एक्स्प्लोर

Misal By Vishnu Manor : ना डीजे, ना रॅली, पुणेकरांकडून महापुरुषांना हटके आदरांजली; महात्मा फुले जयंंतीनिमित्त शेफ विष्णू मनोहर यांनी तयार केली 10 हजार किलो मिसळ

महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त (Pune Misal Mohotsav) पुण्यामधल्या फुले वाड्यामध्ये (Phule Wada) 10,000 किलो मिसळ तयार करण्यात आली.

पुणे : महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त (Pune Misal Mohotsav) पुण्यामधल्या फुले वाड्यामध्ये (Phule Wada) 10,000 किलो मिसळ तयार करण्यात आली. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी ही मिसळ तयार केली आहे. महात्मा फुलेंना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या लोकांना या मिसळच वाटप करण्यात येणार आहे.  मंत्री अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांनीही फुले वाड्यात महात्मा फुलेंना अभिवादन केलं आणि  मिसळीची चवही चाखली आहे.  अयोध्येत तब्बल 7 हजार किलोचा विश्वविक्रमी शिरा साकारण्याकरिता वापरलेल्या कढईत ही मिसळ तयार करण्यात आली आहे. साधारण रात्रीपासूनच ही मिसळ तयार करायला सुरुवात करण्यात आली होती. 

पुणेकरांचं हटके अभिवादन....

पुणेकरांनी कोणताही नव्याने सुरु केलेला उपक्रम हा समाजातील इतरांकरीता आदर्श ठरत असतो. त्यामुळेच यंदा सलग दुस-या वर्षी आगळ्या - वेगळ्या पध्दतीने लोकसहभागातून तब्बल 10 हजार किलो मिसळ तयार करण्याचा उपक्रम घेण्यात आला आहे. लोकसहभाग असला की कितीही मोठी अवघड गोष्ट ही अगदी सहज मार्गी लागते, अशी हजारो उदाहरणे स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंत या समाजात पहायला मिळतात. याच धर्तीवर लोकसहभागासाठी लोकांनी एकत्र येण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे.
 
किती किलो साहित्याचा वापर?

मिसळ तयार करण्याकरिता 15 बाय 15 फूट आकारातील भव्य कढाई वापरण्यात येणार आहे. कढईची उंची6.5  फूट असून 2500 किलो वजन आहे. पोलाद, तांबे आणि भक्कम स्टिलचा वापर करुन ही कढई साकारण्यात आली असून झाकणही मोठे आहे. अयोध्येतील विश्वविक्रमानंतर थेट पुण्यातील या उपक्रमाकरिता ही कढई वापरण्यात येणार आहे. 
 
उपक्रमामध्ये  मटकी 2000 किलो, कांदा 1600 किलो, आलं 400 किलो, लसूण 400 किलो, तेल 1400 किलो, मिसळ मसाला 280 किलो, लाल मिरची पावडर 80 किलो, हळद पावडर 80 किलो, मीठ 100 किलो, खोबरा कीस 280 किलो, तमाल पत्र 14 किलो, फरसाण 5000 किलो, पाणी 20000लिटर, कोथिंबीर 250 , लिंबू 2000 नग इत्यादी साहित्य वापरण्यात येणार आलं आहे. 
 
 मिसळ खाण्याकरिता डिस्पोजेबल डिश 1 लाख, पाणी पिण्यासाठी डिस्पोजेबल ग्लास 1  लाख यांसह 1000 किलो दही व स्लाईड ब्रेड 3 लाख नग असे साहित्य वापरण्यात आलं आहे. पुण्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळांनी उपक्रमात सहभाग घेतला आहे. 
 
इतर महत्वाची बातमी-
 
शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?

व्हिडीओ

Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!
Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Embed widget