Ajit Pawar In Baramati : हवसे, नवसे, गवसे येतील पण हा अजित दादा शब्द देणारा, भावनिक होऊन प्रश्न सुटत नाही; बारामतीमधून दादांचा खोचक टोला
भावनिक होऊन प्रश्न सुटत नाहीत. विकासाचं ध्येय ठेवून पुढे जायचं आहे. मला बारामती बघत इतर तालुके, पुणे, महाराष्ट्र फिरायचा आहे. इथल्या लोकांनी जबाबदारी पाळायचे असल्याचे अजित पवार म्हणाले.
बारामती : विधानसभेला महायुतीला निवडून द्यायचं आहे, हवसे, नवसे, गवसे येतील, पण अजित दादा हा शब्द देणारा असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीमध्ये केले. बारामतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची जन सन्मान रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीमध्ये बोलताना अजित पवार यांनी खोचक शब्दांमध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यावर टीका केली. रोहित पवार म्हणाले की, भावनिक होऊन प्रश्न सुटत नाहीत. विकासाचं ध्येय ठेवून पुढे जायचं आहे. मला बारामती बघत इतर तालुके, पुणे, महाराष्ट्र फिरायचा आहे. इथल्या लोकांनी जबाबदारी पाळायचे असल्याचे अजित पवार म्हणाले.
घटनेला संविधानाला कोणीही धक्का लावणार नाही
अजित पवार म्हणाले की, चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत संविधानाला कोणी धक्का लावणार नाही. त्यांनी सांगितले की, आम्ही खोटे बोलणार नाही. आम्ही सत्तेसाठी हपापलेलो नाही. सत्ता येत असते, जात असते. सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी आलेला नाही. सत्तेचा वापर गरिबांसाठी झाला पाहिजे, असं अजित पवार म्हणाले. एमएसपी संदर्भात बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, मी काल अमित शाह यांची भेट घेतली व साखरेच्या संदर्भात त्यांच्याशी बोलणी केली. एमएसपी वाढवायला पाहिजे असं त्यांना सांगितलं. त्या संदर्भातील निवेदन त्यांना उद्या देणार असल्याचे अजित पवार म्हणाले.
चंद्र आणि सूर्य जोपर्यंत आहेत तोपर्यंत कोणीच संविधानाला धक्का लावू शकणार नाही, आम्ही कोणाला धक्का लावू देणार नाही, हा तुमच्या दादाचा वादा आहे. #राष्ट्रवादी_जनसन्मान_रॅली#NCPJanSanmanRally pic.twitter.com/1sXdQVPMd1
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 14, 2024
21 जुलै रोजी पुणे दौऱ्यावर येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. कांदा, दूध पावडर आयात केलेली नाही. जगाची आर्थिक राजधानी मुंबई करायची आहे. चुकीच्या प्रचारावर जो काही नॅरेटिव्ह सांगण्याचा प्रयत्न करतील, त्यावर विश्वास ठेवू नका असे अजित पवार यांनी सांगितले. जनसन्मान मेळाव्यामधून प्रत्येक जिल्हा तालुका ढवळून काढायचा असल्याचे अजित पवार म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या