एक्स्प्लोर
पुणेरी आयडिया, प्राण्यांना उन्हापासून बचावासाठी कुलर !
पुणे : गेल्या तीन ते चार दिवसांपासून उन्हाच्या पाऱ्यानं चाळीशी ओलांडली. वाढत्या उन्हाचा त्रास प्राण्यांना होऊ नये, यासाठी कात्रजच्या राजीव गांधी प्राणीसंग्रहालायत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात आता उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे पर्यटकांची गर्दी वाढली आहे. राजीव गांधी प्राणी संग्रहालयात सद्यस्थितीला 67 प्रकारचे जवळपास 400 प्राणी आहेत. या सर्व प्राण्यांचं उन्हापाहून संरक्षण व्हावं यासाठी कुलर, वॉटर फोगर्स, पाण्याचे हौद अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
वाघ, हत्ती, अस्वल, साप या प्राण्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. उन्हामुळे त्यांच्या आहारात देखील बदल करण्यात आले आहेत. या सर्व प्राण्यांचं प्रत्येक उन्हाळ्यात जशी काळजी घेतली जाते, तशी यावर्षी घेतली जात आहे. हत्तीला अंघोळ घातली जाते. वाघांच्या पिंजऱ्यात फोगर्स सोडले जातात.
उन्हाळ्यामुळे पारा आता चागलाच चढू लागला आहे. माणसांसोबत प्राण्याच्या अंगाचीदेखील काहिली होत आहे. पुण्यात दुपारी सरासरी 42 अंशांपर्यंत तापमान वाढत आहे. अशा परिस्थितीत प्राणी संग्रहालयातील तापमान नियंत्रित करणं खुप आवश्यक झालं आहे.
हत्ती वाघ, बिबट्या आणि अस्वल यांना उन्हाच्या झळा बसू नये म्हणून त्यांच्या पिंजऱ्यात थंड पाण्याचे सप्रिंकल लावण्यात आले आहेत. वॉटर सप्रिंकल लावून पिंजऱ्यातील तापमान नियंत्रित केलं जात आहे.
सध्या राज्यतील तापमान पाहिले, तर सकाळी अकरानंतर आपल्याला बाहेर पडणे कठीण असते. आपण थंड पाणी किंवा सावली शोधतो. मात्र या मुख्या प्राण्यांना बोलता येत नसल्याने त्यांची काळजी मात्र प्राणी संग्रहालय चांगल्या प्रकारे करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement