एक्स्प्लोर

Maharashtra Political Crisis : कावळा काव काव करत राहिला पण कोकीळेला न्याय मिळाला; निकालानंतर चित्रा वाघ यांनी विरोधकांना डिवचलं

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत विरोधकांवर निशाणा साधला आहे. कावळा काव काव करत राहिला पण कोकीळेला न्याय मिळाला, असं म्हणत त्यांनी विरोधकांनी डिवचलं आहे. 

Maharashtra Political Crisis :  महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निकाल अखेर लागला असून शिंदे-फडणवीस सरकार (Eknath Shinde)वाचले आहे. सगळं बेकायदेशीर मात्र सरकार कायदेशीर असं या निकालातून समोर आलं आहे. असं असताना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत विरोधकांवर निशाणा साधला आहे. 'कावळा काव काव करत राहिला पण कोकिळेला न्याय मिळाला', असं म्हणत त्यांनी विरोधकांनी डिवचलं आहे. 

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. विरोधकांनी सरकार पडणार असल्याचं वक्तव्य अनेकदा केलं होतं. 16 आमदार अपात्र ठरणार आणि शिंदे-फडणीस कोसळणार, अशी टीका विरोधकांनी केली होती. त्यानंतर या सगळ्याचा आज निकाल जाहीर झाला. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी हा निकाल वाचून दाखवला. यानुसार सुप्रीम कोर्टाने राज्यपालाच्या भूमिकेवर ताशेरे ओढले, याचबरोबर भरत गोगावले प्रतोद म्हणून नियुक्ती बेकादेशीर असल्याचे सांगितले आणि संपूर्ण निकालातून शिंदे फडणवीस सरकार वाचलं असल्याचं स्पष्ट होत आहे. 

'कावळा काव काव करत राहिला पण कोकिळेला न्याय मिळाला'

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. यातून त्यांनी उद्धव ठाकरे आणि सगळ्या विरोधकांना डिवचलं आहे. चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात सांगितलं होतं की कावळा कोण आणि कोकिळा कोण हे निकालातून कळेल. आता हे सिद्ध झालंच.  कावळा कोण आणि कोकिळा कोण? कावळा काव काव करत राहिला पण कोकिळेला न्याय मिळाला. लोकशाहीचाच हा विजय. राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच राहणार, असं म्हणत त्यांनी सगळ्यांचं अभिनंदन केलं आहे. 

निकालामुळे आम्ही समाधानी...

या निकालावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की,  सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे आम्ही संपूर्ण समाधानी आहोत. शिंदे-फडणवीस सरकार पडणार असं जी लोकं कालपर्यंत उड्या मारत होते. त्याच्या सर्व टीकेवर पाणी फेरल्या गेलं आहे. ज्या विरोधांनी अनेक चर्चा केल्या त्या चर्चाही व्यर्थ होत्या. हे सगळं या निकालातून पूर्णपणे समोर आलं आहे.

सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं?

भरत गोगावले प्रतोद म्हणून नियुक्ती बेकादेशीर, अधिकृत व्हिप कोण हे जाणून घेण्याचा प्रयत्न झाला नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण. अपात्रतेपासून वाचण्यासाठी आम्हीच खरा पक्ष आहोत, हा बचाव होऊ शकत नाही. सरकारवर शंका घेण्याचं कारण राज्यपालांकडे नव्हतं. बहुमत चाचणी बोलावण्याची गरज नव्हती. पक्षांतर्गत वाद मिटवण्यासाठी बहुमत चाचणीचा वापर नको. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही त्यांना मुख्यमंत्री म्हणून पुनर्स्थापित करण्याचा निर्णय दिला असता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget