एक्स्प्लोर

Ravindra Dhangekar: 'काय म्हणता धंगेकर , जमीन चोर निघाला मुरलीधर..!'; धंगेकरांची पोस्ट, पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या जागेच्या विक्रीचं प्रकरण तापलं,

Ravindra Dhangekar: या प्रकरणी आज ११ वाजता धंगेकर पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे. त्याआधी त्यांनी त्यांच्या सोशल मिडीयावरती त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

पुणे : पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या (Jain boarding hostel) जागेची बेकायदेशीर विक्री केल्याच्या प्रकरणाने शहरातील राजकारणात चांगलाच खळबळ माजवली आहे. या व्यवहारात केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांचे नाव चर्चेत आलं आहे. जैन समाजाने या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त करत मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आरोपानुसार, गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीला विकण्यात आलेल्या जमिनीत मुरलीधर मोहोळ यांची भागीदारी असल्याचा दावा करण्यात आला आहे.(Jain boarding hostel) याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांनी देखील मुरलीधर मोहोळ यांच्यावरती आरोप केले आहेत.

Ravindra Dhangekar: काय म्हणता धंगेकर ,जमीन चोर निघाला मुरलीधर

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही मोहोळ यांच्यावर थेट निशाणा साधला. “मोहोळ यांनी बिल्डरांना हाताशी धरून जैन बोर्डिंगची जमीन हडपली,” असा गंभीर आरोप शेट्टी यांनी केला आहे. त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांनी देखील मुरलीधर मोहोळ यांच्यावरती आरोप केले आहेत. दरम्यान या प्रकरणी आज ११ वाजता धंगेकर पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे. त्याआधी काल (शनिवारी,ता१८) रोजी त्यांच्या सोशल मिडीयावरती त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी "काय म्हणता धंगेकर ,जमीन चोर निघाला मुरलीधर..! Stay tuned..!", असं म्हटलं आहे. धंगेकरांच्या पोस्टनंतर आता ते पत्रकार परिषदेमध्ये काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Rohit Pawar: रोहित पवारांनी व्यक्त केले होते गंभीर आरोप 

जैन बोर्डिंग हॉस्टेल विक्रीच्या मुद्द्यावरुन शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. पुण्यातील जैन धर्मियांची मोक्याची तब्बल साडेतीन एकर जागा अनेक कटकारस्थाने करून हडपली गेली असून यामध्ये आर्थिक लाभासाठी सरकारमधील काही नेत्याचाच हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात असून काही नेत्यांचे नातलगही यामध्ये पार्टनर असल्याचे कळते. इतर वेळेस स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या या लोकांनी धंदा आणि पैशांसाठी जैन मंदिरही गिळंकृत केलं. सत्तेचा वरदहस्त असेल तर फाईली किती वेगाने पळतात हे नवी मुंबईत सिडको प्रकरणात दिसलंच तसं या प्रकरणातही दिसून येत आहे, असे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन जैन बांधवांना न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी जैन मंदिराची जमीन हडपणाऱ्यांविरोधात आम्ही जैन बांधवांच्या लढ्यात सोबत आहोत. सरकारनेही यात हस्तक्षेप करुन त्यांना त्यांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा या प्रकरणाचे सर्व पुरावे आमच्याकडे असल्याने आम्ही या पुराव्यांसह रस्त्यावर उतरु, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे.

Pune News: जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या जागेचा नेमका वाद काय?

पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा शिवाजी नगर येथे आहे. जिथे दिगंबर जैन बोर्डिंग आणि शेतंबर जैन बोर्डिंग आहे. 1958 साली हिराचंद नेमचंद दोषी यांनी या वसतीगृहाची उभारणी केली होती. ही जागा काही महिन्यांपूर्वी चर्चेत आली होती. कारण विश्वस्त या जागेवर नियंत्रण ठेवून नवीन विकास करण्यास इच्छूक होते. तर समाजातील काही लोकांनी याला विरोध केला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच ही जागा परस्पर हडप करुन तिची विक्री करण्यात आल्याचा आरोप जैन समाजाकडून केला जात आहे. पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांनी या जागा विक्रीला मंजुरी देताना सर्व नियम, कायद्यांची पायमल्ली केली. या जमीनविक्रीच्या व्यवहाराशी संबंध असलेल्या गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याशी लागेबांधे असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan: इम्रान खान जिवंत आहे की नाही? पहिल्यांदा पुरावे द्या! मुलाचा पाकिस्तानात आक्रोश, पोलिसांनी समर्थक मुख्यमंत्र्याला रस्त्यात चोपलं
Video: इम्रान खान जिवंत आहे की नाही? पहिल्यांदा पुरावे द्या! मुलाचा पाकिस्तानात आक्रोश, पोलिसांनी समर्थक मुख्यमंत्र्याला रस्त्यात चोपलं
India Q2 GDP : भारताचा दुसऱ्या तिमाहीचा GDP दर RBI चा अंदाज मागं टाकत 8.2 टक्क्यांवर, केंद्राकडून आकडेवारी जाहीर
भारताचा दुसऱ्या तिमाहीचा GDP दर RBI चा अंदाज मागं टाकत 8.2 टक्क्यांवर, केंद्राकडून आकडेवारी जाहीर
Uddhav Thackeray: निवडणुकांमध्ये पैशाचा धूर निघतोय, हा मतांचा लिलाव आहे का? भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक झालाय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
निवडणुकांमध्ये पैशाचा धूर निघतोय, हा मतांचा लिलाव आहे का? भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक झालाय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरातील तेजी सुरुच, जीएसटीसह सोनं 1 लाख 30 हजारांवर, जाणून घ्या चांदीचे दर...
सोने आणि चांदीच्या दरातील तेजी सुरुच, जीएसटीसह सोनं 1 लाख 30 हजारांवर, जाणून घ्या चांदीचे दर...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Suniel Shetty Majha Maha Katta : ...म्हणून मी लग्नानंतर चित्रपट करण्याचं ठरवलेलं
Suniel Shetty Majha Maha Katta :तब मुझे डर लगा.... सुनील शेट्टींनी सांगितला पहिल्य चित्रपटाचा किस्सा
Suniel Shetty Maha Majha Katta : सुनील शेट्टीने सांगितला फिटनेस फंडा, डायटीशनचीही गरज नाही
Jaya Kishori Majha Maha Katta : प्रेरणा देणाऱ्या प्रवचनांच्या अभ्यासाची तयारी जया किशोरी कशा करतात?
Jaya Kishori Majha Mahakatta : अभ्यासात गणित विषय कधीच आवडला नाही - जया किशोरी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Imran Khan: इम्रान खान जिवंत आहे की नाही? पहिल्यांदा पुरावे द्या! मुलाचा पाकिस्तानात आक्रोश, पोलिसांनी समर्थक मुख्यमंत्र्याला रस्त्यात चोपलं
Video: इम्रान खान जिवंत आहे की नाही? पहिल्यांदा पुरावे द्या! मुलाचा पाकिस्तानात आक्रोश, पोलिसांनी समर्थक मुख्यमंत्र्याला रस्त्यात चोपलं
India Q2 GDP : भारताचा दुसऱ्या तिमाहीचा GDP दर RBI चा अंदाज मागं टाकत 8.2 टक्क्यांवर, केंद्राकडून आकडेवारी जाहीर
भारताचा दुसऱ्या तिमाहीचा GDP दर RBI चा अंदाज मागं टाकत 8.2 टक्क्यांवर, केंद्राकडून आकडेवारी जाहीर
Uddhav Thackeray: निवडणुकांमध्ये पैशाचा धूर निघतोय, हा मतांचा लिलाव आहे का? भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक झालाय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
निवडणुकांमध्ये पैशाचा धूर निघतोय, हा मतांचा लिलाव आहे का? भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक झालाय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरातील तेजी सुरुच, जीएसटीसह सोनं 1 लाख 30 हजारांवर, जाणून घ्या चांदीचे दर...
सोने आणि चांदीच्या दरातील तेजी सुरुच, जीएसटीसह सोनं 1 लाख 30 हजारांवर, जाणून घ्या चांदीचे दर...
Uddhav Thackeray:हा हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार! झाडांच्या कत्तली करून प्रभू रामचंद्रांच्या परस्पर्शाने पुनीत झालेलं तपोवन तुम्ही कोणासाठी मारता आहात? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
हा हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार! झाडांच्या कत्तली करून प्रभू रामचंद्रांच्या परस्पर्शाने पुनीत झालेलं तपोवन तुम्ही कोणासाठी मारता आहात? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
हिंदीत स्टार्स, मराठीत अॅक्टर्स... असं का? दिग्दर्शक संदेश कुलकर्णी म्हणाले, 'मराठीतल्या कलाकारांना खूप रिस्पेक्ट...'
हिंदीत स्टार्स, मराठीत अॅक्टर्स... असं का? दिग्दर्शक संदेश कुलकर्णी म्हणाले...
Eknath Shinde: एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचाराची न्यू स्टाईल
एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचाराची न्यू स्टाईल
निवडणूक सुधारणा यादीचा ताण, फक्त 20 दिवसांत तब्बल 26 बूथ लेव्हल ऑफिसरांकडून आयुष्याचा शेवट; तृणमूल शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीला
निवडणूक सुधारणा यादीचा ताण, फक्त 20 दिवसांत तब्बल 26 बूथ लेव्हल ऑफिसरांकडून आयुष्याचा शेवट; तृणमूल शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीला
Embed widget