एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

CM Eknath Shinde Threat Call : 'मी एकनाथ शिंदे यांना उडवणार'; पुण्यातून धमकीचा फोन, कॉलर अटकेत

CM Eknath Shinde Threat Call : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा फोन डायल 112 ला प्राप्त झाला आहे. 'मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे' असं बोलून कॉलरने कॉल कट केला.

CM Eknath Shinde Threat Call : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना धमकी देणारा फोन (Threat Call) डायल 112 ला प्राप्त झाला आहे. 'मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे' असं बोलून कॉलरने कॉल कट केला. पुण्यातील (Pune) वारजे इथून हा कॉल आल्याचं लोकेशनद्वारे स्पष्ट झालं आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांना धमकीचा कॉल करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

नागपूरमधील डायल 112 च्या कंट्रोल रुममध्ये कॉल

सोमवारी (10 एप्रिल) रात्री डायर 112 वर फोन आला ज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. "मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे" असं बोलून कॉलरने कॉल कट केला. डायल 112 चं कंट्रोल रुम नागपूरमध्ये आहे, तिथेच हा कॉल आला होता.

पोलिसांकडून एक जण ताब्यात 

या कॉलनंतर पोलीस सतर्क झाले. कॉल कुठून आला होता याचं लोकेशन त्यांनी ट्रेस केलं. पोलिसांना मिळालेल्या लोकेशननुसार कॉल पुण्यातील वारजे इथून आला होता. त्यानंतर पोलीस या ठिकाणी पोहोचले आणि एका व्यक्तीला ताब्यात घेतलं.

दारुच्या नशेत मुख्यमंत्र्यांना धमकीचा फोन

खरतंर हा व्यक्ती दारुच्या नशेत होता. पहिल्यांदा त्याने अॅम्ब्युलन्ससाठी कॉल होता. पण अॅम्ब्युलन्स आली नाही म्हणून त्याने डायल 112 कॉल करुन थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवून टाकण्याची धमकी दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी नशेखोर आहे. नशेत त्याने मुख्यमंत्र्यांना धमकी दिली.

मुंबईत दहशतवादी आल्याचा कॉल

दरम्यान चार दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये तीन दहशतवादी (Terrorists) आल्याची माहिती देणारा फोन कॉल मुंबई पोलीस (Mumbai Police) नियंत्रण कक्षात आला होता. दुबईवरुन शुक्रवारी (7 एप्रिल) पहाटे तीन अतिरेकी मुंबईत आल्याचं आणि त्यांचा संबंध पाकिस्तानशी असल्याचा कॉलरने दावा केला होता. या फोन कॉलनंतर मुंबई पोलिसांनी पुढील तपास सुरु केला.

काय आहे डायल 112?

नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत सर्व मदत एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, म्हणून 112 हा क्रमांक राज्यात कार्यान्वित करण्यात आला आहे. '112' क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर तो कॉल कुठून करण्यात आला आहे, हे समजते. त्यामुळे संबंधिताला त्वरित मदत देण्याची कार्यवाही केली जाते. पोलीस, अग्निशमन, आरोग्य मदत, महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिक यासारख्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळाव्यात, यासाठी केंद्र सरकारने देशभरासाठी '112' हा एकच क्रमांक कार्यान्वित केला. तर महाराष्ट्रात 2021 मध्ये हा क्रमांक कार्यान्वित झाला. 

हेही वाचा

Mumbai Threat Call : मुंबईत तीन अतिरेकी, मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात फोन; पोलीस यंत्रणा अलर्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Maharashtra Exit Poll 2024 | मुंबईत बिग फाईट, मविआला 18-19 तर महायुतीला 17-18 जागाMaharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे' Special ReportBaramati Vidhan Sabha | विधानसभा निवडणुकीसाठी बारामतीत राजकारण आणि भावनांचा खेळ Special ReportDevendra Fadnavis : जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा भाजपला फायदा होतो:फडणवीस ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Embed widget