एक्स्प्लोर

पुण्यात लिफ्टमध्ये अडकून मुलीचा मृत्यू, बिल्डरने दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप

या सात वर्षीय मुलीच्या मृत्यूनंतर रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या अगोदरही अनेक अशा घटना घडल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पण बिल्डरने रहिवाशांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येतोय.

पुणे : लिफ्टच्या दोन मजल्यांमध्ये अडकून गंभीर जखमी झालेल्या सात वर्षीय मुलीचा पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना पुण्यातील घोरपडी पेठ भागातील झोहरा कॉम्प्लेक्समध्ये शनिवारी संध्याकाळी घडली होती. ज्या लिफ्टमध्ये अडकून नशरा रेहमान खान (वय 7) मृत्यूमुखी पडली, ती लिफ्ट अनेकवेळा बंदच असायची आणि सुरू असली की त्यामध्ये याआधीही अनेक लोकं अडकल्याच्या घटना घडल्या आहेत, असा आरोप तेथील रहिवाशांनी केला आहे. अनेकवेळा तक्रारी देऊनही या लिफ्टची दुरुस्ती बिल्डरकडून झाली नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे. तर तपास सुरू असून दोषींची गय केली जाणार नाही, अशी माहिती पोलीस उप निरीक्षक कल्याणी पडोळे यांनी दिली. नशराला जेव्हा लिफ्टमधून बाहेर काढलं तेव्हा तिला तातडीने रुग्णालयात नेणं भाग होतं. परिस्थिती पाहून पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पडोळे यांनी स्वतः एका स्थानिकाच्या मदतीने तिला त्यांच्या गाडीवर दवाखान्यात नेलं. शनिवारी काय घडलं? शनिवारी नशरा दिवसभर घरीच खेळत होती. सांयकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ती आजीकडून पैसे घेऊन खाऊ आणण्यासाठी खाली गेली. त्यानंतर थोड्या वेळाने आजीला तिच्या रडण्याचा आवाज आल्याने बाहेर येऊन पाहिलं असता लिफ्टच्या दोन मजल्यांमध्ये नशरा अडकलेली होती. अग्निशमन दलाला याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने येऊन नशराची सुटका केली आणि गंभीर जखमी अवस्थेत तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. तपासणीअंती डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. महाराष्ट्र लिफ्ट कायदा बदलण्याची मागणी ''महाराष्ट्रात लिफ्टमुळे गेल्या दोन ते अडीच वर्षात 25 जणांचा मृत्यू झाला, ज्यात 6-7 मुलांचा समावेश आहे. त्यामुळे रहिवासी इमारतीत मॉलप्रमाणे काचेच्या लिफ्ट असायला हव्यात, ज्यामुळे तात्काळ मदत पोहोचेल. लहान मुलांना एकटं लिफ्टमध्ये जाऊ देऊ नये आणि राही वाहन सुरक्षा रक्षकांना लिफ्ट बंद पडल्यावर ती उघडण्याचे प्रशिक्षण द्यावे, त्यामुळे लोकांमध्ये भीती बसणार नाही. यासाठी महाराष्ट्र लिफ्ट कायदा बदलण्याची आवश्यकता आहे. याबाबत येत्या अधिवेशनात मागणी करणार आहे,'' असं काँग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Rain Water: दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
NEET Maharashtra Protetst: दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
TET paper Case Accused Arrested : टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
Pune Crime News : पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Abhijeet Dipke: काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
Dharmendra Pradhan: राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला; धर्मेंद्र प्रधानांची राजीनाम्यावर प्रतिक्रिया
राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला : धर्मेंद्र प्रधान
NEET Exam Protest: एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
Embed widget