एक्स्प्लोर
Advertisement
माऊलींच्या दर्शनासाठी आपल्याला कुणाच्या परवानगीची गरज नाही, शरद पवारांचा टोला
पवार हिंदूविरोधी आहेत. त्यांना वारकऱ्यांच्या कुठल्याही कार्यक्रमात बोलावू नका', असं पत्रक राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वक्ते महाराज यांनी काढलं होतं. शरद पवार हिंदूविरोधी असल्याचा राष्ट्रीय वारकरी परिषदेनं गंभीर आरोप केला आहे. यावर शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे.
पिंपरी : विठ्ठलाच्या दर्शनाला, माऊलींच्या दर्शनाला किंवा तुकोबारायांच्या दर्शनाला आपल्याला कुणाच्या परवानगीची गरज नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या आरोपाला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीमध्ये जोग महाराज पुण्यातिथी सोहळ्याला पवारांनी उपस्थिती लावली. शरद पवार हे हिंदूविरोधी असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रीय वारकरी परिषदेनं केला आहे. शरद पवार हे हिंदूविरोधी आहेत; त्यांना कार्यक्रमाला बोलावू नका, असं पत्रकच राष्ट्रीय वारकरी परिषदेनं प्रसिद्धीला दिलं आहे. याविषयी बोलताना शरद पवारांनी टोला लगावला आहे.
शरद पवार म्हणाले की, मला हे कधी समजलं नाही. विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरीला जायचं असतं. माऊलींच्या दर्शनाला आळंदीला जायचं असतं. तुकोबांच्या दर्शनाला देहूला जायचं असतं. पण यासाठी कुणाची परवानगी घ्यावी लागत नाही. त्यामुळं कुणी सांगितलं की तुम्हाला परवानगी नाही, तर त्यांना वारकरी संप्रदायाचे विचारचं समजले नाहीत. सच्चा वारकरी अशी भूमिका कधीच घेणार नाही. म्हणून त्याकडे मी फारसं लक्ष देत नाही. लहान सहान गोष्टी होत असतात. त्याकडे दुर्लक्ष करायचं असतं, असं पवार म्हणाले. आपण आपला मार्ग सोडायचा नसतो. बांधिलकी ठेवायची असते तिथं तडजोड करायची नसते. त्याच भावनेने इथे आलो, असंही पवार म्हणाले.
यावेळी पवार म्हणाले की, मला इंद्रायणी शुद्ध करण्याची मागणी भावली. मी काशीला एकदा गेलो, मला वाईट वाटलं. त्या नदीत आपण पूजा करतो. स्मशानात प्रेत तिथं होती, देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या श्रद्धेने येतात. तिथं ही परिस्थिती होती. मला आनंद आहे, प्रधानमंत्र्यांनी तिथून निवडणूक लढवली आणि तिथं स्वच्छतेचं काम गेलं. त्यांचे आणि आमचे मतभेद असले तरी. हे काम चांगलंच आहे. तिथं घडलं तसंच इथंही व्हावं, असंही पवार म्हणाले.
'पवार हिंदूविरोधी आहेत. त्यांना वारकऱ्यांच्या कुठल्याही कार्यक्रमात बोलावू नका', असं पत्रक राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वक्ते महाराज यांनी काढलं होतं. शरद पवार हिंदूविरोधी असल्याचा राष्ट्रीय वारकरी परिषदेनं गंभीर आरोप केला आहे, शरद पवारांना वारकऱ्यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला बोलावू नका, असं राष्ट्रीय वारकरी परिषदेनं पत्रकात म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
Advertisement