एक्स्प्लोर
मैत्रिणीशी ओळख करुन न दिल्याने पुण्यात तरुणाला बेदम मारहाण
पुणे : हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेल्यावर मैत्रिणीची ओळख करुन न दिल्यामुळे तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील मुंढवा परिसरातील बारमध्ये हा प्रकार घडला.
प्रणव दातार, अमोघ रानडे, गुरुबिरसिंग लांबा अशी अटक केलेल्याची नावे आहेत. पार्थ व्यास, शंतनू राय हे त्याच्या दोन मित्रांसोबत बुधवारी रात्री मुंढवा परिसरातील लोकल गॅस्ट्रो बार या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यावेळी आरोपीही जेवण्यासाठी आले होते.
प्रणव दातार हा पार्थजवळ आला आणि तुझ्या सहकार्याची ओळख करुन दे, त्यानंतर तुला दारु पाजतो, असं म्हणाला.
पार्थला त्यासोबत असलेल्या मैत्रिणींनी नकार दिला. त्यामुळे हॉटेलमधून बाहेर आल्यानंतर पार्थला आणि त्याच्यासोबत असलेल्या मैत्रिणींना मारहाण करण्यात आली. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या आजूबाजूच्या लोकांनी हे दृश्य त्यांच्या मोबाईलमध्ये टिपले.
दरम्यान, या प्रकरणी मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली असून, दोन आरोपी फरार आहेत.
पाहा बातमीचा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement