Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सकाळी सकाळीच टोचले डीनचे कान; म्हणाले मेमो...
आजपर्यंत डीन तुम्ही एकालाही मेमो दिला नाही. जर तुम्ही कुणालाही मेमो दिला नाही तर कुणीही कसेही काम करेल. तुम्ही उदारमतवादी आहात, असं म्हणत अजित पवारांनी कान टोचले आहेत.
![Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सकाळी सकाळीच टोचले डीनचे कान; म्हणाले मेमो... deputy chief minister ajit pawar said to dean of baramati medical college to give memo to doctor over complaint Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सकाळी सकाळीच टोचले डीनचे कान; म्हणाले मेमो...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/23/759f6d8508c153dde05c4bfdc4bff9b51695447192546442_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) हे त्यांच्या परखड मतांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचा हजरजबाबीपण आणि त्यांच्या कामाची पद्धत राज्याला माहिती आहे. त्यातच ते अनेकदा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कान टोचत असल्याचं आपण पाहिलं आहे. आजही बारामतीत त्याचाच प्रत्यय पुन्हा आला आहे. आजपर्यंत डीन तुम्ही एकालाही मेमो दिला नाही. जर तुम्ही कुणालाही मेमो दिला नाही तर कुणीही कसेही काम करेल. तुम्ही उदारमतवादी आहात, असं म्हणत अजित पवारांनी कान टोचले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. बारामतीतील विविध विकास कामांची पाहणी अजित पवारांनी केली. यावेळी बारामतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अजित पवारांनी भेट दिली. बाह्य रुग्ण (अपघात) विभागाचे उद्घाटन केलं. यावेळी अजित पवारांनी महाविद्यालयातील वरिष्ठांचा समाचार घेतला.
मेडिकल कॉलेजच्या कारभाराबाबत अजित पवारांनी नाराजी व्यक्त करत काही सूचना केल्या. आजपर्यंत डीन तुम्ही एकालाही मेमो दिला नाही. जर तुम्ही कुणालाही मेमो दिला नाही तर कुणीही कसेही काम करेल. तुम्ही उदारमतवादी आहात अस म्हणत अजित पवारांनी कान टोचले. वैद्यकीय महाविद्यालयात कर्मचारी गैरहजर राहण्याचे प्रमाण जास्त आहे अशा तक्रारी आहेत. त्यामुळे डीन यांनी बायोमेट्रिक करण्यास सुरुवात केली पाहिजे म्हणजे शिपायांपासून सगळे बायोमेट्रिक करतील अशा शब्दांत अजित पवारांनी कानउघाडणी केली आहे.
बारामतीतील शिक्षकांचेही कान टोचले होते
यापूर्वी अजित पवारांनी बारामतीतील शिक्षकांचे कान टोचले होते. शिष्यवृत्तीच्या परीक्षेत बारामतीच्या विद्यार्थ्यांचा निकाल शून्य टक्के लागल्यामुळे त्यांनी शिक्षकांचे कान टोचले होते. आता काय कपाळ फोडून घेऊ का? एवढं सगळं करुनही बारामतीचा निकाल शून्यच आहे, असं ते म्हणाले होते. पाचवीचा शिष्यवृत्तीचा निकाल लागला आहे. या परीक्षेत 640 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात शिरूरची मुले जास्त आहेत. त्यानंतर खेडची मुलं आहेत आणि त्यानंतर सातव्या क्रमांकावर बारामती आहे. पुरंदर तालुक्यातील एका मुलाने अब्रू राखली आहे. शिरुरच्या पोरांनी बाजी मारली आहे. मात्र बारामती, भोर आणि हवेलीचा निकाल शून्य टक्के आहे. आता काय कपाळ फोडून घेऊ का? आम्ही सकाळी सहा वाजल्यापासून मरमर काम करतो आणि बारामतीचा निकाल शून्य, असं म्हणत ते आज शिक्षकांवरच भडकल्याचं पाहायला मिळालं होतं.
इतर महत्वाची बातमी-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)