Chandrashekhar Bawankule : फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये म्हणून शरद पवारांनी सर्वोतोपरी प्रयत्न केले - चंद्रशेखर बावनकुळे
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून शरद पवारांनी जी खूणगाठ बांधली होती, त्यासाठी जे जे प्रयत्न करायचे ते करतायेत. देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम शरद पवारांनी केले,
पुणे : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून (sharad pawar) शरद पवारांनी खूणगाठ बांधली होती, त्यासाठी जे जे प्रयत्न करायचे होते ते शरद पवार (Sharad Pawar) करत आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम शरद पवारांनी केले, हे अजित पवार, छगन बुजबळ आणि देवेंद्र फडणवीसांनीदेखील सांगितलेलं आहे. आता त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी देवेंद्र फडणवीस यांचा विजयरथ काहीही केलं तरी थांबणार नाही, असा हल्लाबोल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. त्यांनी आज शिरूर लोकसभेत 'घर चलो अभियान' अंतर्गत बैठक घेतली. त्याबैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
अजित पवार की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यावरून संघर्ष निर्माण होत नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटतं देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाटतं अजित पवार आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना वाटतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत. यात काहीही गैर नाही, पक्षवाढीसाठी प्रत्येकजण हे करतो. मात्र पार्लमेंट्री बोर्ड ठरवेल तोच मुख्यमंत्री होईल, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.
अजित पवारांना अंडरइस्टिमेट करत आहेत...
अजित पवार मुख्यमंत्री झाले तर सर्वात पहिला हार मी घालेन, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं, त्यावर बोलताना त्यांनी सुप्रिया सुळे यांंच्यावर आरोप केला. ते म्हणाले की, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचे भाऊ-बहिणीचे संबंध आहेत. त्या मनातून, अंतर्मनातून बोलल्या की भाऊ बहिणीचे प्रेम म्हणून बोलल्या? त्यांना एक सेकंदही अजित दादा चालत नाहीत, अगदी घरातही ते नकोत. त्यामुळं मला वाटतं अंडरइस्टीमेट करण्यासाठी बोलल्या आहेत.
बारामतीत सुळे विरोधात अजित पवार कुटुंब?
ते पुढे बोलताना म्हणाले की, मी एवढेच सांगेल, बारामतीत महायुतीचा उमेदवार हा 51 टक्के मतं घेऊन निवडून येईल. उमेदवार कोण हे पार्लमेंट्री बोर्ड ठरवेल. त्यामुळे बारामती लोकसभेत सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवारांच्या कुटुंबातील उमेदवार असेल किंवा कोण असेल यासंदर्भात कोणतीही माहिती देता येणार नसल्याचं ते म्हणाले.
पोलिसांची कंत्राटी पद्धत भरतीवरून आरोप सुरूच आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले की अशी भरती प्रक्रिया आत्ताच होते असे नाही. मी महावितरण विभागाचा मंत्री होते तेव्हा ही भरती प्रक्रिया सुरू होईपर्यंत कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया झाली होती. त्यामुळं मूळ पदाला कोणताही धक्का बसत नाही.
गृहमंत्री अपयशी ठरताय?
पुण्यात ससूनमधून ड्रग्ज रॅकेट उघडकीस आलं आहे. याचा अर्थ हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अपयश नसून उलट अभिनंदन करायला हवं, ड्रग्स काय आत्ता झालं का? हे नेटवर्क देवेंद्र फडणवीस अथवा एकनाथ शिंदे आल्यावर झालेलं नाही. उलट त्यांनी या सर्वांचा छडा लावला, हे सगळं देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनेच होतंय, त्यामुळे त्यांचं अभिनंदन करतो, असं म्हणत त्यांनी फडणवीसांवर ड्रग्ज रॅकेट संदर्भात झालेले आरोप फेटाळून लावले.
इतर महत्वाची बातमी-