Dr. Narendra Dabholkar Case LIVE Updates: 11 वर्षांनी दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल; तीन आरोपी निर्दोष, तर दोन दोषी
Dabholkar Case Verdict LIVE: 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर दाभोलकर यांच्यावर गोळीबार करत त्यांची हत्या करण्यात आलेली. याचप्रकरणी आज निकाल जाहीर होणार आहे.
LIVE
Background
Dr. Narendra Dabholkar Murder Case: अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे (Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti) अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता आहे. तब्बल 11 वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागतोय, विशेष सत्र न्यायाधीश पी.पी. जाधव काय निकाल देतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
आज याप्रकरणी पुणे सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाकडून निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील सर्व अपडेट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा...
Dabholkar Murder Case Verdict LIVE : डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर दोषी; सश्रम जन्मठेपेची शिक्षा
Dabholkar Murder Case Verdict LIVE : डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणाचा निकाल आज जाहीर करण्यात आला. तब्बल 11 वर्षांनी प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला. याप्रकरणी तीन आरोपींना निर्दोष ठरवण्यात आलं असून दोन आरोपींना दोषी ठरवलं गेलं आहे. प्रकरणातील आरोपी वीरेंद्रसिंह तावडेवर कट रचल्याचा आरोप होता, परंतु सरकारी पक्ष पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्यामुळे निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तसेच, पुनाळेकर आणि भावे विरोधातही आरोप सिद्ध होत नाही, त्यामुळे त्यांनाही निर्दोष ठरवलं जात आहे. कळसकर आणि अंदुरे यांनी दाभोलकरांची हत्या केल्याचं सिद्ध होतंय, त्यामुळे दोघांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Narendra Dabholkar Case LIVE : 11 वर्षांनी दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल; तीन आरोपी निर्दोष, तर दोन दोषी
Narendra Dabholkar Case LIVE : 11 वर्षांनी दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल; तीन आरोपी निर्दोष, तर दोन दोषी
Narendra Dabholkar Case LIVE : डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणाच्या निकाल वाचनाला सुरुवात, न्याय मिळणार?
Narendra Dabholkar Case LIVE : तब्बल 11 वर्षांनी आज डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी निकाल दिला जाणार आहे. न्यायाधीशांनी निकाल वाचनाला सुरुवात केली आहे.
Dabholkar Murder Case Verdict LIVE : दाभोलकर प्रकरणाचा निकाल; कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात
Dabholkar Murder Case Verdict LIVE : तब्बल 11 वर्षांनी आज दाभोलकर प्रकरणाचा निकाल. न्यायाधीश कोर्टरुममध्ये दाखल झाले असून कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. कोर्टारुममध्ये सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी, बचावपक्षाचे वकील प्रकश साळशिंगेकर, सीबीआयचे तपास अधिकारी, आरोपी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे कोर्टात उपस्थित आहे.
Dr. Narendra Dabholkar Case Verdit : कोण होते डॉ. नरेंद्र दाभोलकर?
Dr. Narendra Dabholkar Murder Case LIVE Updates : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1945 रोजी सातारा जिल्ह्यात झाला. एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर डॉक्टर होण्याऐवजी त्यांनी समाजकार्यात स्वत:ला गुंतवून घेतले. 1982 सालापासून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत त्यांचा पूर्ण सहभाग होता. 1989 मध्ये त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. ही संस्था कोणत्याही प्रकारची सरकारी किंवा परकीय मदत न घेता काम करते. मात्र, अनेक कट्टर उजव्या विचारसरणीच्या संघटना त्यांना हिंदूविरोधी मानत होत्या. त्यांच्या हत्येनंतर गोविंद पानसरे, कर्नाटकात प्राध्यापक एमएम कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली.