(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ड्रायव्हिंग लायसन्ससाठी उमेदवारांना वाहतुकीचे नियम पाळण्याची शपथ घ्यावी लागणार
शभरात वाहतुकीचे नियम न पाळल्याने अनेक अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे शपथ घेतल्याने चालकांकडून नियमांचं पालन होईल अशी वाहतूक विभागाला आहे.
पुणे : ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी उमेदवारांना रितसर परीक्षा द्यावी लागते. ती परीक्षा पास झाल्यानंतर गाडी चालवण्याचं लायसन्स त्यांना मिळतं. या परीक्षेमध्ये ऑनलाईन पद्धतीने प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतात आणि त्यानंतर आरटीओ आधिकाऱ्यांसमोर गाडी चालवून दाखवावी लागते. मात्र आता उमेदवारांना वाहतुकीचे नियम पाळण्याची शपथही घ्यावी लागणार आहे. तसा आदेशच परिवहन विभागाने दिला आहे. पुणे परिवहन कार्यालयात या आदेशाची अमंलबजावणीही सुरु झाली आहे.
उमेदवारांना चाचणी देण्याच्या आधी हात समोर धरुन वाहतुकीचे नियम पाळण्याची शपथ दिली जाते. यामध्ये दारु पिऊन गाडी चालवणार नाही, दुचाकी चालवताना हेल्मेट घालणार, लेन कटिंग करणार नाही, सीट बेल्ट नेहणी लावणार अशा शपथ घ्याव्या लागणार आहेत. यामुळे वाहतूक नियम पाळण्यासंदर्भात सजगता निर्माण होईल आणि वाहतुकीची समस्या सोडवण्यास मदत होईल, अशी अपेक्षा परिवहन अधिकाऱ्यांना आहे. तर चाचणीसाठी आलेल्या उमेदवारांनाही हा उपक्रम आवडला आहे. परवाना मिळाल्यावर ही शपथ लक्षात ठेऊन वाहतुकीच्या नियमांचं पालन करणार, असंही त्यांनी सांगितलं आहे.
देशभरात वाहतुकीचे नियम न पाळल्याने अनेक अपघात होतात आणि यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. जानेवारी ते सप्टेंबर 2018 मधील रस्ते अपघाताच्या आकडेवारी नजर टाकल्यास एकूण 25,832 अपघातात 9668 जणांना मृत्यू झाला आहे, तर 22,904 जखमी झाले आहेत. तर जानेवारी ते सप्टेंबर 2019 मध्ये 24,695 अपघातात 9230 जणांना मृत्यू झाला आहे, तर 21,684 जखमी झाले आहेत. यावर्षी आतापर्यंत रस्ते अपघातांमध्ये घट झाल्याचं दिसून येतंय, मात्र हा आकडा कमी नाही.
VIDEO | जु्न्या मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बसचा अपघात, दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू