एक्स्प्लोर

Pune Crime news : आप्पा लोंढे, संतोष जगताप हत्या प्रकरण; साक्षीदाराच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळला

Pune Crime News : कुख्यात गुंड आप्पा लोंढे वाळू माफिया संतोष जगताप यांच्या हत्या प्रकरणातील साक्षीदाराच्या खुनाचा कट पोलिसांनी उधळला आहे.

Pune Crime News : कुख्यात गुंड आप्पा लोंढे वाळू माफिया संतोष जगताप (pune Crime) यांच्या हत्या प्रकरणातील साक्षीदाराच्या खुनाचा कट पोलिसांनी उधळला आहे. खुनाच्या खटल्यातील साक्षीदाराची हत्या करायला निघालेल्या चौघांना पोलिसांनी पिस्तूल आणि घातक हत्यारासह ताब्यात घेऊन अटक केली आहे. लोणी काळभोर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 

या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. आशिष अनिल वरघडे, उद्धव राजाराम मिसाळ, सुरज सतीश जगताप आणि किशोर उर्फ शिवा छबु साळुंखे या कुख्यात गुंडांची नावं आहेत. उरुळी कांचन परिसरातील कुख्यात गुंड आप्पा लोंढे आणि वाळूमाफिया संतोष जगताप यांचा खून प्रकरणात आरोपी सध्या येरवडा कारागृहात आहेत. या खून प्रकरणातील मुख्य आरोपी पवन मिसाळ हा सुद्धा येरवडा कारागृहात असून या गुन्ह्यांमध्ये साक्षीदार असलेल्या इसमाचा हत्या करण्याच्या इराद्याने मिसाळ याने चारही आरोपींना लाखोंची सुपारी दिली होती. हे चारही आरोपी पिस्तूल आणि घातक शस्त्र घेऊन फिर्यादीला गोळ्या घालवण्यासाठी जात असताना पोलिसांनी अटक केली.

पिस्तूल आणि घातक हत्यारासह ताब्यात

कुख्यात गुंड आप्पा लोंढे वाळू माफिया संतोष जगताप यांच्या हत्या प्रकरणातील साक्षीदाराची हत्या करण्यासाठी आरोपी निघाले होते. त्यावेळी लोणी काळभोर पोलिसांना ही माहिती मिळाली होती. त्यांनी त्याचवेळी चार जणांना ताब्यात घेत खुनाचा कट उधळला. त्यावेळी त्या आरोपींजवळ पिस्टल आणि घातक हत्यारं होती. पोलिसांनी ती हत्यारं जप्त केली आहे आणि चारही जणांना अटक केली आहे. 

काय आहे प्रकरण?

आप्पा लोंढे याचं पुण्यातील अनेक जणांशी वैर होतं. वाळूमाफिया, राजकीय वाद असल्याने अनेकांंशी त्यांचे वाद व्हायचे. तो राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत होता. अनेकांच्या हत्या प्रकरणात तो आरोपी होता. त्यासोबतच त्याची पुणे आणि जवळच्या इतर परिसरात मोठी दहशत निर्माण केली होती. त्यामुळे पुर्ववैमनस्यातून आप्पाच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. त्यानुसार 28 मे 2015 मध्ये आरोपींनी आप्पा लोंढे याला उरुळीकांचन जवळील शिंदवणे रस्त्यावर थांबवून गोळ्या घालून त्याची हत्या केली होती. या प्रकरणी आरोपी संतोष मिनराव शिंदे, निलेश खंडू सोलनकर, राजेंद्र विजय गायकवाड, आकाश सुनिल महाडिक, विष्णू यशवंत जाधव, आणि नागेश लखन झाडकर यांना त्यावेळी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole on Devendra Fadnavis : आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
Donald Trump : दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
शरद पवारांचा व्हिडीओ पोस्ट करणं भोवलं, अजित पवारांची सुनावणीत अडचण, अमोल मिटकरींनी थेट सुप्रीम कोर्टाची माफी मागितली, पोस्टही डिलीट
काल शरद पवारांचा व्हिडीओ पोस्ट झाला आज अमोल मिटकरींनी सुप्रीम कोर्टाची माफी मागितली, काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bullet Patil Exclusive | 26 वर्ष पोलीस आता राजकारणात एन्ट्री; बुलेट पाटलांची बुलेटवर मुलाखतBJP Vastav 104 : Sharad Pawar आणि Uddhav Thackeray यांच्यावर टीका करणं भाजप नेते का टाळतायत?Shrikant Shinde at Mahim | विरोधकांच्या पायाखालची जमिन सरकली, सरवणकर निवडून येणारचOne minute One Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 13 नोव्हेंबर 2024 : ABP Majha Live

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole on Devendra Fadnavis : आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
Donald Trump : दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
शरद पवारांचा व्हिडीओ पोस्ट करणं भोवलं, अजित पवारांची सुनावणीत अडचण, अमोल मिटकरींनी थेट सुप्रीम कोर्टाची माफी मागितली, पोस्टही डिलीट
काल शरद पवारांचा व्हिडीओ पोस्ट झाला आज अमोल मिटकरींनी सुप्रीम कोर्टाची माफी मागितली, काय घडलं?
Photos: बटेंगे तो कटेंगे... योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतील सभेत टी-शर्टने वेधले लक्ष
Photos: बटेंगे तो कटेंगे... योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतील सभेत टी-शर्टने वेधले लक्ष
Supreme Court on Ajit Pawar NCP : तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
Embed widget