एक्स्प्लोर

Pune Health News : पुणेकरांनो घरातील लहान मुलांना सांभाळा; शहरात अॅडिनोव्हायरसचा प्रादुर्भाव वाढला

 पुण्यात लहान मुलांची सांभाळण्याची गरज आहे. शहरातील अनेक लहान मुलांमध्ये अॅडिनोव्हायरसचा प्रादुर्भाव वाढला आहे

Pune Health News :   पुण्यात लहान मुलांची (Adenoviruses) सांभाळण्याची गरज आहे. शहरातील अनेक लहान मुलांमध्ये अॅडिनोव्हायरसचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे मुलांमध्ये काहीही बदल दिसल्यास किंवा त्यांच्या प्रकृतीत काही बिघाड जाणवल्यास तातडीने डॉक्टरांकडे दाखवा, असं आवाहन करण्यात येत आहे. या अॅडिनोव्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्याने शहरातील अनेक लहान मुलांच्या दवाखान्यात गर्दी बघायला मिळत आहे.
 
शाळकरी मुलांना ताप येणे, टॉन्सिल्स, घसा खवखवणे आणि डोळे लाल होणे अशा तक्रारींमध्ये अचानक वाढ झाल्याचं शहरातील बालरोगतज्ञ सांगत आहे. या सगळ्या तक्रारी फक्त लहान मुलांमध्ये जणवत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. 70% आजारी मुलांमध्ये अॅडिनोव्हायरसची लक्षणं दिसत आहे. 5 ते 15 या वयोगटातील मुलांमध्ये या व्हायरसचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात जाणवत आहे. 

गेल्या महिनाभरापासून पुण्यातील मुलांमध्ये अॅडिनोव्हायरसचा संसर्ग मुलांमध्ये दिसून येत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून व्हायरल इन्फेक्शनमध्ये अचानक वाढ झाली आहे. अॅडिनोव्हायरस व्यतिरिक्त, इन्फ्लूएंझा विषाणू आणि राइनोव्हायरस याचेदेखी रुग्ण आढळत आहे. त्यामुळे लहान मुलांची काळजी घेणं गरजेचं असल्याचं डॉक्टकांकडून सांगण्यात आलं आहे. 

खूप काळ टिकणाऱ्या खोकल्याने पालक त्रस्त
पुण्यात सध्या वातावरणात सातत्याने बदल होत आहे. याचा परिणाम अनेकांच्या आरोग्यावर होत आहे. अनेकांना ताप, सर्दी आणि खोकल्याच्या समस्या जाणवत आहेत. मात्र खोकला फार काळ टिकत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शिवाय लहान मुलांनाही खोकल्याचा त्रास होत असल्याने पालकही त्रस्त झाले आहे. या सगळ्यांच नीट निरीक्षण करा आणि तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. कोणताही ताप दोन ते तीन दिवसांपेक्षा जास्त वेळ असेल, बाळाला श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असेल, तीव्र सर्दी खोकला असेल आणि घरातील इतर लोक आजारी असतील तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे, असंही डॉक्टरांनी सांगितलं


काय आहे हा अॅडिनोव्हायरस?
अॅडिनोव्हायरस हा एक विषाणू आहे जो श्वसननलिका, आतडे, डोळा, मूत्रमार्गाच्या अस्तरांवर वाढतो. या विषाणूमुळे सर्दी, न्यूमोनिया, पचनाचे आजार आणि लघवी संसर्ग होऊ शकतो. या विषाणूचे डझनभर प्रकार आहेत परंतु या उद्रेकामागे अॅडिनोव्हायरस 7 असल्याचे म्हटले जाते. अॅडिनोव्हायरस 7 विशेषतः धोकादायक आहे आणि त्यामुळे न्यूमोनियासह मोठ्या श्वसनाच्या गुंतागुंत होऊ शकतात. अॅडिनोव्हायरसमुळे मृत्यू होत नाही. ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे अशा मुलांवर याचा जास्त प्रमाणात परिणाम होतो. 

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Pune Expressway missing Link: मोठी बातमी: मिसिंग लिंकवर स्लॅब कोसळला, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प, प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन
मोठी बातमी: मिसिंग लिंकवर स्लॅब कोसळला, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प, प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन
पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट जारी, सर्व शाळांना सुट्टी जाहीर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती
पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट जारी, सर्व शाळांना सुट्टी जाहीर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती
Rainfall Landslide : उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रात 600 मिमी पाऊस, दरडी कोसळण्याचा धोका, झऱ्यातून गढूळ पाणी येणे ते झाडांची स्थिती, मयुरेश प्रभुणे म्हणाले...
600 मिमी पाऊस झाल्यानं दरडी कोसळण्याचा धोका, झऱ्यातून गढूळ पाणी येणे ते झाडांची स्थिती, मयुरेश प्रभुणेंनी सांगितले पूर्वसंकेत...
Pune Rain News: मावळ तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर; तर पुण्यात दोन दिवसांत तब्बल 30 झाडपडीच्या घटना, वाहनांचं मोठं नुकसान, जनजीवन विस्कळीत
मावळ तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर; तर पुण्यात दोन दिवसांत तब्बल 30 झाडपडीच्या घटना, वाहनांचं मोठं नुकसान, जनजीवन विस्कळीत

व्हिडीओ

Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report
Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain LIVE: राज्यात मुसळधार पावसाचं धुमशान, मुंबईला झोडपलं, रायगड, रत्नागिरी, चिपळुणवर पुराचं सावट, मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुणे महामार्ग ठप्प
Maharashtra Rain LIVE: राज्यात मुसळधार पावसाचं धुमशान, मुंबईला झोडपलं, रायगड, रत्नागिरीवर पुराचं सावट, मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुणे महामार्ग ठप्प
Mutual Fund : गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
Raigad Palghar Rain Alert : रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
Mumbai Pune Expressway missing Link: मोठी बातमी: मिसिंग लिंकवर स्लॅब कोसळला, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प, प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन
मोठी बातमी: मिसिंग लिंकवर स्लॅब कोसळला, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प, प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांची पाच दिवसात 1 लाख कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फायदा तर एल अँड टी आणि रिलायन्सला फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणकदार मालामाल, 1 लाख कोटींची कमाई, चार कंपन्यांना फटका
Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
Bhiwandi Rain : भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
Embed widget