(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Dagadusheth Ganeshotsav 2022: पंचकेदार मंदिरात विराजमान होणार 'दगडूशेठ' गणपती; मंदिराचं काम अंतिम टप्प्यात
कोरोनामुळे दोन वर्ष मंदिरात प्राणप्रतिष्ठा करुन गणेशोत्सव साजरा केला होता. मात्र यंदा पुणेकरांचा लाडका बाप्पा पंचकेदार मंदिरात विराजमान होणार आहे.
Pune Dagadusheth Ganeshotsav 2022: पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती (Pune Dagdusheth Temple) ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 130 व्या वर्षी गणेशोत्सवात श्री पंचकेदार मंदिर साकारण्यात आले आहे. प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी 8:30 वाजता मुख्य मंदिरापासून गरुड रथातून आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. फुलांनी साकारलेले गरुड रथावर लावण्यात येणार आहेत. यंदा दोन वर्षांनी दगडूशेठ हलवाई गणपती (Dagadusheth Ganeshotsav 2022) उत्सव मंडपात ठेवण्यात येणार आहे. कोरोनामुळे दोन वर्ष मंदिरात प्राणप्रतिष्ठा करुन गणेशोत्सव साजरा केला होता. मात्र यंदा पुणेकरांचा लाडका बाप्पा पंचकेदार मंदिरात दिसणार आहे.
असं असणार पंचकेदार मंदिर
पाच शिवमंदिरांचा हा समूह जिथे प्रत्यक्ष शिव राहतो ते पंचकेदार मंदिर म्हणून ओळखले जाते. ही पाच शिव मंदिरे गढवाल, उत्तराखंड येथे आहेत आणि केदारनाथ, तुंगनाथ, रुद्रनाथ, मध्यमहेश्वर आणि कल्पेश्वर म्हणून ओळखली जातात. पंचकेदार मंदिरात पाच सुवर्ण शिखरे आहेत आणि ती हिमालयातील मंदिर वास्तुकलेची प्रतिकृती असेल. गर्भगृह म्हणजे गंगा, यमुनोत्री, भागीरथी किंवा गंगा तसेच शिवाच्या आठ मूर्ती आणि नंदीची मूर्ती, शिवाचे वास्तविक वाहन आणि अनेक देवता, शिव, सुरसुंदरी तसेच प्राणी आणि पक्षी, लता यांची शिल्पे यांचा समावेश होतो आणि वेली. श्री पंचकेदार मंदिर हे चारधाम यात्रेतील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे.
प्रतिकृती 100 फूट लांब, 50 फूट रुंद, 81 फूट उंच
श्री पंचकेदार मंदिराची प्रतिकृती 100 फूट लांब, 50 फूट रुंद आणि 81 फूट उंच असेल. लाकूड, फरशी, प्लायवूड वापरून रंगकाम केलं आहे. तसेच शेवटच्या टप्प्यात विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. डेकोरेशन विभागात 40 कारागीर काम करत असून राजस्थानचे कारागीरांनी रंगकाम केलं आहे. दुरूनही भाविकांना सहज दर्शन घेता यावे यासाठी मुख्य इमारतीचे खांब अधिक मोठे केले आहेत. मंदिराचे काम मूर्तिकार विवेक खटावकर यांनी केली आहे, विद्युतीकरणाचे काम विकार बंधू केलं आहे. सारसबागेजवळील बाबुराव सणस मैदानासमोरील सजावट विभागात सजावटीचे काम पूर्ण होत आले असून अनेक कारागिरांनी याकरीता दिवसरात्र मेहनत घेतली आहे.
150 सीसीटीव्ही वॉच ठेवणार
मंदिर परिसरात गणेशोत्सवादरम्यान मोठी गर्दी होते. त्यात अनेकदा चोरीच्या घटना, छेडाछेडीच्या घटना देखील समोर येतात. आलेल्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये. कोणताही मोठा गुन्हा घडू नये यासाठी परिसरात 150 सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे.