एक्स्प्लोर
पुण्यात एटीएम सेंटरला भीषण आग, आगीचं कारण अस्पष्ट
पुण्यातील सहकारनगरमधील जनता सहकारी बँकेच्या एटीएमला भीषण आग लागल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.

पुणे : पुण्यात जनता सहकारी बँकेच्या एटीएमला आग लागल्याची घटना घडली आहे. सहकारनगर परिसरातील एटीएमला ही आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या भीषण आगीत एटीएम पूर्णपणे जळून खाक झालं आहे. आग लागली तेव्हा एटीएममध्ये किती पैसे होते याची माहिती मिळू शकलेली नाही. अद्याप तरी या आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाही. ही आग लागली की लावण्यात आली याचाही सध्या तपास सुरु आहे. दरम्यान, आगीमुळे एटीएमचं बरंचस नुकसान झालं आहे.
Before You Go
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















