एक्स्प्लोर

'पुन्हा येईन', नंतर 'आपण येतोच', देवेंद्र फडणवीसांचा नवा नारा

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी पुन्हा येईन हा नारा खूप चर्चिला गेला. त्यावरुन बरीच ट्रोलिंग देखील झाली. आता याच फडणवीस यांनी दुसरा नारा दिला आहे. त्यात मी ऐवजी आपण शब्द वापरला आहे.

पिंपरी : मुख्यमंत्री पदी 'पुन्हा येईन' चा देवेंद्र फडणवीस यांचा नारा फोल ठरला. पण आता जनतेचा आशीर्वाद सोबत असल्यास 'आपण येतोच' असा नारा त्यांनी दिला आहे. पुण्याच्या आळंदीत जोग महाराजांच्या स्मृती सोहळ्यात ते बोलत होते. राजकारणात कमी जास्त होत असत. सत्तेतले विरोधात अन विरोधातले सत्तेत येत राहतात. पण आपण सत्तेत असो की विरोधात सन्मार्ग मात्र सोडू नये. याच सन्मार्गावर चालायचं असेल तर आपल्याला टॉनिक लागतं. ते टॉनिक अर्थात आशीर्वाद घ्यायला इथे आलोय. जनतेचा हा आशीर्वाद सोबत असला की 'आपण येतोच, येतोच आणि येतोच' असा नवा नारा फडणवीसांनी दिला. आळंदी येथील जोग महाराज स्मृती सोहळ्यानंतर ते म्हणाले की, मी तीन वर्षांपूर्वी या सोहळ्यासाठी आलो होतो, पुढच्या वर्षीही मी पुन्हा येईन. ते म्हणाले, अनेकदा आपण संकुचित विचारांच्या गोष्टी करतो, मात्र संतांनी कधीच असा संकुचित विचार केला नाही. अलीकडच्या काळात सेक्युलर हा शब्द अधिक वापरला जातोय. या शब्दाचा अर्थ काय यावर अनेक वाद होतात. पण याचा खरा अर्थ आणि व्यापक विचार हा वारकरी संप्रदायाचे आहेत. त्यांच्या यायला कोणतीही अट नाही. म्हणूनच प्रत्येक वर्षी लाखो वारकऱ्यांचे पाय पंढरीच्या दिशेने वळतात, असं फडणवीस म्हणाले. फडणवीस पुढे म्हणाले की, अजून माझ्या हातून सत कार्य न झाल्याने मी सत्कार स्वीकारत नाही. जे कामं आणि निर्णय घेतले ते कर्तव्य होतं. त्यामुळे आज सत्कार घेण्यासाठी नव्हे तर आशीर्वाद घेण्यासाठी आलोय. ते म्हणाले की, राजकारणात कमी जास्त होत असत. सत्तेतले विरोधात अन विरोधातले सत्तेत जात असतात. पण आपण सन्मार्ग सोडू नये आणि या सन्मार्गावर चालण्यासाठी टॉनिक लागतं. ते घ्यायला इथे आलोय. तो आशीर्वाद घ्यायला आलोय, हा आशीर्वाद सोबत असला की आपण येतोच, येतोच आणि येतोच, असं ते म्हणाले. काल शरद पवार यांनी देखील याठिकाणी आले होते. 'पवार हिंदूविरोधी आहेत. त्यांना वारकऱ्यांच्या कुठल्याही कार्यक्रमात बोलावू नका', असं पत्रक राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वक्ते महाराज यांनी काढलं होतं. त्यावर विठ्ठलाच्या दर्शनाला, माऊलींच्या दर्शनाला किंवा तुकोबारायांच्या दर्शनाला आपल्याला कुणाच्या परवानगीची गरज नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या आरोपाला चोख प्रत्युत्तर दिलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: मुंबईच्या समुद्रात मोठी भरती, नाशिकमध्ये ढगफुटी; पावसाचा रेट अलर्ट, मुख्यमंत्र्यांचं वारकऱ्यांनाही महत्त्वाचं आवाहन
मुंबईच्या समुद्रात मोठी भरती, नाशिकमध्ये ढगफुटी; पावसाचा रेट अलर्ट, मुख्यमंत्र्यांचं वारकऱ्यांनाही महत्त्वाचं आवाहन
Pune Maval Landslide: 'पहाटे 4 वाजता घर होतं, अन् पुढच्या पाचच मिनिटांत घर गायब....'; मावळच्या विसापूरमध्ये रात्रीच्या भयाण काळोखात काय घडलं? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार
'पहाटे 4 वाजता घर होतं, अन् पुढच्या पाचच मिनिटांत घर गायब....'; मावळच्या विसापूरमध्ये रात्रीच्या भयाण काळोखात काय घडलं? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार
Pune Rain Ashadhi Wari: पुण्यात प्रचंड पाऊस, इंद्रायणीला पूर, ज्ञानोबा माऊलींच्या पालखीसाठी आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना
पुण्यात प्रचंड पाऊस, इंद्रायणीला पूर, ज्ञानोबा माऊलींच्या पालखीसाठी आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना
Heavy Rain Speedy Wind in Mumbai: मुंबईकरांनो सावधान! 90च्या स्पीडने वारे वाहणार, बंगालच्या उपसागरातील एका बदलामुळे नक्की काय घडलं?
मुंबईकरांनो सावधान! 90च्या स्पीडने वारे वाहणार, बंगालच्या उपसागरातील एका बदलामुळे नक्की काय घडलं?

व्हिडीओ

Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report
Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: अश्लील व्हिडीओ असल्याचा धाक दाखवत अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार; इचलकरंजीमधील घटनेनं खळबळ
अश्लील व्हिडीओ असल्याचा धाक दाखवत अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार; इचलकरंजीमधील घटनेनं खळबळ
Devendra Fadnavis: मुंबईच्या समुद्रात मोठी भरती, नाशिकमध्ये ढगफुटी; पावसाचा रेट अलर्ट, मुख्यमंत्र्यांचं वारकऱ्यांनाही महत्त्वाचं आवाहन
मुंबईच्या समुद्रात मोठी भरती, नाशिकमध्ये ढगफुटी; पावसाचा रेट अलर्ट, मुख्यमंत्र्यांचं वारकऱ्यांनाही महत्त्वाचं आवाहन
Jamun Rain: मुंबईच्या पावसात जांभळाचंही झाड पडलं; सोशल मीडियातही ट्रेंड, जांभळाच्या नावाने व्हायरल होतायत मिम्स
मुंबईच्या पावसात जांभळाचंही झाड पडलं; सोशल मीडियातही ट्रेंड, जांभळाच्या नावाने व्हायरल होतायत मिम्स
Mumbai Pune Missing Link Land Slide: 13. 3 किमी रस्त्यांसाठी 7120 कोटींचा चुराडा; अरे प्रतिदिन 100 कोटींप्रमाणे किमान 70 दिवस तरी काढायचे होते; मिंसिंग लिंकला भगदाड पडताच सुषमा अंधारेंनी गणित मांडलं
13. 3 किमी रस्त्यांसाठी 7120 कोटींचा चुराडा; अरे प्रतिदिन 100 कोटींप्रमाणे किमान 70 दिवस तरी काढायचे होते; मिंसिंग लिंकला भगदाड पडताच सुषमा अंधारेंनी गणित मांडलं
Pune Visapur Landslide: पहाटे 4 वाजता दिसलं, पण 4.05 वाजता घर ढासळलेल्या मातीच्या ढिगाऱ्यात आढळलं; विसापुरमध्ये निसर्गाचा प्रकोप, अंगावर काटा आणणारे 10 फोटो
पहाटे 4 वाजता दिसलं, पण 4.05 वाजता घर ढासळलेल्या मातीच्या ढिगाऱ्यात आढळलं; विसापुरमध्ये निसर्गाचा प्रकोप, अंगावर काटा आणणारे 10 फोटो
Pune Landslide Rain: 'माळीण'च्या भयावह आठवणी पुन्हा जाग्या झाल्या, मावळच्या विसापूर किल्ल्याचा तुकडा घरावर कोसळला, अख्ख कुटुंब एका क्षणात ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं
'माळीण'च्या भयावह आठवणी पुन्हा जाग्या झाल्या, मावळच्या विसापूर किल्ल्याचा तुकडा घरावर कोसळला, अख्ख कुटुंब एका क्षणात ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं
Kolhapur Rain Update: कृष्णा आणि पंचगंगा, वारणा नदीच्या पाणीपातळीत वेगाने वाढ, गगनबावड्यात धुवाधार; नृसिंहवाडीत मंदिराच्या सभामंडपापर्यंत पाणी
कृष्णा आणि पंचगंगा, वारणा नदीच्या पाणीपातळीत वेगाने वाढ, गगनबावड्यात धुवाधार; नृसिंहवाडीत मंदिराच्या सभामंडपापर्यंत पाणी
Pune Rain Ashadhi Wari: पुण्यात प्रचंड पाऊस, इंद्रायणीला पूर, ज्ञानोबा माऊलींच्या पालखीसाठी आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना
पुण्यात प्रचंड पाऊस, इंद्रायणीला पूर, ज्ञानोबा माऊलींच्या पालखीसाठी आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना
Embed widget