एक्स्प्लोर
VIDEO : चालक नसतानाही बस धावली, पिंपरीत मोठी दुर्घटना टळली
बसमध्ये चालक नसताना देखील बस रस्त्यावर धावल्याची घटना काल (सोमवार) पिंपरीत घडली. पण सुदैवानं कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.
पिंपरी-चिंचवड : पिंपरीतील पिंपळे-गुरव बस स्थानकावर काल (सोमवार) अनेकांचे जीव थोडक्यात बचावले. पीएमपीएमएलच्या एका बसमध्ये चालक आणि वाहक नसताना ही बस अचानक सुरू झाली आणि १०० मीटर पुढे जाऊन दुचाकींना आणि गॅरेजला धडकली.
सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. काल रात्री साडे आठ वाजता हा प्रकार घडला असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
मार्केटयार्ड वरून आलेली बसची नोंद करायला चालक आणि वाहक गाडी सुरु ठेवूनच खाली उतरले. त्याचवेळी अचानक ही घटना घडली. दरम्यान, अशा प्रकारच्या बेजबाबदारपणावर कारवाईची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
VIDEO :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement