एक्स्प्लोर

कारवाई टाळण्यासाठी चालकाचा वाहतूक पोलिसाला बोनेटवर घेऊन जीवघेणा प्रवास, थरार कॅमेऱ्यात कैद

पिंपरी चिंचवडमध्ये कारवाई टाळण्यासाठी चालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवर घेऊन जीवघेणा प्रवास केल्याची घटना घडली. दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकांच्या प्रसंगावधानपणा दाखवल्याने त्यांचा जीव थोडक्यात वाचला. हा थरार उपस्थितांच्या मोबाईल कॅमेरा आणि सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

पिंपरी चिंचवड : महाराष्ट्र पोलिसांवरील हल्ले काही कमी होताना दिसेनात. आज तर पिंपरी चिंचवडमधील एका चालकाने वाहतूक पोलिसास जीवे मारण्याचाच प्रयत्न केला. गाडी रोखणाऱ्या वाहतूक पोलिसास या चालकाने बोनेट वर बसवून एक किलोमीटरपर्यंत सुसाट प्रवास केला. दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकांच्या प्रसंगावधानपणा दाखवल्याने त्यांचा जीव वाचलाय. हा थरार मोबाईल कॅमेरा आणि सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

सायंकाळी चारच्या सुमारास अहिंसा चौकात वाहतूक पोलीस आबासाहेब सावंत आणि इतर कर्मचारी विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत होते. तेव्हा चिंचवड स्टेशन चौकाकडून चाफेकर चौकाकडे 50 वर्षीय युवराज हणवते त्यांच्या चारचाकीतून निघाले होते. पण त्यांनी घातलेला मास्क हा नाक आणि तोंड सोडून गळ्याजवळ असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. म्हणून कारवाईसाठी त्यांना हात दाखवला असता हणवते पोबारा करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, त्यांच्या पुढे वाहतूक पोलीस आबासाहेब सावंत आले आणि त्यांनी गाडी रोखली. हणवतेंनी थोडावेळ थांबलोय, असं दाखवण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा रेसवर पाय दिला असता सावंत यांच्या पायाला धक्का लागला.

नवी मुंबईच्या कळंबोलीतील उद्यानात पुण्याचा तरुण मृतावस्थेत आढळला!

तेव्हा सावंत यांचा बोनेटच्या दिशेने तोल गेला. ते बोनेट वरून खाली उतरणार तोवर हणवते यांनी गाडीचा वेग वाढवला. ही बाब काही उपस्थित दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकांनी पाहिली. मग हणवतेच्या गाडीचा फिल्मी स्टाईल पाठलाग सुरू झाला. काही क्षणातच अहिंसा चौकातून हणवते चाफेकर चौकात पोहचले, मग हणवते यांनी गाडीचा वेग आणखीच वाढवला. गाडी चिंचवड पोलीस स्टेशनसमोर आली, तेव्हा दोन्ही बाजूंनी दोन दुचाकीस्वार, पुढे एक रिक्षा असं घेरण्यात आलं. पण चारचाकी सुसाट होती. सावंत जीव मुठीत घेऊन बोनेटला कसेबसे धरून बसले होते. काही केल्या हणवते थांबायचं नाव घेईना, शेवटी एक दुचाकीस्वाराने शक्कल लढवली आणि पुढे धावणारी मोठी चारचाकी गाडी रस्त्यात थांबवली. तेव्हा मात्र हणवतेसमोर पर्याय उरलाच नाही.

गाडी थांबताच सावंतांसह सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. मग हणवतेंकडे सर्वांनी मोर्चा वळवला, उपस्थितांनी गाडीला घेरलं आणि हणवतेना गाडीतून बाहेर येण्याची सूचना सुरू झाली. पण ते बाहेर पडलेच नाहीत, उलट मला का अडवलं जात होतं असा उलट जाब विचारायला सुरुवात केली. तेव्हाच हातात फोन घेऊन कोणाला तरी संपर्क साधण्यास हणवतेकडून सुरुवात झाली. हा सर्व थरार मोबाईल कॅमेरा आणि सीसीटीव्हीत कैद झालाय. दुचाकीस्वार, रिक्षाचालक यांचा प्रसंगावधान आणि सुदैव म्हणूनच सावंत यातून बालबाल बचावले. त्यांच्या पायाला मात्र गंभीर इजा झालीये. जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी, तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने हणवतेवर चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. हणवते हे पिंपळे निलख येथील रहिवाशी असून पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Baramati Crime News: 'दृश्यम' स्टाईलने नवऱ्याला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न, गुंगीचं औषध देऊन बॅटने मारहाण, बारामतीमधील महिलेचा हादरवणारा कारनामा
'दृश्यम' स्टाईलने नवऱ्याला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न, गुंगीचं औषध देऊन बॅटने मारहाण, बारामतीमधील महिलेचा हादरवणारा कारनामा
Pune Crime News: शाळेपासूनचं प्रेम, पण मुलीचा जीव दुसऱ्यावरच जडला; संतापलेल्या एक्स बॉयफ्रेंडने हॉस्टेलमध्ये घुसून तरुणाचा काढला काटा, पुण्यातील शॉकिंग घटना
शाळेपासूनचं प्रेम, पण मुलीचा जीव दुसऱ्यावरच जडला; संतापलेल्या एक्स बॉयफ्रेंडने हॉस्टेलमध्ये घुसून तरुणाचा काढला काटा, पुण्यातील शॉकिंग घटना
Prashant Kishor and Sunil Tatkare: 'मी तुमच्यासोबत काम करावं वाटत असेल तर प्रदेशाध्यक्षांबाबत निर्णय घ्या', प्रशांत किशोरांनी सुनेत्रा पवारांना थेटच सांगितलं, सुनील तटकरेंबाबत नाराजी
मी तुमच्यासोबत काम करावं वाटत असेल तर प्रदेशाध्यक्षांबाबत निर्णय घ्या, प्रशांत किशोरांनी सुनेत्रा पवारांना थेटच सांगितलं, सुनील तटकरेंबाबत नाराजी
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Raj Thackeray in Nashik press conference: नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
Embed widget