एक्स्प्लोर
Advertisement
डीएस कुलकर्णींच्या मुलालाही अटक, 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेसमोर ते स्वतःहून हजर झाले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. शिरीष कुलकर्णी यांना 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
पुणे : गुंतवणूकदारांचे पैसे थकवल्याप्रकरणी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णी यांचे चिरंजीव शिरीष कुलकर्णी यांनाही अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेसमोर ते स्वतःहून हजर झाले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
शिरीष कुलकर्णी यांना 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी दिलेली मुदत आज संपत होती. अखेर शिरीष कुलकर्णी स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाले.
शिरीष कुलकर्णी हे स्वत:ला डीएसके या ब्रँडपासून वेगळ ठरवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या अटकपूर्व जामिनावरील युक्तिवाद ऐकण्यास आम्हाला मुळीच रस नाही, असं म्हणत आम्ही अटकपूर्व जामीन फेटाळून लावण्याऐवजी तुम्ही तो मागे घ्या आणि कधीपर्यंत पोलिसांना शरण येणार याची आठ जूनपर्यंत हायकोर्टाला माहिती द्या, असे स्पष्ट निर्देश हायकोर्टाने दिले होते.
अनेक ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याबद्दल सध्या डी.एस.कुलकर्णींसह त्यांच्या परिवारातील अनेक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कारण, आपल्या परिवारातील अनेकांच्या नावांवार डी.एस.कुलकर्णींनी आपले आर्थिक गैरव्यवहार व्यवहार केल्याचे पुरावे पुणे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
संबंधित बातम्या :
हायकोर्टाकडून डीएसकेंच्या मुलाला शरण येण्याचे आदेश
डीएसके दाम्पत्याविरोधात 36 हजार 875 पानांचं दोषारोपपत्र
डीएसके दाम्पत्याच्या अटकेनंतर जावईही पोलिसांच्या जाळ्यात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement