एक्स्प्लोर

Rajendra Ghanwat wife Death: धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवटांच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांचा खळबळजनक आरोप

Dhananjay Munde Beed News: धनंजय मुंडे यांचे भागीदार राजेंद्र घनवट यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. मात्र, त्यांचा मृत्यू हा संशयास्पद असल्याचा दावा अंजली दमानियांनी केला आहे.

Rajendra Ghanwat Wife death: राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना हाताशी धरुन अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचा ठपका असणारे राजेंद्र घनवट यांच्या पत्नीचे आकस्मिक निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. 46 वर्षीय मनाली राजेंद्र घनवट (Rajendra Ghanwat) यांनी सोमवारी पुण्यातील ज्युपिटर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मात्र, त्यापूर्वी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. मनाली राजेंद्र घनवट यांचा मृत्यू नैसर्गिक नसून ती आत्महत्या असल्याचा संशय अंजली दमानिया यांनी व्यक्त केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यानिमित्ताने धनंजय मुंडे आणखी एका वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

राजेंद्र उर्फ राज घनवट हे धनंजय मुंडे यांचे व्यावसायिक भागीदार असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी अंजली दमानिया यांनी केला होता. आपण कोणताही दावा करत नाही. परंतु अफवा आहेत की मनाली राजेंद्र घनवट यांनी आत्महत्या केली आहे. मात्र, घनवट कुटुंब त्यांचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता पोलीस याप्रकरणाचा तपास करणार का, हे बघावे लागेल. 

अंजली दमानिया यांनी एक्स पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?

खूप खूप धक्कादायक ! राज घनवट,  जे धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे आहेत, त्यांच्या पत्नीच्या आकस्मित मृत्यू झाला आहे. कारण स्पष्ट नाही. पुण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांना नेण्यात आले होते. राज घनवट धनंजय मुंडे त्यांच्या कंपन्यात डायरेक्टर आहेत, ह्याच राज घनवट ने शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या आहेत, व याच जमिनीच्या चौकशीची मागणी, मी महसूल मंत्री बावणकुळे यांच्या कडे केली होती. ही आत्महत्या आहे असे त्यांच्या जवळच्या लोकांचे म्हणणे पण तो नैसर्गिक मृत्यू आहे असे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे.

राजेंद्र घनवट यांच्यावर कोणते आरोप?

काही दिवसांपूर्वी अंजली दमानिया यांनी एक पत्रकार परिषद घेत राजेंद्र घनवट यांचा उल्लेख केला होता. धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी राजेंद्र घनवट (Rajendra Ghanwat) यांनी राजकारण्यांना हाताशी धरत त्यांच्या जमिनी लाटल्या .खोटे गुन्हे दाखल त्यांना जेरीस आणले. मयत व्यक्तीला जिवंत दाखवलं जिवंत यांना मयत केलं आणि व्यवहार केला. धनंजय मुंडे चार वर्षांपूर्वी माझ्याकडे तेजस ठक्कर यांच्या सोबत आले होते. तेव्हा पंकजा मुंडे यांच्या विरोधात पुरावे घेऊन प्रकरण लावून धरा यासाठी धनंजय मुंडे आले होते यावेळी राजेंद्र घनवटही त्यांच्यासोबत असल्याचे अंजली दमानिया यांनी सांगितले होते. व्यंकटेश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेस या कंपनी संदर्भात मुख्यमंत्री आणि अजित पवार यांना भेटले आहे. यात दोन संचालक आहेत त्यातील एक राजेंद्र घनवट आणि पोपटराव घनवट. या दोघांनी 11 शेतकऱ्यांना छळून त्रास दिलाय. जे जे शेतकरी यांच्या विरोधात लढायचे त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात. राजेंद्र घनवट हे धनंजय मुंडे यांचे पार्टनर आहेत, असा आरोप दमानियांनी केला होता.

आणखी वाचा

राजेंद्र घनवट यांनी बीडच्या शेतकऱ्यांना छळून त्रास दिला, हे सगळे धनंजय मुंडे यांचे पार्टनर, अंजली दमानियांचे गंभीर आरोप 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Update: एकीकडे उष्णतेची लाट, दुसरीकडे विदर्भ, मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, पुणे वेधशाळेचा अंदाज
एकीकडे उष्णतेची लाट, दुसरीकडे विदर्भ, मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, पुणे वेधशाळेचा अंदाज
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का! रोहित टिळकांचा पक्षाला रामराम, शिंदेच्या शिवसेनेत करणार प्रवेश, पक्ष सोडण्याचं कारणही सांगितलं  
पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का! रोहित टिळकांचा पक्षाला रामराम, शिंदेच्या शिवसेनेत करणार प्रवेश, पक्ष सोडण्याचं कारणही सांगितलं  
पुण्यात थट्टा मस्करी जीवावर बेतली, किरकोळ वादातून मित्रांचाच खून; पोलिसांकडून 4 जणांना अटक
पुण्यात थट्टा मस्करी जीवावर बेतली, किरकोळ वादातून मित्रांचाच खून; पोलिसांकडून 4 जणांना अटक

व्हिडीओ

Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: इराणविरोधात युद्ध, अमेरिका आणि इस्त्रायलवर इटलीच्या पीएम मेलोनी भडकल्या; नेमकं काय म्हणाल्या? नाटो सदस्य असूनही स्पेनच्या धाडसाची सुद्धा जगभरात चर्चा
इराणविरोधात युद्ध, अमेरिका आणि इस्त्रायलवर इटलीच्या पीएम मेलोनी भडकल्या; नेमकं काय म्हणाल्या? नाटो सदस्य असूनही स्पेनच्या धाडसाची सुद्धा जगभरात चर्चा
अमेरिकेचा युद्ध जिंकल्याचा दावा; युद्धबंदीसाठी इराणच्या 3 अटी, युद्ध थांबणार? निवृत्त कर्नल अभय पटवर्धन म्हणाले...
अमेरिकेचा युद्ध जिंकल्याचा दावा; युद्धबंदीसाठी इराणच्या 3 अटी, युद्ध थांबणार? निवृत्त कर्नल अभय पटवर्धन म्हणाले...
Iran War Live Update: डोनाल्ड ट्रम्पकडून युद्ध जिंकल्याचा दावा, पण इराणने घातलेल्या तीन अटींचे काय? नेत्यानाहू मान्य करणार की नाही??
डोनाल्ड ट्रम्पकडून युद्ध जिंकल्याचा दावा, पण इराणने घातलेल्या तीन अटींचे काय? नेत्यानाहू मान्य करणार की नाही??
Iran: युद्धाच्या धामधुमीत इराणचा भारताला मोठा दिलासा, भारतीय झेंडा असलेल्या जहाजांना सूट; होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सेफ पॅसेज
युद्धाच्या धामधुमीत इराणचा भारताला मोठा दिलासा, भारतीय झेंडा असलेल्या जहाजांना सूट; होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सेफ पॅसेज
Hardik Pandya Mahika Sharma मोठी बातमी: हार्दिक पांड्याविरोधात पहिली अ‍ॅक्शन; मैदानात तिरंगा घेऊन गर्लफ्रेंडसोबत नको नको ते करणं पडणार महागात
हार्दिक पांड्याविरोधात पहिली अ‍ॅक्शन; मैदानात तिरंगा घेऊन गर्लफ्रेंडसोबत नको नको ते करणं महागात
Monalisa Married Muslim Boyfriend: मुस्लिम बॉयफ्रेंडनं भांगात भरलं कुंकू; महाकुंभ व्हायरल गर्ल मोनालिसाच्या लग्नाचा VIDEO व्हायरल,
मुस्लिम बॉयफ्रेंडनं भांगात भरलं कुंकू; 'महाकुंभ व्हायरल गर्ल' मोनालिसाच्या लग्नाचा व्हायरल VIDEO पाहिलात?
Mumbai News: आपली पहिली भेट; तू अनेक वेळा बोललेले वाईट शब्द, माझ्या मनावर झालेल्या खोलवर जखमा....; डॉ. स्तुती सोनवणेंनी लिहलेल्या शेवटच्या नोटमध्ये मन केलं मोकळं
आपली पहिली भेट; तू अनेक वेळा बोललेले वाईट शब्द, माझ्या मनावर झालेल्या खोलवर जखमा....; डॉ. स्तुती सोनवणेंनी लिहलेल्या शेवटच्या नोटमध्ये मन केलं मोकळं
Ram Shinde On Bomb Threat: मेट्रो, शेअर बाजारसह मुंबईतील 4 ठिकाणं मिसाईलने उडवून देऊ, अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा मेल; सभापती राम शिंदे काय काय म्हणाले?
मेट्रो, शेअर बाजारसह मुंबईतील 4 ठिकाणं मिसाईलने उडवून देऊ, अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा मेल; सभापती राम शिंदे काय काय म्हणाले?
Embed widget