Chakan Traffic Jam: अजित पवारांना चाकणच्या आंदोलकांचं थेट आव्हान; म्हणाले, ताफ्याविना वाहतूक कोंडीतून प्रवास करुन दाखवावा अन्...
Chakan Traffic Jam: चाकणचे ग्रामस्थ आणि एमआयडीसीच्या कर्मचाऱ्यांनी पीएमआरडीए कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय.

चाकण : चाकणची अभूतपूर्व वाहतूक कोंडी (Chakan Traffic Jam) फोडण्यासाठी अजित पवार ताफ्यासह पाहणी दौरा केला. पण अजित दादांनी एकदा विना ताफ्याचा प्रवास वाहतूक कोंडीतून (Chakan Traffic Jam) करुन दाखवावा. असं आव्हान आंदोलनकर्त्यांनी थेट अजित पवारांना (Ajit Pawar) दिलंय. चाकणचे ग्रामस्थ आणि एमआयडीसीच्या कर्मचाऱ्यांनी पीएमआरडीए कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय. यावेळी सकाळी सहा वाजता पाहणी दौरा केलेल्या आणि प्रशासनाच्या कागदी घोड्यांवर विश्वास ठेवलेल्या अजित पवारांवर (Ajit Pawar) आंदोलकांनी संताप व्यक्त केला. आशिया खंडातील सर्वात मोठी चाकण एमआयडीसी हद्दपार होत आहे. याचं सरकार आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही, अशी खंत ही एमआयडीसी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. आज गुरुवार असल्यानं वाहतूक कोंडी नव्हती, व्हीआयपी मूव्हमेंटला ही मार्ग खुला करुन दिला जातो. मग एरवी पोलिस काय करतात? असा प्रश्न ही त्रासलेल्या आंदोलकांनी उपस्थित केला आहे.(Chakan Traffic Jam)
Chakan traffic jam: अजित पवारांना आव्हान
अजित दादांनी एकदा विना ताफ्याचा प्रवास वाहतूक कोंडीतून (Chakan Traffic Jam) करुन दाखवावा. असं आव्हान आंदोलनकर्त्यांनी थेट अजित पवारांना (Ajit Pawar) दिलंय. चाकणचे ग्रामस्थ आणि एमआयडीसीच्या कर्मचाऱ्यांनी पीएमआरडीए कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय.
Chakan traffic jam: अजित पवारांच्या डोळ्यावर प्रशासनाची दिखाव्याची पट्टी हटवण्यासाठीचा पवित्रा
अभूतपूर्व वाहतूक कोंडी होणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावरील चाकणमध्ये अजित पवारांकडून 8 ऑगस्टला पाहणी करण्यात आली. मात्र गेल्या दोन महिन्यात दिखाव्या पलीकडे प्रशासनाच्या काही हालचाली जाणवल्या नाहीत. प्रशासनाचा हा दिखावा अजित पवारांना मात्र पचनी पडला. हे पाहून वाहतूक कोंडीनं त्रासलेल्यांनी सुस्त पडलेल्या प्रशासनाला जागं करण्यासाठी आणि अजित पवारांच्या डोळ्यावर प्रशासनाने टाकलेली दिखाव्याची पट्टी हटवण्यासाठी आज वाहतूक कोंडी मुक्त चाकण कृती समिती रस्त्यावर उतरली आहे. पिंपरी चिंचवडमधील पीएमआरडीएच्या कार्यालयावर आज त्रस्त चाकणकरांचा पायी मोर्चा धडकणार आहे. या मोर्चात स्थानिक खासदार अमोल कोल्हे आणि आमदार बाबाजी काळे ही सामील होणं अपेक्षित आहे. चाकण ते आकुर्डी पीएमआरडीए असा पंचवीस किलोमीटरचा मोर्चा का काढला जातोय. असा प्रश्न अनेकांना पडला असेलचं. तर त्याचं मूळ कारण हे पुणे-नाशिक आणि चाकण-शिक्रापूर मार्गावरील चौकात दडलंय. या चौकात वाहतूक कोंडी नित्याची असते. याचं चौकातून चाकण एमआयडीसी मध्ये कर्मचाऱ्यांना जावं लागतं. चार फेजमध्ये विस्तारलेल्या या एमआयडीसीत 1500 छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत, त्यात साडे तीन लाख कर्मचारी काम करतात. त्यामुळं या परिसरात रोज लाखभर वाहनं ये-जा करतात. यात चाकण-शिक्रापूर मार्गावरून अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजी नगर वरुन येणारी अवजड वाहतूक जेएनपीटीकडे जाते. त्यामुळं या चौकातील कोंडीत अवजड वाहनांची ही भर पडते.
Chakan traffic jam: अजित पवारांच्या समोर केवळ कारवाईचा दिखावा मांडला
केवळ इथंच नव्हे तर पिंपरी चिंचवड ते चाकण या मार्गात दहा स्पॉट आहेत, जिथं कायमचं वाहतूक कोंडी असते. अनेकदा तर एखाद्या किलोमीटरचं अंतर कापायला तासभर ताटकळावे लागते. हे सगळं अजित पवारांनी स्वतः अनुभवलं, 8 ऑगस्टला स्वतः पाहणी दौरा ही केला. पण प्रत्यक्षात गेल्या दोन महिन्यांत प्रशासनाने अजित पवारांच्या समोर केवळ कारवाईचा दिखावा मांडला. जो अजित दादांना ही पटला. प्रत्येक काम तोलून-मापून पाहणाऱ्या अजित दादांना हे पटलं कसं काय? याचं चाकणच्या कोंडीत अडकणाऱ्या प्रत्येकाला नवल वाटलं. अजित पवार त्यानंतर दहा दिवसांपूर्वी येऊन गेले, तेंव्हा त्यांनी हा दिखावा पाहून प्रशासनाची खरडपट्टी करणं अपेक्षित होतं. मात्र त्यांनी पाठराखण केल्याचं पाहिलं अन त्यानंतर वाहतूक कोंडीनं त्रासलेले हे सगळे रस्त्यावर उतरलेत. सुस्तावलेल्या प्रशासनाला जाग करण्यासाठी आणि अजित पवारांच्या डोळ्यावर प्रशासनाने टाकलेली पट्टी हटवण्याचा हा प्रयत्न आहे

























