एक्स्प्लोर

गिरीश बापटांविरोधात कारवाईचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा : संजय काकडे

‘पुढच्या वर्षी सरकार बदलेल’, असं वक्तव्य अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी केलं होतं. त्यासाठी त्यांच्यावर काय कारवाई करायची याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा.’

पुणे : गिरीश बापट यांच्या सरकार बदलेल वक्तव्यावरून पुण्यात बापट विरुद्ध काकडे वाद पुन्हा समोर आला आहे. ‘पुढच्या वर्षी सरकार बदलेल’, असं वक्तव्य अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी केलं होतं. त्यासाठी त्यांच्यावर काय कारवाई करायची याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा.’ अशी मागणी भाजप खासदार संजय काकडे यांनी केली आहे. दरम्यान, 2019 पर्यंत सरकारला कोणताही धोका नसल्याचं वक्तव्य यावेळी संजय काकडेंनी केलं आहे. 'शिवसेना आणि आमचे इतके वाईट संबंध झालेले नाही की ते आमचा पाठिंबा काढून घेतील. तसंच 2019च्या लोकसभेत शिवसेनेनं आमच्यासोबत युती केल्यास आश्चर्य वाटून घेऊ नये. 2019ला राज्यात भाजपची एकहाती सत्ता येईल. आमच्या 170 ते 185 जागा येतील असा मला विश्वास आहे.' असंही ते यावेळी म्हणाले. गुजरात निवडणुकीवेळी भाजपची हार होईल असं भाकित संजय काकडेंनी केलं होतं. त्यावर गिरीश बापट यांच्या समर्थकांनी काकडेंवर कारवाईची मागणी केली होती. गिरीश बापट वास्तवाची जाण असणारा नेता: सुप्रिया सुळे दरम्यान दुसरीकडे याचप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गिरीश बापटांना टोला लगावला आहे. ‘“गिरीश बापटांच्या वक्तव्याचं मी मनापासून स्वागत करते. वास्तवाची जाणीव भाजपमध्ये कोणत्या नेत्यामध्ये असेल, तर ती माननीय, आदरणीय बापटसाहेबांकडे आहे. त्यामुळे त्यांनी वास्तव लक्षात घेऊन ते बोललेले आहेत. त्यामुळे त्यांचं मी मनापासून स्वागत करते.” असं त्या म्हणाल्या. गिरीश बापट काय म्हणाले होते? ‘वर्षभरानंतर सरकार बदलणार आहे. त्यामुळे जे काही मागायचं आहे, ते आत्ताच मागून घ्या. पुढं काय होईल काय नाही याची चर्चा मी इथे करत नाही. पण पुढे काय होणार आहे हे मला माहिती आहे. कोणाचंही सरकार असो. शेतकऱ्यांना मदत करणं हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे जे काही मागायचं असेल, ते आत्ताच मागून घ्या’, असं गिरीश बापट म्हणाले होते. अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघाचे राष्ट्रीय अधिवेशन आणि राष्ट्रीय डाळिंब परिषद पुण्यात संपन्न झाली. त्यावेळी बापट बोलत होते. डाळिंब उत्पादकांनी काही मागण्या गिरीश बापटांकडे केल्या होत्या. त्यावर बोलण्याच्या ओघात बापटांनी पुढील सरकार बद्दल हे वक्तव्य केलं होतं. संबंधित बातमी : वर्षभरानंतर सरकार बदलणार, गिरीश बापटांचं खळबळजनक वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्या

रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget