एक्स्प्लोर

Devendra Fadanvis : मोदींनी शरद पवारांना ऑफर नाही सल्ला दिला; देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना कोणतीही ऑफर दिली नाही तर त्यांना सल्ला दिला, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra Modi) यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) कोणतीही ऑफर दिली नाही तर त्यांना सल्ला दिला, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanavis) यांनी दिलं आहे. पुण्यात पत्रकार संघाच्यावतीने देवेंद्र फडणवीसांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. बारामतीची जागा अजित पवारांकडे  जात आहे.  त्यानंतर पवारांनी सांगितलं 4 जून नंतर क्षेत्रिय पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं शरद पवार एका मुलाखतीत म्हणाले होते. त्यावर मोदींनी त्यांना महायुतीसोबत येण्याची ऑफर दिली होती. मात्र ही ऑफर नसून मोदींनी शरद पवारांना दिलेला सल्ला आहे, असं फडणवीस म्हणाले. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मोदींनी शरद पवारांना ऑफर नाही तर चांगला सल्ला दिला होता. मोदी म्हणाले की तुम्ही काँग्रेसमध्ये जाऊनही वाचू शकणार नाही. त्यापेक्षा तुम्ही शरद पवारांनी अजित पवारांसोबत यावं आणि उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेसोबत यावं. त्यामुळे राजकीय मनसुभे सुटतील.

पुढे बोलताना त्यांनी शरद पवारांच्या राजकारणाची पार्श्वभूमी सांगितली. ते म्हणाले की, शरद पवारांची राजकीय कारकिर्द आपल्याला माहिती आहे. त्यांचा पक्ष जेव्हा कमजोर झाला तेव्हा ते कॉंग्रेसमध्ये विलिन झाले आणि आपली जागा नीट करु घेतली. हे सगळं 1977 पासूनचं राजकारण आहे. काँग्रेसमध्ये विलीन होतात आणि पुन्हा काँग्रेसमधून बाहेर पडतात. शरद पवारांचं राजकारण ज्यांना माहिती आहे. त्यांना हे सगळं शरद पवारांचं वागणं समजू शकतं, असा टोलाही लगावला. 

उद्धव ठाकरे फडणवीसांवर प्रत्येकवेळी टीका करताना दिसतात. त्यावर आता फडणवीसांनी त्यांना सणसणाीत भाषेत उत्तर दिलं आहे. काही लोक सिरीयस बोलले तर ते मनावर घ्यायचं असतं. मात्र काही लोक नुसते बडबड करत सुटले आहेत. त्यामुळे ते सिरीयस झाले आहेत. त्यांना मदतीची आवश्यकता आहे. उद्धव ठाकरेंना कोणत्यातरी मानसोपचार तज्ञांकडे घेऊन जा, असं मी त्यांच्या पक्षातील लोकांना सांगतो आणि डॉक्टरांकडे नेऊन त्यांच्या मनावरचं ओझं दूर करा, असाही सल्ला त्यांनी उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्ते आणि नेत्यांना दिला आहे. 

इतर महत्वाची बातमी-

महत्त्वाच्या बातम्या

B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; ्
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
Embed widget