एक्स्प्लोर

मोठी बातमी! शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इनस्टीट्युटच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश, समिती स्थापन करणार, नेमकं प्रकरण काय?

Vasantdada Sugar Institute: राज्य सरकारच्या आदेशानुसार राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलातुन प्रति टन एक रुपया या संस्थेला दिला जातो. त्याचबरोबर २००९ पासुन विविध स्वरुपाची अनुदाने देखील संस्थेला राज्य सरकारकडून दिली जातात.

पुणे:  शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इनस्टीट्युटला (Vasantdada Sugar Institute) राज्य सरकारकडून देण्यात येणारे अनुदान ठरलेल्या कारणासाठी वापरण्यात येते आहे की नाही याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने दिले आहेत. वसंतदादा शुगर इनस्टीट्युट (Vasantdada Sugar Institute) ही ऊस शेती आणि ऊस उत्पादनांवर संशोधन करणारी संस्था आहे‌. राज्य सरकारच्या आदेशानुसार राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलातुन प्रति टन एक रुपया या संस्थेला दिला जातो. त्याचबरोबर २००९ पासुन विविध स्वरुपाची अनुदाने देखील संस्थेला राज्य सरकारकडून दिली जातात. मात्र आता राज्य सरकारने अनुदानाची रक्कम योग्य कारणासाठी वापरण्यात येते की नाही याची दोन महिण्यात चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या साखर आयुक्तांना दिलेत. शरद पवार अध्यक्ष असलेल्या या संस्थेच्या नियामक मंडळावर अजित पवार, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, जयप्रकाश दांडेगावकर असे नेते आहेत.(Vasantdada Sugar Institute) 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने या संदर्भात निर्णय घेतला असून, आयुक्त (साखर) यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष चौकशी समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही समिती अनुदानाचा मूळ उद्देशानुसार वापर झाला आहे का? याची सखोल तपासणी करून शासनाला अहवाल सादर करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Vasantdada Sugar Institute: मंत्री समितीतील चर्चा

राज्यातील आगामी ऊस गाळप हंगामाच्या नियोजनासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक पार पडली. या बैठकीत व्हीएसआयला दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली. सध्या साखर कारखान्यांकडून प्रति टन ऊस गाळपावर एक रुपया या दराने निधी कपात करून तो व्हीएसआयकडे वर्ग केला जातो. मात्र, या निधीचा खरोखर संशोधन आणि विकासाच्या उद्देशानेच वापर केला जातो का, याबाबत शंका उपस्थित करण्यात आली आहे. त्यामुळे या निधीच्या वापराची चौकशी शासनाकडून करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. बैठकीदरम्यान ऊस हंगामातील गाळप, शेतकऱ्यांना मिळणारे दर, तसेच कारखान्यांच्या कार्यप्रणालीसंबंधीही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

Vasantdada Sugar Institute: अहवाल शासनाला केला जाणार सादर 

या चौकशी समितीने दोन महिण्यात चौकशी करून या कालावधीत आपला अहवाल राज्य शासनाला सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अहवालाच्या आधारे शासन पुढील निर्णय घेणार आहे. दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार हे वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत. संस्थेच्या नियामक मंडळावर अजित पवार, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, जयप्रकाश दांडेगावकर असे नेते आहेत. तसेच आता चौकशी लागल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

कर्जत परिसरातील वृक्षतोडीवर अभिनेते सयाजी शिंदेंची टीका, पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाल्या, मी बॉटनी ऑनर्स 
कर्जत परिसरातील वृक्षतोडीवर अभिनेते सयाजी शिंदेंची टीका, पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाल्या, मी बॉटनी ऑनर्स 
पुण्यात सराईत गुन्हेगार ‘लाल्या येवले’ची निर्घृण हत्या, सीसीटीव्हीत कैद; मुंबईतील कुर्ल्यातही गोळीबाराचा थरार
पुण्यात सराईत गुन्हेगार ‘लाल्या येवले’ची निर्घृण हत्या, सीसीटीव्हीत कैद; मुंबईतील कुर्ल्यातही गोळीबाराचा थरार
Ravindra Dhangekar: महायुतीत असलो तरी जे काही चाललंय ते लोकशाहीला घातक; जे पेरलंय तेच उगवेल, शेवट वाईट होईल! रवींद्र धंगेकरांचा इशारा
महायुतीत असलो तरी जे काही चाललंय ते लोकशाहीला घातक; जे पेरलंय तेच उगवेल, शेवट वाईट होईल! रवींद्र धंगेकरांचा इशारा
Pune Crime News: पुण्यात भयंकर घटना, गाडीला कट मारल्याच्या रागातून तरुणावर प्राणघातक हल्ला; शरीरावर 700 टाके, एक हात अन् 3 बोटं तुटली, राजगुरुनगर हादरलं
पुण्यात भयंकर घटना, गाडीला कट मारल्याच्या रागातून तरुणावर प्राणघातक हल्ला; शरीरावर 700 टाके, एक हात अन् 3 बोटं तुटली, राजगुरुनगर हादरलं

व्हिडीओ

Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रब्बी हंगामातील खतांसाठी 62370 कोटींचं अनुदान मंजूर, मुद्रा योजनेसाठी 5000 कोटींना मंजुरी
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रब्बी हंगामातील खतांसाठी 62370 कोटींचं अनुदान मंजूर
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
Kavya Maran Marriage : काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, लग्नाचे फोटो शेअर करताच शुभेच्छांचा पाऊस
काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, रजनीकांत यांची हजेरी
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकसरीने वापरण्याचा दिला सल्ला
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकसरीने वापरण्याचा दिला सल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेबर 2026 | बुधवार
Gold Rate : भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे IBJA चे दर जाणून घ्या
भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
मोठी बातमी, महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
Embed widget