एक्स्प्लोर

Pune News: ड्युटीवर जातो म्हणून निघाले, फोन बंद, शोधाशोध अन्...; रस्ता क्रॉस करताना गाडीने उडवलं; पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे कुटुंबाची ससेहोलपट!

Pune News: फोन देखील बंद ठेवला. २५ मार्च रोजी रात्री सोमाटणे फाटा जवळ हॉटेल अंगण समोर रस्ता क्रॉस करताना त्याला अनोळखी गाडीने उडवले आणि तो गंभीर जखमी झाला.

पुणे: पुण्याच्या तळेगावमध्ये सीआरपीएफच्या (CRPF) जवानाचा अपघाती मृत्यू झाला. पण नेमकं कोणी ठोकरलं? याचा शोध घेण्यात तळेगाव पोलिसांकडून हलगर्जीपणा सुरु असल्याचं बोललं जातं आहे. सीआरपीएफमध्ये गांधीनगर, गुजरात येथे काम करत असलेला तळेगाव दाभाडे येथील रहिवासी असलेला जवान प्रशांत कदम हा २५ मार्च रोजी घरातून ड्युटीवर जातो असे सांगून बाहेर पडला. त्यानंतर लोणावळा येथून पुन्हा तो तळेगावच्या दिशेने कोणाला काही न सांगता आला. फोन देखील बंद ठेवला. २५ मार्च रोजी रात्री सोमाटणे फाटा जवळ हॉटेल अंगण समोर रस्ता क्रॉस करताना त्याला अनोळखी गाडीने उडवले आणि तो गंभीर जखमी झाला.  (CRPF)

गंभीर जखमी अवस्थेत त्याला वायसीएम रुग्णालयात रुग्णवाहिकेतून घेऊन जात असताना त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. याबाबत तळेगाव पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मिळाल्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांचा शोध घेणे पोलिसांनी अपेक्षित होते. प्रशांत कदम हा बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात केली होती.  मागील दोन ते तीन दिवस त्याचा कुटुंबीय आणि पोलिसांकडून शोध सुरू होतं मात्र, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातच संबंधित व्यक्ती हा बेपत्ता झाल्याची आणि अनोळखी मृतदेह मिळाल्याची नोंद असून देखील त्याचा तात्काळ तपास करण्यात आला नाही. आज संबंधित प्रशांत कदम यांचा मृतदेह वायसीएम रुग्णालयात असल्याचा मेसेज मित्रांनी ( पोलिसांनी नाही) शोध घेऊन त्यांच्या कुटुंबीयांना मिळाला आणि दुःखाचा डोंगर संबंधित कुटुंबावर कोसळला. एखाद्या गंभीर घटनेमध्ये पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन तपास करणे आवश्यक आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. (CRPF)

प्रशांत प्रकाश कदम (वय ४२, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) असे मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे. प्रशांत यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई वडील असा परिवार आहे. सीआरपीएफ जवान असलेले प्रशांत कदम गुजरातमधील गांधीनगर येथे कार्यरत होते. ते तळेगाव दाभाडे येथून २५ मार्चला गांधीनगर येथे जाण्यासाठी निघाले. लोकल रेल्वेने ते लोणावळा येथे गेले. तेथून ते लोकल रेल्वेने परत तळेगावकडे आले. मात्र, याबाबत कुटुंबीयांना माहिती नव्हती. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. दरम्यान, गांधीनगर येथील त्यांच्या कार्यालयाकडून कुटुंबीयांकडे विचारणा झाली. प्रशांत पोहोचले नसल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे नातेवाइकांनी २७ मार्चला ते बेपत्ता झाल्याबाबत तक्रार दाखल केली. सोशल मीडियावरही पोस्ट व्हायरल केली.

रुग्णवाहिका चालकाने ओळखला मृतदेह

प्रशांत कदम बेपत्ता असल्याबाबत सोशल मीडियावरून माहिती मिळाल्यानंतर रुग्णवाहिका चालकाने फोटोवरून त्यांची ओळख पटवली. सोमाटणे फाटा परिसरातून आपल्या रुग्णवाहिकेतनू रुग्णालयात नेलेला मृतदेह प्रशांत यांचाच होता, असे या चालकाने सांगितले. त्यानंतर नातेवाइकांनी ओळख पटवून सोमवारी (दि. ३० मार्च) मृतदेह ताब्यात घेतला.

पोलिसांकडून तपासात गंभीर हलगर्जीपणा झाला आहे. अनोळखी मृतदेह आणि बेपत्ता झाल्याबाबत एकाच पोलिस ठाण्यात नोंद असूनही पोलिसांनी तपास केला नाही. त्यामुळे प्रशांत यांच्याबाबत पोलिसांकडून आम्हाला माहिती मिळाली नाही. दोन-तीन दिवस शोध सुरू असल्याचे सांगितले जात असताना, प्रत्यक्षात तपासात हलगर्जीपणा झाला, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे. याबाबत सर्वत्र चर्चा सुरु आहे.

कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

नातेवाईक व मित्रांनी शोध घेतल्यामुळे मृतदेह वायसीएम रुग्णालयात असल्याची माहिती मिळाली. प्रशांत यांचा मृत्यू झाल्याबाबत समजताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

 

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

आआथातू अरअरअर... करत जरांगेंनी बाहुबलीमधील कल्की स्टाईलने उडवली बावनकुळेंची खिल्ली, महसूलमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर  
आआथातू अरअरअर... करत जरांगेंनी बाहुबलीमधील कल्की स्टाईलने उडवली बावनकुळेंची खिल्ली, महसूलमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर  
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Pune Crime News: 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
Moshi Building Collapsed : पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget