर कारवाई करण्यात आली होती. मात्र त्या कारवाईपूर्वीच व्हिडीओ व्हायरल झाला होता.